New Planet like Earth
रात्री आकाशाकडे पहिल्या नंतर आपल्याला बरेचश्या चांदण्या लुकलूकताना दिसतात, आणि आपण जर दुर्बीण चा वापर केला तर आपल्याला काही ग्रहांना सुध्दा दुर्बीणचा वापर करून चांगल्या प्रकारे पाहता येत. आणि आपल्याला जर ब्रह्मांडातील गोष्टींना जाणून घेण्याची आवड असेल तर आपल्याला ब्रह्मांडाविषयी बऱ्याच गोष्टी माहिती असतील. आणि नेहमी एक प्रश्न पडला असेलच की आपल्या पृथ्वी सारखा दुसरा कोणता ग्रह ब्रह्मांडात असेल का? आणि असेल तर त्या ग्रहावर जीवन अस्तित्वात असेल का?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला नेहमी हवी असतात. कारण प्रत्येकाला आपल्या सारखे असलेले जग पाहायला आवडेल. तर याच प्रकारे काही थोडीशी माहिती वैज्ञानिकांच्या हाती लागली आहे. आणि आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की वैज्ञानिकांनी असा कोणता ग्रह शोधून काढला आहे ज्यावर पृथ्वीसारखे जीवन असू शकते. आशा करतो आपल्याला हा लेख वाचायला आवडेल. तर चला पाहूया..
वैज्ञानिकांना पृथ्वीसारखा ग्रह सापडला – New Planet Discovered Similar to Earth
बरेच दिवासापासून वैज्ञानिक एकाच गोष्टीवर संशोधन करत होते की पृथ्वीसारखा एखादा मिळता जुळता ग्रह सापडतो का? आणि खूप दिवसांच्या मेहनती नंतर वैज्ञानिकांना असा एक ग्रह सापडला. ज्या ग्रहावर पाण्याचे अंश सापडू शकतात. वैज्ञानिकांचे असे मत आहे की या ग्रहावर मुभलक प्रमाणात पाणी उपलब्ध असू शकते आणि त्या पाण्यामुळे त्या ग्रहावर जीवन असण्याची संभावना असू शकते.
लंडन मधील वैज्ञानिकांचे असे मत आहे की आपल्या सुर्यमालेच्या बाहेर एक असा ग्रह आहे जो आपल्या पृथ्वीपासून १०० प्रकाश वर्ष दूर आहे. आणि तो सुध्दा आपल्या पृथ्वीसारखा एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्याच्या आजूबाजूला फिरत आहे. वैज्ञानिकांचे असे मत आहे की या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा आठ पटीने जास्त असेल. आतापर्यंत सापडलेले सर्व ग्रह जायंट असे होते. म्हणजेच त्यांच्यावर गॅस ची मात्रा जास्त प्रमाणात असल्याने कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. आणि काही ग्रहांवर खूप मोठ्या टेकड्या आढळल्या होत्या, आणि पृथ्वी सारखा एखादा ग्रह आढळला ही तरीही त्यावर पाणी हे एकतर बर्फाच्या रुपात असेल नाही तर वाफेच्या रुपात. यामागचे कारण असेल की प्रकाशाचे त्या ग्रहासाठी लागणारे अस्तित्व.
पण वैज्ञानिकांना सापडलेल्या या K2-18b नावाच्या या ग्रहावर वैज्ञानिकांना पाण्याची संभावना दिसली आहे. नॅचुरल अस्ट्रोनॉमी मध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार या ग्रहावर पाण्याची पुरेपूर संभावना व्यक्त केल्या जात आहे आणि पाणी आहे तर त्या ग्रहावर जीवन असण्याची सुध्दा संभावना असू शकते. कारण हा ग्रह सुध्दा पृथ्वीसारखा त्याच्या ताऱ्यापासून तेवढाच दूर आहे जेवढी पृथ्वी सूर्यापासून.
आतापर्यंत शोधलेल्या ४००० ग्रहांपैकी हा असा ग्रह आहे ज्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीसारखा दिसून येतो. आणि पृथ्वीसारखा असल्याने यावर पाण्याची संभावना व्यक्त केल्या जात आहे पण माणूस या ग्रहावर सध्याच्या परिस्थितीत जाऊ शकत नाही. कारण पृथ्वीपासून हा ग्रह खूप दूर असल्याचे सांगितल्या जात आहे.
यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन चे वैज्ञानिक जियोवाना टिनेटी यांनी सांगितले की या ग्रहावर पाण्याची संभावना आहे, पण या ग्रहावर पृथ्वीवर असणारे समुद्र नसुही शकतात किंवा असूही शकतात. परंतु पाण्याची पुरेपूर संभावना दिसून येते.
वरील लेखात आपण पाहिले की पृथ्वीसारखा सुध्दा एक ग्रह वैज्ञानिक लोकांना मिळाला आहे, याबाबत आणखी काही नवीन माहिती मिळाली तर आम्ही आपल्यासाठी अवश्य घेऊन येऊ. तर अशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्या नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद !
Thank You So Much And Keep Loving Us!