Osmanabad Jilha chi Mahiti
साडे तिन शक्ती पिठांपैकी एक संपुर्ण शक्तीपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीचा हा जिल्हा!
शिवाजी महाराजांना ज्या देविनं वरदान दिलं, हाती लखलखती तलवार दिली (असे बोलल्या जाते) तिच्या कृपा आशिर्वादाने महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्यात! ती महाराष्ट्राची कुलस्वामीनी याच उस्मानाबाद जिल्हयात वास्तव्याला आहे.
जिल्हयाचे नाव हैदराबादचे 7 वे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या नावावरून पडले उस्मानाबाद!
उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Osmanabad District Information in Marathi
मराठवाडा विभागात येणा.या उस्मानाबाद जिल्हयाच्या उत्तरेला बीड, पुर्वेला लातुर, पश्चिमेला सोलापुर जिल्हा, उत्तर पश्चिमेकडे अहमदनगर आणि दक्षिणेकडे कर्नाटक राज्याचे बिदर आणि गुलबर्गा हे जिल्हे आहेत.
उस्मानाबाद जिल्हयाचा अधिकतर भाग बालाघाट च्या पहाडांमधे स्थित आहे.
उस्मानाबाद चे पुर्वीचे नाव धाराशिव असे होते, शहराच्या नजिक साधारण आठ कि.मी. वर धाराशिव नावाच्या जैनांच्या लेण्या आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील तालुके – Osmanabad District Taluka
उस्मानाबाद जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.
- उस्मानाबाद
- तुळजापुर
- उमरगा
- लोहारा
- कळंब
- भुम
- परांडा
- वाशी
उस्मानाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Osmanabad Jilha Mahiti
- लोकसंख्या 16,60,311
- क्षेत्रफळ 7569 वर्ग कि.मी.
- साक्षरतेचे प्रमाण 88.6%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 920
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 आणि क्र. 211 हे या जिल्हयातुन गेले आहेत.
- या जिल्हयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सब कॅम्पस आहे
- पुर्वी या ठिकाणी मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते त्यानंतर बहामणी आणि विजापुर संस्थानात आले आणि 1948 पर्यंत उस्मानाबाद हैदराबाद संस्थानात आले.
- शहरातील धारासुर मर्दिनीचे मंदिर आणि शमशोद्दीन गाझी यांची दर्गा प्रसिध्द आहे.
- उस्मानाबादचे गुलाबजाम फार प्रसीध्द आहेत आणि मांसाहारी पदार्थ आवडीने खाणा.यांकरता उस्मानाबादी शेळीचे चवदार मटन देखील प्रसीध्द आहे.
- उस्मानाबाद ची शेळी प्रसीध्द आहे.
- उस्मानाबाद रेल्वेसेवा आणि बससेवेने सगळया महत्वांच्या शहरांशी जोडला गेला आहे.
- या शहराच्या मध्यातुन भोगावती नदी वाहाते.
पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places to Visit in Osmanabad
- तुळजापुर ची भवानी – Tulja Bhavani Temple
साडेतिन शक्तीपिठांपैकी दुसरे संपुर्ण शक्तीपीठ आहे तुळजापुरची तुळजाभवानी!
शिवाजी महाराजांना या देवीने तलवार दिली असल्याचे देखील सांगितले जाते, आई तुळजाभवानीच्या आशिर्वादाने महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या त्यामुळे स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांना ज्या भवानीचा आशिर्वाद लाभला त्या आई भवानीच्या दर्शनाकरता महाराष्ट्रातुनच नव्हे तर अवघ्या देशभरातुन भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात.
महाराजांच्या मुलाने हे मंदीर बांधल्याचे इतिहास सांगतो.
संपुर्ण महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी उस्मानाबादची कुलस्वामीनी मानल्या जाते.
नवरात्रात तर या गावाला झोपायला देखील वेळ मिळत नाही एवढी गर्दी त्या दिवसांमधे या तुळजापुरला असते. प्रत्येक घरात पाहुणे असतात, जणु ग्रामउत्सवच!
