Railway Station in India
आपल्याला जेव्हा परदेशात जाण्याचे काम पडते तेव्हा पासपोर्ट आणि व्हिजा असणे गरजेचे असते आणि ते जर आपल्याजवळ उपलब्ध नसेल तर आपल्याला पुढचा प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत नाही एअरपोर्ट च्या ठिकाणी पासपोर्ट असणे गरजेचे आहेच पण आपल्या देशात असे एक रेल्वे स्थानक आहे, ज्या रेल्वे स्थानकावर पासपोर्ट आणि व्हिजा असणे आवश्यक आहे. आपल्याला ही गोष्ट बरीच अवघड वाटत असेल की कोणत्या रेल्वे स्थानकावर पासपोर्ट असणे आवश्यक आहे. आणि काही लोकांना हा प्रश्न पडला असेल की असे कोणते रेल्वे स्थानक असेल की ज्या स्थानकावर पासपोर्ट असणे गरजेचे आहे? हो पासपोर्ट शिवाय जर आपण या स्थानकावर प्रवेश केला तर आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागेल.
सोबतच विना पासपोर्ट या स्थानकावर गेल्यास आपल्यावर कानुनी कारवाई केल्या जाऊ शकते. काही लोक तर जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक झालेले असतील, तर आणखी उत्सुकता न वाढवता पाहूया की कोणत्या रेल्वे स्थानकावर पासपोर्ट आणि व्हिसा असणे आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया..
भारतातील या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिजा आवश्यक – Need Passport and Visa for Atari Railway Station
भारताचे एकमेव असे रेल्वे स्टेशन आहे जे भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर आपल्याला पाहायला मिळते, आणि त्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे अटारी, या स्थानकावर आपल्याला विना पासपोर्ट आणि व्हिसा जाता येत नाही. जर आपण या स्थानकावर विना व्हिसा आणि पासपोर्ट प्रवेश केला तर आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो आणि आपल्यावर कारवाई सुध्दा होऊ शकते.
या स्टेशन वर गेल्यानंतर आपल्याला तिकीट घेण्यापूर्वी आपला व्हिसा आणि पासपोर्ट दाखवावा लागतो त्यानंतर तिकिटावर तुमच्या पासपोर्ट चा क्रमांक छापल्या जातो आणि त्यांनंतर आपल्याला तिकीट मिळतं.आणि त्या नंतरच सीट, आपल्या देशाचं हे एकमेव रेल्वे स्टेशन असेल ज्यावर दिवसाचे २४ तास कडक पोलीस बंदोबस्त असतो, आणि देशाच्या गुप्तचर संघटना कार्यरत असतात.
या रेल्वे स्थानकावर आपल्याला कोणत्याही प्रकारचे कुली मिळणार नाहीत येथे प्रत्येकाला आपले सामान स्वतः घेऊन जावे लागते. त्यांनंतर या स्थानकावर गाडीला हिरवा झेंडा दाखविण्या अगोदर सर्व प्रवाशांना एक वेळ विचारल्या जाते त्यांनंतर च रेल्वे गाडीला सोडल्या जाते.
जर काही कारणास्तव रेल्वे गाडीला उशीर झाला तर दोन्ही देशांच्या रेल्वे मुख्यालयाला कळविले जाते. आणि दोन्ही देशांच्या रजिस्टर मध्ये या गोष्टीची नोंद केल्या जाते. आपल्या माहिती साठी या स्टेशन वर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आणि या स्टेशन वर २४ तास सैनिकांचा काटेकोर पणे बंदोबस्त असतो. या स्थानकाच्या आत मध्ये जाता येत नाही आणि आपल्याला जर जायचे असेल तर गृह मंत्रालयाच्या दोन विभागांची परवानगी घेऊन आतमध्ये जाता येते.
तर वरील लेखावरून आपल्याला या स्टेशन विषयी विशेष माहिती झाली असेल, आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!