Palghar Jilha Mahiti
महाराष्ट्र राज्यातील 36 वा जिल्हा पालघर!
ऐके काळी ठाणे जिल्हयाचा भाग असलेला आणि जवळजवळ 25 वर्ष चाललेल्या अविरत संघर्षानंतर 1 ऑगस्ट 2014 ला अस्तित्वात आला पालघर जिल्हा!
पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Palghar District Information in Marathi
महाराष्ट्र राज्यातील कोकण डिवीजन चा हिस्सा असलेल्या पालघर जिल्हयाला उदयास येण्याकरता अनेक वर्ष झगडावे लागले. अरबी समुद्राच्या पश्चिम तिरावर हा जिल्हा वसलेला असुन या जिल्हयाच्या भोवती सहयाद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत.
आपल्या देशात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला पालघर हा एकमेव जिल्हा आहे. पालघर जिल्हा ठाणे जिल्हयापासुन 52 कि.मी. आणि मुंबईपासुन 74 कि.मी. अंतरावर आहे.
जिल्हा आदिवासी बहुल असुन मोखाडा, तलासरी आणि जव्हार तालुक्यांमधे तर 100 टक्के आदिवासी समाज वास्तव्याला आहे.
मुंबई आणि गुजरात राज्याशी रस्ते, रेल्वे आणि समुद्र मार्गाने पालघर जोडले गेले आहे.
महानगरी मुंबईपासुन जवळ असल्यामुळे पालघर शहराच्या शहरी, औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीस खुप वाव आहे.
गडचिरोली आणि नंदुरबार जिल्हयांप्रमाणे पालघर जिल्हयाला देखील आदिवासी जिल्हा म्हणुन स्वतंत्र अस्तित्व मिळणार आहे.
पालघर जिल्हयातील तालुके – Palghar District Taluka List
या जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत
- जव्हार
- मोखाडा
- तलासरी
- विक्रमगड
- पालघर
- डहाणू
- वाडा
- वसई
पालघर जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Palghar Zilla Chi Mahiti
- लोकसंख्या 29,90,116
- क्षेत्रफळ 9558 वर्ग कि.मी.
- एकुण गावं 1008 आणि 3818 पाडे आहेत
- एकुण तालुके 8
- साक्षरतेचे प्रमाण 23%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 887
- राज्य महामार्ग क्र. 34 या जिल्हयातुन गेला आहे
- जिल्हयाच्या पुर्वेला सहयाद्रिच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग असा समुद्र तव्दतच जंगल, डोंगर कपारींनी हा जिल्हा समृध्द आहे
- या पालघर जिल्हयातील डहाणु येथील चिक्कु आणि वसईची केळी महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द आहेत.
- पालघर जिल्हयात आदिवासी समाज मोठया संख्येने वास्तव्याला आहे.
- धोडिया, कोळी महादेव, दुबळा, कोळी मल्हार, कोकणा, कातकरी आणि वारली या आदिवासी जमाती प्रामुख्याने वास्तव्याला आहेत.
- पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यात कोकाकोला, ओनिडा सारखे कारखाने आहेत.
- शहराला लागुनच फार मोठी औद्योगिक वसाहत असनु येथे अवजड यंत्राचे, औषधांचे, रसायनांचे, कपडयांचे कारखाने आहेत
- डहाणु हा तालुका वारली आदिवासींच्या संस्कृतीमुळे आणि त्यांच्या चित्रकलेमुळे प्रसिध्द आहे
- तारपा नृत्य आणि वारली चित्रकला ही आदिवासींच्या समाजजिवनाची ओळख या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळते
- मोखाडा तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे
- पालघर जिल्हयात मुख्यतः भात आणि नागलीचे पिक घेतले जाते
- इतक्यात या ठिकाणी हळद लागवडीचा प्रयोग सुध्दा यशस्वी झाला आहे
- समुद्राजवळच्या भागात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे
- कोळंबी आणि पापलेट या माश्यांची येथुन जास्त प्रमाणात निर्यात केली जाते
- आशिया खंडामधील सगळयात मोठी तारापुर औद्योगिक वसाहत या जिल्हयात भोईसर नजीक आहे.
- रेल्वे स्थानकाच्या सोयीमुळे गुजरात राज्यातील व्यापारी पालघरशी जोडले गेले आणि बरेचसे येथेच स्थायीक झाले.
- मुंबई या महानगराच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर पालघर हे विरार रेल्वे स्थानकाच्या पुढे चैथ्या क्रमांकाचे स्थानक आहे, व्यापाराकरता हे रेल्वे स्थानक महत्वाचे मानले जाते.
धार्मिक आणि पर्यटनस्थळं – Places To Visit in Palghar
जिवदानी मंदिर – Jivdani Devi Mandir
विरार येथील माता जिवदानी मंदिर देशातील एकमेव मंदिर असुन या मातेचे आणखीन कोठेही दुसरे मंदिर नसल्याचे सांगीतले जाते. मंदिर फार उंच अश्या पहाडीवर स्थित असुन येथे दर रविवारी आणि सण उत्सवाच्या दरम्यान भाविक भक्तांची गर्दी उसळते.
