Nitin Gadkari Mahiti
नितीनजी गडकरी हे एक भारतीय राजनितीज्ञ, उद्योजक, २०१४ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकार मधे भूपृष्ठ वाहतुक जहाज, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री म्हणुन कार्य करीत आहेत.
१९९५ ते १९९९ या काळात भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात असतांना नितीनजी गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणुन कार्यभार होता त्यावेळी त्यांनी मुंबई पुणे जलदगती मार्गाची निर्मीती केली, अनेक नविन रस्ते आणि जवळपास ५५ उड्डाणपुल त्यांच्या कार्यकाळात झालेत.
१६ व्या लोकसभेत नागपुर लोकसभा मतदार संघातुन नितीन गडकरी खासदार म्हणुन तब्बल २८४८६८ मतांच्या फरकाने निवडुन आले होते.
निवडणुकीत त्यांना ५८७७६७ मते मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ३०२९३९ मतं मिळाली.
१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ते नागपूर मतदार संघातून बहुमताने निवडून आले होते.
“विदर्भाचे प्रखर नेते नितीनजी गडकरी” यांच्या विषयी माहिती – Nitin Gadkari Biography in Marathi
नितीनजी गडकरी यांचा अल्पपरिचय – Nitinji Gadkari Information in Marathi
नाव: | नितीन जयराम गडकरी |
जन्म: | २७ मे १९५७ |
वडील: | जयराम गडकरी |
आई: | भानुताई गडकरी |
पत्नी: | सौ. कांचन गडकरी |
अपत्य: | निखील, सारंग, केतकी |
पद: | भारताचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री |
नितीनजी गडकरी राजकीय करियर – Nitinji Gadkari Political Career
२००९ साली नितीन गडकरी यांची भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. या पदावर कार्य करणारे ते दुसरे मराठी नेते आहेत. प्रथम हा मान कुशाभाऊ ठाकरेंना मिळाला होता. गडकरींच्या कामाचा वेग हा फार जलद असुन त्यांच्या कार्याचा परिणाम जनतेपर्यंत फार जलद पोहोचतांना दिसतो.
हे त्यांच्या कार्याचे वैशिष्टय म्हणावे लागेल. गडकरी एक यशस्वी उद्योजक आणि शेतकरी देखील आहेत. ते एका बायोडिजल पंप, एक साखर कारखाना, १ लाख २० हजार लिटर क्षमतेचे इथेनॉल ब्लेंडिग संयत्र, २६ मेगावॅट क्षमतेचे विज संयत्र, सोयाबिन संयत्र, व एका जनरेशन उर्जा या व्यवसायांशी जुळलेले आहेत.
सकारात्मक उर्जेचे व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेउन कार्य करण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ते नेहमी वरिष्ठांच्या मर्जीतले ठरले.
पेट्रोल डिझेल चा मर्यादित साठा, रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेता नितीन गडकरी नेहमी नवनीन संसाधनांचा उपयोग करण्यावर भर देतात.
यातुनच समुद्रातुन प्रवास करण्यावर भर देत त्यांनी मुंबईमधे अनेक प्रकल्पांची सुरूवात केली आहे. मुंबई गोवा हा प्रवास नुकताच समुद्रातुन सुरू झाला असुन हे त्यांच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल. विजेवर चालणाऱ्या बसेस देखील त्यांच्या प्रयत्नांनी अनेक मोठयां शहरांमधे सुरू झाल्याचे आज पहावयास मिळते. हे नितीन गडकरींच्या कामाचे यशच म्हणावे लागेल की त्यांनी सरकारला ग्रामीण भागाच्या कनेक्टिविटी करीता ७०० करोड रूपयांची मागणी केली.
त्यामुळे महाराष्ट्रातील एकुण लोकसंख्येच्या ९८ टक्के भाग रस्त्यांशी जोडला गेला. लोकांच्या समस्या यामुळे मोठया प्रमाणात कमी झाल्या. अशी गावे रस्त्यांशी जोडली गेली जी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर रस्त्यांकरीता अद्यापही प्रतिक्षेतच होती. केंद्र सरकारने गडकरींना राष्ट्रीय ग्रामिण रस्ते विकास योजनेचे अध्यक्ष बनविले.
Nitin Gadkari Mahiti
नितीन गडकरींनी ६० हजार करोड रूपयांची एक महत्वाकांक्षी योजना सरकारला सादर केली. या योजनेला आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या लोकप्रिय नावाने ओळखले जाते. स्वतःला राजकारणी म्हणवुन घेण्यापेक्षा व्यापारी उद्योगपती म्हणवुन घेणे त्यांना जास्त भावते.
कृषी क्षेत्राशी देखील त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यांच्या पूर्ति ग्रुप ऑफ कंपनीज् चा अनेक उद्योगांमधे समावेश आहे.
तर आज आपण बघितले विदर्भाचे प्रखर नेते म्हणून ज्यांचा उल्लेख केल्या जातो, असे भारतीय जनता पार्टी चे वरिष्ठ नेत्यांपैकी एक नितीनजी गडकरी यांच्या विषयी काही आवश्यक माहिती.
आपल्याला दिलेली माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका. धन्यवाद!