Navnath Mantra
नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक गुरु मच्छिद्रनाथ यांना दत्त संप्रदायाचे निकटवर्तीय मानलं जाते. तसचं, नाथ परंपरे नुसार गुरु नवनाथ महाराज यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेय महाराज यांच्याकडून मिळाली असल्याची मान्यता आहे. यावरून असे गृहीत धरण्यात येते की, नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भिन्नता आढळून येत असली तरी, दत्त गुरू यांनी दोन्ही संप्रदायाना दीक्षा दिली असल्याने ते दोन्ही संप्रदायाकरिता पूजनीय आहेत.
यावरून दोन्ही संप्रदायात सलोख्याचे संबंध असल्याचे दिसून येते. दत्त संप्रदायानुसार, नाथ सांप्रदायिक सुद्धा नवनाथ पारायण पूजा विधी करीत असतात. नवनाथ महाराज यांच्या उत्त्पती संबंधी पुराणात सुद्धा अनेक दंतकथा प्रचलित आहेत. नवनाथ महाराज यांचा उल्लेख मच्छिद्रनाथ असा करण्यात आला असून त्यांचे प्रिय शिष्य हे गौरखनाथ सांगितले आहेत.
गौरखनाथ हे गुरु मच्छिद्रनाथ यांचे प्रिय शिष्य असल्याने त्यांनी आपल्या गुरूंच्या आज्ञानुसार आपले जीवन व्यतीत केले. आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला डोळा दान करून गुरूंची इच्छा पूर्ण केली. यावरून शिष्य गौरखनाथ यांचा आपले गुरु मच्छिद्रनाथ यांच्या प्रती असलेला विश्वास दिसून येतो. गुरु मच्छिद्रनाथ आणि गुरु गौरखनाथ यांच्या बाबत माहिती लिहावी तितकी कमीच. आज आपण या लेखाच्या माध्यमातून नाथ महाराजांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या नवनाथ मंत्र / स्त्रोत्राचे लिखाण करणार आहोत.
नवनाथ महाराजांचा मंत्र – Navnath Mantra
*।।श्री नवनाथ स्तोत्र।।*
जय जयाजी गणधिपा , ॐ कराच्या सगुण स्वरोपा ॥
प्रथम नमुनी तुला बाप्पा ॥ माय सरस्वती वंदितो॥ १॥
आ ता वंदन श्री गुरुनाथा ॥ दत्तात्रेय स्वामी समर्थ ॥
तुझिया चरनी ठेविला माथा ॥ स्फुर्थी दया नाथ कथा वर्णाया॥ २॥
तुम्ही गुरु नवनाथांचे चरण धरिले मी तुमचे॥
लले पुरवा बालकाचे ॥ वाव्हे स्थिर हृदयी माझ्या ॥ ३॥
तुमच्या दिव्या चरनांचे ध्यान॥ मी करितो ध्यान
म्हणुनी वस्ति येउन ॥ अंतरी माझ्या करावी ॥ ४॥
ही तुमचीच आहे इच्छा ॥ म्हणुनी जाहली मनीषा ॥
नाथ प्रताप दिव्या भाषा ॥ कवन रुपे गावी वाटे ॥ ५॥
मर्त्य लोकी कलि येता॥ धर्मं बुडाला सवर्था ॥
त्या वेळी गुरु नाथ ॥ घेवून आलात नाथाना॥ ६॥
प्रथम तो जहाला तो मछिन्द्रनाथ ॥ याचा जन्म मछली च्या उदरात॥
म्हणुनी नाम पावला तेच सत्य ॥ कलियुगी आले कवि नारायण ॥ ७॥
दूसरा तो जहाला जालंदरनाथ ॥ हा अंतरिक्ष नाथ नारायण समर्थ ॥
बरुहा द्रव राजाच्या यदन्न कुंडात॥ प्रगत झाला स्वामी माझा ॥ ८॥
तीसरा तो नागनाथ ॥ जन्म पावला नागिनिच्या उदरात ॥
हा अविर्होत्र नारायण समर्थ । धर्मं रक्षान्या प्रगटलासे ॥ ९॥
चौथा तो रेवंनाथ ॥ चमस नारायण सिद्ध समर्थ ॥
त्याचाच हा अवतार सत्य ॥ मृत्यु लोकी प्र गट ला से ॥ १०॥
