Panchganga Nadi
कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी सुप्रसिद्ध पंचगंगा नदी’ ही कृष्णा नदीची एक प्रमुख मोठी उपनदी आहे.
पंचगंगा नदीची माहिती – Panchganga River Information in Marathi
नदीचे नाव | पंचगंगा |
उगमस्थान | ता. करवीर, जि. कोल्हापूर |
लांबी | 80.07 कि.मी. |
पंचगंगेच्या पाच नद्या | कुंभी, भोगावती, धामणी, तुळशी, कासारी |
कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी सुप्रसिद्ध पंचगंगा नदी ही कृष्णा नदीची एक प्रमुख मोठी उपनदी आहे.
कुंभी, भोगावती, धामणी आणि तुळशी या चार नद्यांच्या प्रवाहाला कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे कासारी नदी मिळाल्यानंतर पंचगंगा असे ओळखले जाते.
शिवाय, स्थानिक दंतकथेनुसार सरस्वती नावाच्या गुप्त नदीनेही आपला जलप्रवाह पंचगंगेस अर्पण केला आहे, असे सांगितले जाते.
कोल्हापूर शहराच्या सीमेवरून पंचगंगा नदी वाहते. पंचगंगा कोल्हापूर परिसरातील एक प्रमुख नदी आहे. पूर्वेकडे वाहणारी पंचगंगा फक्त सुमारे 80 किलोमीटर लांबीची आहे.
पूर्ववाहिनी पंचगंगा पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील जमीन सुपीक आणि संपन्न करून कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी, कुरुंदवाड येथे कृष्णा नदीला मिळते.
या प्रवासादरम्यान कोरोची, गोमती आणि जयंती या छोट्याशा नद्या पंचगंगेस येऊन मिळतात. या नदीचे खोरे साधारण साडेसहाशे चौ. किलोमीटर परिसरात पसरले आहे.
पंचगंगा ही नुसती नदी नसून ती विकासगंगा ठरली आहे. पंचगंगेच्या प्रवाहाने जलौघाने येथील जमीन सुपीक बनली आहे. तिच्या पाण्यावरच समृद्ध शेतीची आणि उद्योगाची पायाभरणी झाली आहे.
पंचगंगेच्या काठावरचे कोल्हापूर शहर व्यापार, उद्योग आणि आधुनिक संस्कृतीचे प्रमुख केंद्र बनले आहे. याच कोल्हापुरात सुप्रसिद्ध असे ‘महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर’ आहे. पंचगंगेमुळे येथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे.
पंचगंगेचे पाणी फोन्ड्यापासून आंबा घाटापर्यंतच्या पाच नद्या आणि शेकडो नाल्या, ओढे यामधून वाहत येते. त्याबरोबरच त्यामध्ये असलेली जैवविविधता, पाण्याची मुबलकता, तिचे निसर्ग सौंदर्य इ. वैशिष्ट्यांमुळे ती कोल्हापूरकरांची जीवनदायी बनली आहे यात शंकाच नाही.
पंचगंगा नदीबाबत विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Panchganga River
उत्तर: ता. करवीर, जि. कोल्हापूर.
उत्तर: कुंभी, धामणी, भोगावती तुळशी आणि कासारी या नद्या एकत्र मिळून पंचगंगा नदी बनली आहे.
उत्तर: कृष्णा नदीची.
उत्तर: कोल्हापूर.
उत्तर: नृसिंहवाडी कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.