Shayna EcoUnified Start up story
जे प्लास्टिक पर्यावरणातील अविघटनशील वस्तूंमध्ये येतं, त्या प्लास्टिक चा वापर करून एखादी व्यक्ती स्टार्टअप ही सुरू करू शकते, ही पर्यावरण प्रेमींसाठी एक चांगली गोष्ट आहे. आपल्या माहिती साठी विघटनशील म्हणजे अशी वस्तू जी वातावरणात किंवा जमिनीवर काही काळानंतर लोप पावते किंवा नष्ट होते. आणि अविघटनशील म्हणजे वातावरणात किंवा जमिनीत त्या वस्तूला गाढल्या नंतर सुध्दा ती वस्तू बरेच दिवस तशीच राहते. तर प्लास्टिक सारख्या वस्तू अविघटनशील कॅटेगरी मध्ये येतात. तर आजच्या स्टार्टअप स्टोरी मध्ये आपण पाहणार आहोत अशीच एक स्टार्टअप स्टोरी ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण सुध्दा होत आहे. तर चला पुढे पाहूया स्टार्टअप स्टोरी.
पारस सलुजा प्लास्टिकच्या कचऱ्यापासून टाईल्स बनविण्याचा स्टार्टअप – Paras Saluja Startup Story
कचऱ्यापासून टाईल्स बनविण्याच्या स्टार्टअप ची कल्पना तेव्हा आली जेव्हा पारस सलुजा यांनी एव्हरेस्ट च्या बेस कॅम्प जवळ पडलेला प्लास्टिक चा कचरा पाहिला. त्या कचऱ्यामुळे तेथे एक प्रकारची गंदगी निर्माण झालेली त्यांना दिसली आणि त्यांना या कचऱ्याला पाहून एक कल्पना सुचली की, आपण देशातील कचऱ्याचा वापर करून या कचऱ्याला उपयोगात आणू. आणि येथूनच जन्म झाला एका नवीन स्टार्टअपचा.
पारस सलुजा जेव्हा विदेशात होते तेव्हा त्यांनी तेथील स्वच्छतेविषयी आणि आपल्या देशातील कचऱ्याविषयी विचार करून ही कल्पना डोळ्यासमोर ठेवली की देशातील कचऱ्याचे निर्मूलन आपण या स्टार्टअप द्वारे करू शकतो, जेव्हा ते विदेशातून भारतात परत आले तेव्हा त्यांनी काही केमिकल्सचा अभ्यास करून काही तज्ञांच्या च्या मदतीने प्लास्टिक चे प्रदूषण कमी करण्याच्या काही उपायांवर चर्चा सुध्दा केली.
त्यांनंतर त्यांनी वेळ न गमावता त्यांचे मित्र अमित नागपाल यांच्यासोबत ८०-८२ लाख रुपयांच्या रकमेसोबत त्यांनी शायना इकोनाइफ़ाइड इंडिया कंपनी ची सुरुवात केली. स्टार्टअप ची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी कचरा जमा करणाऱ्या काही प्रायव्हेट कंपनी सोबत कचरा गोळा करण्यासाठी व्यवसायाची भागीदारी सुध्दा केली होती.
जेव्हा त्यांच्या कंपनीने प्लास्टिक पासून टाईल्स बनविण्याचे काम सुरू केले तेव्हा सुरुवातीला त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, कारण लोकांचे म्हणणे होते की जीवनात एक वेळ घराचे बांधकाम होते तेव्हा त्यासाठी घरात संगमरमर ने बनलेल्या टाईल्स चा वापर करणे अधिक योग्य असते.
याचाच अर्थ असा की सुरुवातीला बाकी स्टार्टअप प्रमाणे या स्टार्टअप ला सुध्दा पसंती दिल्या गेली नाही पण हळूहळू जेव्हा या स्टार्टअप चा वापर मोठमोठ्या कंपन्या आपल्या कंपन्यांमध्ये करायला लागल्या तेव्हा या स्टार्टअप ने जोर पकडला. ग्रेटर हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन च्या अंतर्गत २०१८ मध्ये शहरातील पहिले डॉग पार्क बनविल्या गेलं आणि या पार्क ला बनविण्याकरता या स्टार्टअप ला भरपूर ऑर्डर मिळाल्या होत्या. सोबतच देशातील मोठमोठ्या कंपन्या जसे टाटा मोटर्स, लोरियाल इंटरनॅशनल या कंपन्यांमध्ये पारस यांच्या कंपनीने बनविलेल्या टाईल्स चा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला.
पारस आपल्या टाईल्स विषयी बोलताना सांगतात की त्यांच्या स्टार्टअप पासून बनलेल्या टाईल्स ह्या खूप मजबूत आणि ५० वर्षापर्यंत टिकाऊ राहणाऱ्या आहेत. सोबतच पारस सलुजा म्हणतात देशात कचऱ्याला बरेच लोक त्रासदायक सांगून त्यांच्या वाढत्या प्रमाणाविषयी बोलताना दिसतात, पण या कचऱ्याचा वापर करून आज मी माझे कुटुंब चालवतोय, आणि देशाला साफ करण्यास थोडीशी मदतही करतो.
अशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टार्टअप स्टोरी आवडली असेल आपल्याला ही स्टार्टअप स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!