साधारण 150 वर्षांपुर्वी या मंदिराची निर्मीती झाली असुन मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यापासुन येथे अनेक सोयी सुविधा आता करण्यात आल्या आहेत.
महालक्ष्मी मंदिर डहाणु – Mahalaxmi Temple Dahanu
पालघर जिल्हयातील डहाणु येथे देवी महालक्ष्मीचे प्राचीन असे मंदिर आहे. हिंदु धर्मींयांव्यतिरीक्त आदिवासी समाज बांधव देखील या देविचे भाविक आहेत.
उत्सवादरम्यान आदिवासी बांधव देवीचा कृपा आशिर्वाद मिळवण्याकरता तारपा नृत्य करतात. दरवर्षी चैत्र महिन्यात हनुमान जयंतीपासुन या देवीच्या उत्सवाला सुरूवात होते. हा उत्सव जवळजवळ 15 दिवस साजरा केला जातो. याला महालक्ष्मीची यात्रा म्हंटले जाते.
डहाणुचा समुद्रकिनारा देखील पर्यटकांना आकर्षीत करतो. त्यामुळे येथे सुट्टीच्या दिवशी समुद्राचा आनंद घेणा.यांची संख्या मोठया प्रमाणात असते. समुद्र किना.यावर घोडा गाडीचा आनंद घेता येतो आणि घोडयावरून रपेट देखील मारता येते. या किना.यावरून दुरवर मोठे मोठे मालवाहु जहाज देखील दृष्टीस पडतात.
जयविलास पॅलेस जव्हार – Jai Vilas Palace Jawhar
जव्हार येथे यशवंत राव मुकणे यांचा भव्य असा राजवाडा पाहाण्यासारखा असुन येथे पर्यटक हनुमान पोईंट आणि हा राजवाडा पाहाण्याकरता आवर्जुन येत असतात.
यशवंतराव मुकणे हे जव्हार चे राजा होते संपुर्ण परिसरावर एके काळी त्यांची सत्ता होती त्यांच्या पुढची पिढी देखील या ठिकाणी आजही येत असते
संपुर्ण हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल आणि ऐतिहासीक वास्तुंबद्दल जर तुमच्या मनात कुतुहल असेल तर आवर्जुन या राजवाडयाला पाहायला काहीच हरकत नाही.
आता या राजवाडयात अनेक मालिकांचे चित्रीकरण देखील करण्यात येते.
जव्हारला शिरपामाळ असुन हे ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण असुन महाराज सुरतेवर स्वारीसाठी जात असतांना येथे आपल्या मावळयांसह काही काळ विसावले होते.
त्यावेळी जव्हारचे राजा विक्रमशहा यांनी महाराजांचे स्वागत केले होते त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासीक असे महत्व प्राप्त झाले आहे.
अर्नाळा किल्ला – Arnala Fort
चारही बाजुंनी पाण्याने वेढलेला हा जलदुर्ग अर्नाळा नावाच्या छोटयाश्या बेटावर बांधण्यात आला आहे. ट्रेकर्स च्या दृष्टीकोनातुन हा किल्ला चढण्याकरता सोपा समजला जातो. हा किल्ला 1516 साली गुजरात चे सुलतान महमुद बेगडा यांनी बांधला असल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर या किल्ल्यावर पोर्तुगिजांची सत्ता होती त्यांनी या किल्ल्यावर 200 वर्ष राज्य केले आणि पुढे हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला.
वैतरणा नदी या किल्ल्याजवळ सागराला मिळते त्यामुळे सर्वदुर येथुन नजर ठेवता येत असल्याने देखील हा जलदुर्ग महत्वाचा मानला जाई.
या किल्ल्यावर त्र्यंबकेश्वराचे आणि भवानीआई चे मंदिर असुन मंदिरासमोर एक सुंदर तळं आहे. मराठयांच्या ताब्यात हा जलदुर्ग आल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी या किल्ल्याची पुर्नबांधणी केली. या किल्ल्यात गोड पाण्याच्या विहीरी देखील आपल्याला दृष्टीस पडतात.
येथे येण्याकरता विरार पासुन साधारण 1 तास लागतो.
चिंचणी समुद्र किनारा, केळवे समुद्र किनारा, शिरगावचा समुद्र किनारा, सातपाटी समुद्र किनारा, दाभोसा धबधबा, पालघर केळवे रस्त्यावरचे लक्ष्मी नारायण मंदिर, शितलादेवीचे पुरातन मंदिर (केळवे), ही पालघर जिल्हयातील पर्यटनाकरता प्रसिध्द असलेली ठिकाणं आवर्जुन पाहावीत अशी . . . . . . . . . .
लक्ष्य दया: तुमच्या जवळ पालघर जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्