शीर्षक वाचल्या नंतर आपणही थोडेशे विचारात पडले असणार ना, कि असे कसे शक्य आहे, कि एका राज्यात तिकीट विकत घ्या आणि दुसऱ्या राज्यात रेल्वेत बसा. कारण नेहमी आपण एकाच स्टेशन वरून आपण तिकीट घेतो आणि त्याच स्टेशन वरून प्रवास सुरु करतो,
पण हे काय नवीनच ऐकायला आणि पाहायला मिळत आहे, कि एका राज्यात तिकीट घ्या आणि दुसऱ्या राज्यात रेल्वेत बसा.
हो आपण योग्यच वाचले आहे, पण यामागे काय कारण आहे ते आज आपण पाहणार आहोत, तर आजच्या लेखात आपण हे पाहणार आहोत कि एका राज्यात तिकीट घेऊन तुम्ही दुसऱ्या राज्यात रेल्वेत कसे बसू शकता, तर चला जाणून घेऊया.
एका राज्यात तिकीट घ्या आणि दुसऱ्या राज्यात रेल्वेत बसा. असे एक स्टेशन – Buy Tickets in One State and Board Train in Another
यासाठी आपल्याला खूप मोठी गोष्ट करावी लागणार नाही, आणि सरकार ने असा कोणताही नियम सुद्धा काढलेला नाही कि तुम्ही एका राज्यात तिकीट काढून दुसऱ्या राज्यात बसू शकत नाही, पण हो महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर एक गाव आहे.
या दोन राज्यांच्या सीमेवरील एक अनोखे गाव आहे, जेथे हि सुविधा आपण वापरून पाहू शकता, जेथे तुम्हाला एका राज्यात तिकिटाला पैसे देऊन तिकीट मिळेल आणि रेल्वेत बसण्यासाठी आपल्याला दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाव लागेल,
आहे ना कमालीची गोष्ट! आता पुढे या लेखात आपण त्या स्टेशन विषयी माहिती पाहूया.
कोणते आहे हे स्टेशन? – Navapur Railway Station
या स्टेशन चे नाव आहे नवापूर. नवापूर हे एक रेल्वे स्टेशन आहे, नवापूर हे एक साधारण रेल्वे स्टेशन नसून असे एक स्टेशन आहे जिथे दोन राज्यांच्या सीमा एकमेकांना जुळलेल्या आहेत, नवापूर हे स्टेशन महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते,
या स्टेशन वर रेल्वेचे तिकीट घर हे महाराष्ट्र राज्याच्या बाजूने आहे, आणि रेल्वेमध्ये बसण्यासाठी आपल्याला गुजरात राज्याच्या बाजूने जावे लागते. सोबतच या स्टेशन वर एक बसायचा बाकडा आहे जो सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे,
कारण या स्टेशन वर असलेल्या बाकड्याच्या एका बाजूला महाराष्ट्राची सीमा आहे तर दुसऱ्या बाजूला गुजरात ची सीमा आहे. नवापूर हे एकमेव रेल्वे स्टेशन असे आहे कि जे दोन्ही राज्यांच्या अंतर्गत येते.
या स्टेशन वर आपल्याला एका बाजूला महाराष्ट्र राज्याचे बोर्ड लागलेले दिसते तर दुसऱ्या बाजूला गुजरात राज्याचे बोर्ड लागलेले दिसते.
हे स्टेशन भुसावळ – सुरत मार्गावर आहे. सोबतच या स्टेशन वर चार भाषांमध्ये रेल्वे गाड्यांची घोषणा केली जाते, त्या अश्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती. या चार भाषांचा वापर केला जातो. कारण या स्टेशन वर येणाऱ्या महाराष्ट्राच्या आणि गुजरात च्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये.
या स्टेशन वर स्टेशन मास्टर गुजरात राज्याच्या बाजूने बसलेले असतात. तेच महाराष्ट्राच्या बाजूने तिकीटे मिळतात. आपण कधी या मार्गाने सुरत ला गेले असल्यास आपल्याला या स्टेशन विषयी माहिती असेलच.
येथे कसे जावे?
आपल्यालाही या स्टेशन ला भेट द्यायची असल्यास आपण या स्टेशन ला भेट देऊ शकता. फक्त आपल्याला भुसावळ वरून सुरत साठी गाडी पकडावी लागेल किंवा सुरत वरून भुसावळ साठी. आपणही या स्टेशन ला भेट देऊ शकता. वेळ असल्यास नक्की पहा हे ठिकाण.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!