पाचवा तो गोरक्ष नाथ ॥ हा प्र गट ला उकिरडयात ॥
हरी नारायण अवतार सत्य ॥ महा समर्थ सिद्ध योगी॥ ११॥
पिप्पा ला यण नारायण समर्थ ॥ सहाव्या अवतारी प्र गट ला ॥
नाम धरिले चर्पतिनाथ ॥ तारावया भाविकांना॥ १२॥
सातव्या अवतारी द्रमिल नारायण ॥ भरतुहारी म्हणुन ॥
आले अवतार धरून ॥ आद्न्या श्री हरीची म्हानुनिया ॥ १३॥
आठवा अवतार कानिफनाथ ॥ हा प्रबुद्ध नारायण समर्थ ॥
जन्म ला से गज कर्नात॥ सिद्ध योगी समर्थ हा ॥ १४॥
नवव्या अवतारी गहिनीनाथ ॥ कर्भंजन नारायण समर्थ ॥
मातीच्या पुतल्यात झाले प्रगट ॥ संजीवनी मंत्र जपता गोरक्षाने ॥ १५॥
ऐसे अस्ति नव नारायण ॥ अयोनि सम्भव यांचा जन्म ॥
यांची किमया जानन्या कोण ॥ समर्थ असे या धरेवरी॥ १६॥
असे नवनाथांचा भरी दरार ॥ काल कापे थरथरा ॥
देव दनावंचाही पारा ॥ उतरवला क्षणात नाथानी॥ १७॥
जो जो नित्य करील पठान ॥ दिव्य नवनाथांचे स्मरण ॥
त्याचे नासेल सारे दैन्य ॥ संसारी सुखी होइल तो ॥ १८॥
नवनाथ महाराज यांच्या उत्पत्तीसंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी, त्यांच्या उत्पत्ती संबंधित लोकांमध्ये बरेच मतभेद आहेत. नाथांचे नवनाथ कोण याबाबतीत अभ्यासकांचे सुद्धा एकमत नाही. नाथ संप्रदायाची अशी मान्यता आहे की, नाथ संप्रदायाला सिद्धी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात.
नाथ संप्रदायाबाबत विशेष माहिती सांगायची म्हणजे, महाराष्ट्र राज्यात या संप्रदायाचे लोक जास्त करून आढळतात. संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी सांप्रदायिक असले तरी, त्यांनी नाथ सांप्रदायिकांची दीक्षा घेतली होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडिल बंधू गुरु निवृत्तीनाथ यांच्याकडून मिळाली. त्यामुळे, संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी सांप्रदायिक असल्याने नाथ संप्रदायाचा संबंध वारकरी संप्रदायासोबत जोडल्या गेला.
अश्या प्रकारे नाथ संप्रदाय हा प्रत्येक संप्रदायासोबत कुठल्याना कुठल्या मार्गाने जोडला गेला असल्याने नाथ संप्रदायाचा उल्लेख अनेक संप्रदायांमध्ये आढळून येतो. नवनाथ म्हणजे भगवान नवनाथ यांचे नऊ अवतार असून याबाबत दंतकथा देखील प्रसिध्द आहेत.
भगवान नवनाथ हे एक सिद्ध पुरुष असल्याने आपण त्यांची नियमित आराधना केल्यास तसचं, त्यांना प्रसन्न करण्यासाठी नवनाथ मंत्राचे उच्चारण केल्यास आपणास त्यांचा लाभ मिळू शकतो. नवनाथ मंत्र म्हणजे साक्षात नवनाथ महाराज यांची विविध नामात आणि रुपात केलेली स्तुती होय.
या मंत्राच्या उच्चारण करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की, मंत्राच्या उच्चाराने मानवी जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण होते. मित्रांनो, वरील लेखातील संपूर्ण माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपणास सुद्धा या नवनाथ मंत्राचा लाभ व्हावा याकरिता आम्ही या लेखाचे लिखाण केलं आहे.