Pablo Escobar Information
१ डिसेंबर १९४९ मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जगातील श्रीमंत ड्रग्स व्यापारी पाब्लो इस्कॉबर यांचा जन्म झाला. त्यांची आई एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, पाब्लो च्या कुटुंबात त्याला पकडून एकूण ६ लहान मुले होते. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे लहानपणी परिवाराला दुःखाचा सामना करावा लागत होता, आणि पाब्लो लहान पणापासून बंड आणि चतुर बुध्दीचा होता.
पाब्लो शाळेत असताना एकवेळ त्याने पैशांसाठी गणिताचा पेपर शिक्षकांच्या खोलीतून चोरला होता पण शिक्षकांना माहिती झाल्याने शिक्षकांनी गणिताचा पेपरच दुसरा काढला तेव्हा पाब्लो ने शिक्षकांविषयी सर्व वर्गाला भडकून पेपर न सांगता घेण्याचा एक प्रकारे आरोपच लावला. म्हणचे पाब्लो लहानपणापासूनच चतुर आणि हुशार होता पण त्याने मोठे होता होता त्या हुशारीचा गैरफायदा घेत वाईट कामांसाठी त्याचा वापर करू लागला.
पाब्लो इस्कॉबर विषयी माहिती – Pablo Escobar Information in Marathi
तो सुरुवातीला जेव्हा धंद्यात उतरला तेव्हा त्याने सिगारेट चे पाकिट्स विकण्याचा व्यवसाय सुरू केला. असे करता करता तो शरीफ नावाच्या व्यक्तीसोबत राहून काम करायला लागला, याचदरम्यान त्याने बँकेमध्ये आपल्या भावाला सोबत घेऊन बँकेला लुटले त्यांनंतर पाब्लो ला संशयित म्हणून जेल मध्ये सुध्दा जावे लागले होते. सोबतच या दरम्यान त्याची अश्या काही व्यक्तींशी भेट झाली जे ड्रग्स डिलिंग करून करोडपती झाले होते, याने सुध्दा ठरवले की आपणही ड्रग्स चा व्यापार करायचा.
वयाच्या २२ व्या वर्षी तो आपल्या धंद्यामुळे तसेच ड्रग्स च्या व्यापारामुळे करोडपती बनला, बरेचदा त्याच्या विरोधात पोलिसांनी तसेच बरेचश्या व्यक्तींनी जाण्याचे प्रयत्न केले तो त्या सर्वांना दोन गोष्टी निवडण्याचे सांगायचा एक पैसे घ्या आणि चूप राहा नाहीतर मरणाला तयार रहा. जो व्यक्ती त्याच्या विरोधात जाऊन काम करत असे तो त्याला मारून टाकायचे काम करत होता.
त्यानंतर तो ड्रग्स ची उत्पत्ती करू लागला होता त्याने गांजा, कोकिन यांना बनवून कोलंबियातील लोकांना तसेच अमेरिकेतील लोकांनां विकत असे त्याचा व्यापार एवढा वाढला होता की त्याच्या उत्पन्नामुळे त्याचे नाव हे जगातील उच्च व्यक्तींच्या यादीत आले होते १९८९ मध्ये फॉर्ब्स ने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली होती त्या यादीत पाब्लो जगातील टॉप १० व्यक्तींमधून एक होता. तेव्हा त्याची मालकी संपत्ती ही २५ बिलियन अमेरिकी डॉलर एवढी होती.
संयुक्त अमेरिकेत ड्रग्स च्या मागणीला वाढ आल्याने त्याने अमेरिकेमध्ये आपल्या ड्रग्स चा व्यापार वाढविण्याचे ठरविले तो कधी विमानांच्या चाकांमध्ये ड्रग्स ठेवून तस्करी कारायचा तर कधी माश्यांच्या पोटात ठेऊन तर कधी रिमोट कंट्रोल ने हाताळल्या जाणाऱ्या पाणबुडीच्या साहाय्याने त्याने त्याचे अवैध व्यवसाय सुरू ठेवले.
जेव्हा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत होती तेव्हा तो सरकारी कर्मचारी तसेच न्यायाधीश व्यक्तींना सुध्दा विकत घेत असे आणि जे व्यक्ती त्याचा प्रस्ताव मान्य करत नसत तो त्यांना मारून टाकत असे.
पाब्लो ने एक वेळ कोलंबिया च्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार कार्लोस गैलान यांची हत्या केली होती सोबतच मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब लावून त्या बिल्डिंग ला पाडण्यात सुध्दा पाब्लो चा हाथ असल्याचे तेव्हाच्या काही व्यक्तींचे म्हणणे होते. त्याचा अत्याचार आणि ड्रग्स ची तस्करी वाढतच चालली होती.
पण एक दिवस ३ डिसेंबर ला सर्व न्यूज चॅनल, वृत्तपत्रे, रेडियो या माध्यमांवर अचानक पाब्लो इस्कॉबर च्या नावाचा उल्लेख चालू होता आणि सांगितल्या जातात होते की कोलंबियाचा नाही तर पूर्ण जगाचा बदमाश बादशाह पाब्लो इस्कॉबर मारल्या गेला. आणि ही घटना ज्या दिवशी झाली त्याच्या आधीच्या च्या दिवशी पाब्लो ने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. आणि २ डिसेंबर ला त्याचा मृत्यू झाली होती.
पाब्लो च्या मृतदेह रक्ताने पूर्णपणे भरलेला होता आणि त्याच्या मृतदेहासोबत काही पोलीस कर्मचारी फोटो काढत होते. त्यादिवसानंतर पाब्लो च्या मृत्यूच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या.
कोणाचे म्हणणे होते की पोलिसांशी झालेल्या गोळीबारात पाब्लो चा मृत्यू झाला, तर काही लोकांचे असे म्हणणे होते की पाब्लो चा शत्रू लॉस पेपेस यांच्या काही व्यक्तींनी पोलिसांशी मिळून पाब्लो वर गोळीबार केला आणि त्या गोळीबारात तो मरण पावला, त्याच्या पलीकडे पाब्लो च्या घरच्यांचे त्याच्या मृत्यूवर असे म्हणणे होते की पाब्लो ने स्वतः स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आणि पोस्टमार्टेम च्या रिपोर्ट मध्ये सुध्दा पाहायला मिळाले होते की पाब्लो च्या कानाच्या खालच्या बाजूला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
गुन्हेगारी करून मिळालेले जीवन कितीही सुखी किंवा आरामाच असले तरीही त्याचा अंत हा वाईटच होतो, मग ते पोलिसांची गोळी खाऊन असो की जेलमध्ये जाणे असो.
वरील लेख आपल्याला पाब्लो इस्कॉबर याच्या जीवनाविषयी माहिती करून देईल आणि त्याच्या जीवनापासून आपल्याला शिकवण देईल की वाईट गोष्टींचा अंत वाईटच होत असतो. तर आशा कारतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!