Nice Quotes in Marathi
जीवनाच्या प्रत्येक पायरीवर माणसाला दुःखाचा आणि सुखाचा सामना करावाच लागतो, त्यांचा सामना केल्याशिवाय त्याला कोणत्याच गोष्टीची प्राप्ती होऊ शकत नाही, आयुष्य हे खूप सुंदर आहे पण काही लोक त्याला उशिरापासून जगणं सुरू करतात, आयुष्यात प्रत्येक पावलावर आपल्याला शिकायला मिळते, काही वाईट अनुभव येतात तर काही चांगले, वाईट अनुभवां कडून शिकायचं असत आणि चांगल्या अनुभवांना साजरं करायचं असत, त्या अनुभवांचे मिश्रण करून आजचा लेख बनविला गेला आहे, आयुष्य खर्ची घालताना काही गोष्टींना आपण न शिकता दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकावे, आणि जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात त्यांनाच खरा बुद्धिवान व्यक्ती म्हटल्या गेलं आहे.
या लेखात आपल्याला आवडतील असे काही Nice Quotes लिहिलेले आहेत, ज्या आपल्याला आवडतील या Quotes ना आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर पाठवू शकता, तर चला पाहूया काही Nice Quotes ज्या आपल्याला एक प्रेरणा देतील आणि अनुभवांची माहिती देतील.
बेस्ट मराठी सकारात्मक विचार – Nice Thought in Marathi
“श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितले आहे, जर तुम्ही धर्म कराल तर देवाला तुम्हाला मागावे लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावे लागेल.”
“जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे, म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे.”
Beautiful Quotes in Marathi
“आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव व एकप्रकारे दिलेली दिक्षाच आहे.”
“स्पेशल म्हणून राहा पण कोणाच्या आयुष्यात ऑपशन म्हणून राहू नका.”
Nice Quotes on Smile
“कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं कारण एक छोटीशी Smile खूप काही करण्याचं बळ देते.”
“आयुष्यात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोक अनुभव.”
Marathi Good Thoughts
“चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असे होत नाही, त्यासाठी सुंदर मन असणे आवश्यक असते.”
“प्रेरणेमुळे सुरवात करण्यास चालना मिळते, सवय लागणे म्हणजे तुम्हाला पुढे जाऊ देत राहते.”
Marathi Thoughts on Life
“पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.”
“कोणत्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू नका.”
आयुष्यावर आधारित सुंदर विचार – Nice Quotes in Marathi
आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्याला शिकवताना एक शिकवण दिली होती की माणसाला प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी वेळ नाही आहे म्हणून त्याने दुसऱ्यांच्या हातून झालेल्या चुकांवरून शिकावे, म्हणजे ती गोष्ट शिकायला आपल्याला स्वतःचा वेळ गमावण्याची वेळ येणार नाही.
आणि चंद्रगुप्ताने ती गोष्ट लागू करून आपल्या पराक्रमाने स्वतः मगध सारख्या राज्याला आपल्या काबीज केल, माणसाला कोणतीच गोष्ट असंभव नाही फक्त त्याने एक वेळ एखादी गोष्ट करण्याचे ठरवायला हवे, त्यानंतर त्याला कोणीही रोखू शकत नाही, लक्ष मजबूत ठेवा आणि त्या लक्षाला मिळविण्यासाठी अपार कष्ट करा, ध्येय आपल्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही.
या लेखामध्ये काही निवडक Quotes आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर आपण मित्रांना शेयर करण्यासाठी करू शकता, तसेच आपल्याला आवडल्यास त्याला सोशल मीडियावर शेयर सुद्धा करू शकता. खाली अश्याच प्रकारच्या आणखी काही Quotes लिहिल्या आहेत ज्या आपल्याला आवडतील, तर चला पाहूया काही Nice Quotes.
“नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.”
“विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबावयाचा आणि कुठं दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमलं तो कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.”
Nice Thoughts on Love
“कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं पण मी आज जे करेन त्यावर माझा उद्या आकाराला येईल हे मला समजलं आहे.”
“संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.”
Good Thoughts on Love
“गरज नसलेल्या वस्तू खरेदी केल्यास तर गरजेच्या वस्तू विकण्याची वेळ येते.”
“पाणी वाहत असते म्हणून त्याला वाट सापडत असते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा आणि यशाचा मार्ग सापडत असतो.”
Marathi Nice Status
“अहंकारामुळे देखील अनेक नाती तुटतात प्रत्येक वेळी फक्त चुकाच कारणीभूत नसतात.”
“काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान हे एखाद्या हारातील दोऱ्याप्रमाणे असते दिसणं आवश्यक नसून असणं आवश्यक असते.”
Nice Thought in Marathi
“त्यांच्याकडे लक्ष ठेवा ज्यांना तुमच्या विजयाचा आनंद होत नाही.”
“जीवनात नेहमीच सल्याची गरज नसते, कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते.”
काही Quotes आपल्याला प्रेरणा देऊन जातील तर काही भावना जागृत करतील तर काही आपल्याला शिकवण देऊन जातील, नेहमी आयुष्य हसत जगा आणि आयुष्यात नेहमी आनंदी राहा, आनंदासाठी कुठेही जायचं काम नाही तो तुमच्यातच असतो फक्त त्याला तुम्हाला शोधावा लागेल, आशा करतो लिहिलेल्या ह्या Quotes आपल्याला आवडतील आपल्याला ह्या Quotes आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन Quotes साठी नेहमी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!