नवरात्राचा उत्सव जरी नउ दिवसांचा असला तरी तुळजापुरला हा नवरात्रौत्सव 21 दिवसांचा असतो.
आई भवानीचे हे मंदिर 12 व्या शतकापासुन अस्तित्वात आहे, भाद्रपद वदय अष्टमीला देवीची मुर्ती सिंहासनावरून हलवण्यात येते आणि नवरात्रात पुन्हा तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते
अष्टभुजा असलेली ही देवी सिंहावर आरूढ आहे, या देविच्या हातात वेगवेगळी शस्त्र आहेत, आद्य शंकराचार्यांनी या देविची प्राणप्रतिष्ठापना केली असल्याचे देखील सांगण्यात येतं.
अतिशय वैशिष्टयपुर्ण असलेली ही मुर्ती संपुर्ण विश्वातली एकमेव चल मुर्ती आहे पुर्ण वर्षभरात ही मुर्ती तीनदा संपुर्ण विधीयुक्त हलवण्यात येते तेव्हां देवी शयन करण्याकरता जाते असं म्हंटल्या जातं.
तुळजापुर उस्मानाबाद शहरापासुन 25 कि.मी. आणि सोलापुर पासुन 45 कि.मी. अंतरावर आहे.
- नळदुर्ग किल्ला – Naldurg Fort
वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला हा नळदुर्ग किल्ला नळ राजाने बांधला आहे.
राजाने हा किल्ला आपल्या मुलाकरता बांधला असुन तसा उल्लेख एका ग्रंथात सापडतो,
पुर्वी आदिलशाही राजवटीत याचे नाव शहादुर्ग असल्याचे दाखले मिळतात पण ते नाव प्रचलित झाले नाही.
नळदुर्ग किल्ल्यातला नर मादी धबधबा प्रसिध्द आहे हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजुन त्याप्रमाणे बाधंला आहे आणि या ठिकाणचा जलमहाल हा वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
या ठिकाणी असलेल्या नर मादी धबधब्याला नल दमयंती देखील समजल्या जाते.
बोरी नदीवर धरण बांधले असुन हे धरण आणि महाल बेसाल्ट दगडात बांधला आहे हे धरण त्याकाळातील अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण आहे.
येथे एक संगमरवरी शिलालेख देखील आढळतो.
येथील पाणीमहाल, बुरूज, जामामशिद, अंबरखाना, रंगमहाल, हमामखाना, हत्ती तलाव, रणमंडळ, हत्ती दरवाजा, हलमुख दरवाजा अश्या अनेक गोष्टी डोळयांनी पहाव्या आणि अनुभवाव्या अश्याच!
नळदुर्ग किल्ला सोलापुर पासुन 45 कि.मी. अंतरावर आहे.
शिवाय राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 ने धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापुर मार्गाने नळदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचता येते.
पावसाळयात या किल्ल्यावरून पडणारे पाणी पाहाण्याकरता हजारो पर्यटक या ठिकाणी येत असुन या ठिकाणी ’सर्जा’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण देखील झाले आहे.
ऐतिहासिक वास्तंुवर प्रेम करणा.यांनी या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी.
- परंडा किल्ला – Paranda Fort
ऐतिहासीक वास्तु ज्या पर्यटकांना आकर्षीत करतात अश्या लोकांकरता या जिल्हयात हा आणखीन एक किल्ला आहे ज्याला परंडा किल्ला असे संबोधले जाते
या किल्ल्याचा नेमका इतिहास जरी माहीत नाही तरी साधारण 15 व्या शतकात बहामणी सल्तनत चे वजीर महमुद गवन यांनी तो बांधला असावा.
हा किल्ला छोटा असुन देखील वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या किल्ल्याच्या चारही दिशेला खोल द.या आहेत, भिंती फार भक्कम असुन अनेक बारीक सारीक विचार करून बनवण्यात आलेल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात.
दुहेरी तटबंदी हे या किल्ल्याचे आणखीन एक वैशिष्टय! फार कमी ठिकाणी दिसणारी दुहेरी तटबंदी या किल्लयात मात्र आपल्याला बघायला मिळते, शत्रुने हल्ला करून आत प्रवेश केल्यानंतर आत येताच त्याला दुसरी तटबंदी दिसल्यास त्याचे अवसान तेथेच गळुन जावे अश्या कल्पनेनं या दुहेरी तटबंदीचा विचार झाला असावा.
