Nobel prize Medal Auctions
जगातील सर्वात उच्च पुरस्कार तसेच एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठराविक क्षेत्रात एखादि विशिष्ट कामगिरी केली तर संपूर्ण जगातून त्याचे कौतुक होऊन त्या व्यक्तीला एका पुरस्काराने सन्मानित केल्या जात. तो पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार होय. ह्या पुरस्काराला मिळविण्यासाठी कामात अपार मेहनत घ्यावी लागते. तसेच जो व्यक्ती जगाच्या हितासाठी काही विशिष्ट कार्य करतो. तो व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी ठरतो, तर आपण विचार करू शकता या पुरस्काराचे मूल्य किती जास्त असणार.
कारण जगातील लाखो लोक हा पुरस्कार मिळवण्यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करतात. तरी त्यांच्या नशिबी हा पुरस्कार येत नाही, परंतु एका वैज्ञानिकाने चक्क ह्या पुरस्काराचा लिलाव केला होता. तर आजच्या या लेखात आपण त्या वैज्ञानिकांचे नाव आणि कोणत्या कारणांमुळे त्यांनी ह्या पुरस्काराचा लिलाव करण्यासाठी काढला होता हे पाहूया.
नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार असून त्या पुरस्काराचा लिलाव वर्ष २०१३ साली पहिल्यांदा झाल्याचे आपल्याला दिसून येते पण “हेरिटेज ऑक्शन” कंपनीचे असे मानणे आहे की या आधी सुध्दा २०१२ मध्ये नोबेल पुरस्काराचा लिलाव झालेला होता. १९६२ मध्ये डॉक्टर फ्रांसिस क्रीक यांना गुणसूत्राच्या संरचनेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. आणि याच नोबेल पुरस्काराला त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सन २०१३ ला लिलावासाठी बाहेर काढले होते.
“हेरिटेज ऑक्शन” कंपनीच्या आकडेवारीनुसार ११.२८ करोड रुपयांची किंमत या पुरस्काराला मिळाली होती. ही किमंत ठरलेल्या लिलावाच्या किमतीपेक्षा खूप मोठी होती. आणि या पुरस्काराला विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव “जॅक वॅग” हे होते. आणि ही व्यक्ती एक उद्योजक होती. ज्या नोबेल पुरस्काराचा लिलाव झाला होता त्याची एक विशेषता होती की त्या पुरस्कारावर डॉक्टर क्रीक यांचे नाव होते.
नोबेल पुरस्काराचा लिलाव का गेला – Nobel prize Medal Auctions Information in Marathi
डॉक्टर क्रीक यांच्या परिवाराला जेव्हा काही लोकांनी हा प्रश्न विचारला तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की या पुरस्काराला आम्ही एखाद्या संग्रलयात ठेवायला देणार होतो ज्यामुळे लोकांना हा पुरस्कार दिसला असता आणि या पुरस्काराला पाहून बऱ्याच वैज्ञानिक लोकांमध्ये एक नवीन प्रेरणा निर्माण होण्यास मदत मिळणार होती पण त्यांनंतर या पुरस्काराचा लिलाव करण्याचे ठरविले आणि त्यामध्ये आलेल्या पैश्यांच्या रकमेच्या २०% रकमेला लंडन च्या फ्रांसिक क्रीक इन्स्टिट्यूट ला देण्याचे ठरविले ज्या रकमेचा वापर नवीन रोगांवर औषध काढण्यासाठी होईल.
याअगोदर सुध्दा नोबेल पुरस्काराचा लिलाव झालेला आहे पण त्या पुरस्काराच्या लिलावाची किमंत एवढ्या जास्त प्रमाणात नव्हती. १९७५ साली भौतिक शास्त्रज्ञ निल्स बोहर यांच्या नोबेल पुरस्काराचा लिलाव २०१२ ला करण्यात आला होता. आणि त्या पुरस्काराच्या लिलावाची किंमत ३५.५३ लाख रुपये मिळाली होती. या पुरस्कारानंतर जेव्हा डॉक्टर क्रीक यांच्या पुरस्काराचा लिलाव झाला तेव्हा लोकांमध्ये गोंधळ उडाला होता, पण जेव्हा त्या रकमेचे २०% हे रिसर्च लॅब ला देण्यात आले तेव्हा त्याविषयी लोकांमध्ये सकारात्मकता पसरली.
त्यांनंतर २०१४ आणि २०१५ मध्ये सुध्दा दोन नोबेल पुरस्कारांचा लिलाव झाला होता. एक जेम्स वॉटसन यांनी आपल्या नवीन लॅब साठी पैसे गोळा करण्यासाठी नोबेल चा लिलाव केला होता. त्यांना क्रीक यांच्या सोबत १९६२ साली नोबेल मिळाला होता. आणि लिऑन लेडरमैन यांनी आपल्या उपचारासाठी नोबेल पुरस्काराचा लिलाव केला होता. या पुरस्काराचा लिलाव करून त्यांना ५ करोड रुपयांच्या वर रक्कम मिळाली होती. आणि यांना १९८८ साली भौतिकशास्त्रातून नोबेल मिळाला होता.
वरील लेखात आपण पाहिले की जगातील सर्वात मोठा पुरस्कार सुध्दा लिलावाला निघण्याच्या मागची काही कारणे. तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!