समोरचे पुर्वीचे दार खराब झाल्याने त्या ठिकाणी आता नवीन दरवाजा बनवण्यात आला आहे त्यातुन आत येताच आणखील एक पुर्वीच्या काळातला भक्कम दरवाजा आपल्याला पहायला मिळतो त्याला लोखंडी टोचे लावण्यात आले आहेत जेणेकरून माणसच काय तर हत्ती सारखे बलाढय प्राणी देखील या दरवाज्याला ढकलु शकणार नाहीत.
महाराष्ट्रातल्या भुईकोटांमधला देखणा भुईकोट म्हणुन देखील या किल्ल्याकडे बघीतलं जातं. कोट परकोट आणि त्याभवती खंदक अशी या किल्ल्याची रचना हे सगळं एका बुलंद वास्तुची दहशत निर्माण करणारंच ठरतं.
किल्ल्यावर आजही दारूगोळा आणि मोठया तोफा आपल्याला पहायला मिळतात. मोठया मोठया विहीरी देखील किल्ल्यात असुन या विहीरीतील पाणी त्या काळात हत्तीव्दारे उपसले जात असे असे सांगितले जाते.
पुरातत्व विभागानं आता या किल्ल्याची डागडुजी सुरू केली असुन अनेक सुसहय बदल करण्यात येत आहेत. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी 9 ते 5 अशी आहे.
- संत गोरोबा काका मंदिर – Shree Sant Goroba Kaka Temple
1267 मधे जन्म झालेल्या संत गोरोबा काकांचे मंदिर या जिल्हयात असुन या ठिकाणी दर्शन करण्याकरता ग्रामीण भागातुन भाविक मोठया प्रमाणात येत असतात हे भाविक या यात्रेनंतर परतीच्या वाटेत पंढरपुर आणि तुळजापुरची यात्रा करतात.
संत गोरोबा काकांच्या 1317 मधे झालेल्या मृत्युनंतर 13 व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर संपुर्ण दगडांनी बांधलेले असुन वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. धार्मीक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांकरता येथे एक सभामंडप देखील बांधला आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील ‘तेर’ हे ठिकाण संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ असुन याच ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे. पुर्वी या ठिकाणाचे नाव तगर असे होते, तेरणा नदीच्या तिरी हे गांव वसले असुन या ठिकाणी फार जुने असे जैन मंदिर देखील आहे आणि या ठिकाणचे कोरीव काम अतिशय देखणे आणि सुबक असे आहे.
या ठिकाणची काही मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत, या ठिकाणी श्री नृसिंहाचे जुने मंदिर आहे शिवाय गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाचे जुने मंदिर असुन त्यात त्रिविक्रमाच्या मुर्तिसमोर भगवान विष्णुची देखील मुर्ती विराजमान आहे.
- हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांची दर्गा – Dargah Hazrat Khwaja Shamsuddin Gazi
येथील सुफी संत हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांची दर्गा संपुर्ण जिल्हयात प्रसिध्द असुन अनेक राज्यांमधले भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येतात. हे सुफी संत इस्लाम चे प्रचारक होते आणि उस्मानाबाद मधे असलेली त्यांची दर्गा मुस्लीम बांधवांचे पवित्र स्थान आहे. मुस्लीम बांधवां व्यतिरीक्त देखील इतर धर्माचे लोक या सुफी संताच्या प्रती आपला आदर भाव व्यक्त करण्याकरता येथे गर्दी करतात.
या दग्र्यात फारसी भाषेतील कोरलेला एक शिलालेख आहे आणि ही दर्गा भव्य, सुंदर आणि प्राचीन शिल्पकलेचा एक नमुना आहे.
या ठिकाणी दरवर्षी उरूस भरतो तेव्हां लाखो श्रध्दाळु या ठिकाणी दर्शनाला येतात.
आणखी वाचा:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ उस्मानाबाद जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्