Narak Chaturdashi Information in Marathi
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरककतुर्दशी! दिवाळीच्या पाचही दिवस पहाटे उठुन अभ्यंगस्नान करावे असे शास्त्रात सांगीतले आहे. पण मुख्यतः नरकचतुर्दशीला तर अभ्यंगस्नानाचे अनन्यसाधारण महत्व सांगीतले आहे.
या दिवशी भल्या पहाटे उठुन सुगंधी उटणे आणि तेल लावुन स्नान केल्या जातं. या स्नानाला अभ्यंगस्नान असं म्हणतात. हे केवळ देहाचे अभ्यंगस्नान नसुन आपल्या मनातील पाप वासनांना नष्ट करून आपल्यातील अहंकाराला संपवावे त्यामुळे आत्म्यावरचे अहंकाराचे मळ दुर होईल व आत्मज्योत प्रकाशीत होईल असा यामागचा अर्थ सांगण्यात आला आहे.
अर्धे स्नान झाल्यानंतर अंघोळ करणाऱ्या औक्षवण करण्याची प्रथा आहे. औक्षवण करण्याकरीता कणकेच्या दिवा तेल हळद टाकुन तयार करावा आणि त्याने औक्षवण करावे…
दिपावली सणाचा दुसरा दिवस “नरककतुर्दशी” – Narak Chaturdashi in Marathi
नरकचतुर्दशी या दिवसामागील पुराणातील कथा – Narak Chaturdashi Historical Story
आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या जुलमातुन अनेकांना मुक्त केले.
नरकासुर हा प्राग्ज्योतिषपुराचा राजा होता. सुरूवातीला त्याने योग्यतेने राज्यकारभार सांभाळला परंतु बाणासुराच्या संगतीत तो दृष्ट विचारांचा झाला. त्याचा अन्याय एवढा विकोपाला गेला की वशिष्ठांनी नरकासुराला भगवान विष्णुंच्या हातुन मृत्यु येण्याचा शाप दिला.
नरकासुर या शापाने चिंतीत झाला आणि कठोर तपश्चर्या करून त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून घेतले. कुणाकडुनही मृत्यु येणार नाही असा त्याने ब्रम्हदेवांकडुन वर मिळविला आणि त्याच्या अन्यायांना पुन्हा वाचा फुटली. सामान्यांचा छळ करणे, स्त्रियांना पळवुन नेणे ही कर्म तो करू लागला त्याने अगणीत संपत्ती लुटली आणि १६१०० स्त्रियांना बंदी बनवुन मणिपर्वतावर ठेवले.
त्याला मिळालेल्या वरदानामुळे तो देव, गंधर्व आणि सामान्य मनुष्य जातीकरता प्रचंड त्रासदायक झाला होता.
भगवान श्रीकृष्णांनी गरूडावर स्वार होत अनेक पर्वतांनी वेढलेल्या प्राग्ज्योतिषपुरावर स्वारी केली. नरकासुराचा वध करत त्याच्या देहाचे दोन तुकडे केले. नरकासुरवधामुळे प्रजा आनंदी आणि समाधानी झाली. देव आणि गंधर्व आनंदी झाले. नरकासुराने ज्या १६१०० स्त्रियांना बंदी बनविले होते त्यांना त्यांचा परिवार पुन्हा स्विकारणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व स्त्रियांसमवेत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली.
नरकासुराने मरतांना भगवान श्रीकृष्णाला वर मागीतला. आजच्या दिवशी पहाटे उठुन मंगल स्नान करणाऱ्याला नरक यातनांपासुन मुक्ती मिळावी. श्रीकृष्णाने त्याला वर दिला त्यामुळे नरकचतृर्दशीला पहाटे अभ्यंगस्नानाची प्रथा पडली. त्यामुळे आजच्या दिवशी जे लोक पहाटे उठुन स्नान करीत नाही अश्यांची वर्षभर दारिद्रय आणि संकटे पाठ सोडत नाहीत अशी समजुत आहे.
ज्या समयी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला त्यावेळी त्याच्या रक्ताचे शिंतोडे श्रीकृष्णावर उडाले. ते सर्व स्वच्छ करण्याकरीता भगवंताने सुगंधी तेल आणि उटण्याने स्नान केले आणि तेव्हांपासुन अभ्यंगस्नानाची परंपरा सुरू झाली अशी देखील आख्यायिका सांगीतली जाते.
नरकासुराची माता भुदेवीने सर्व प्रजेला उद्देशुन सांगीतले की नरकासुराच्या वधावर शोक करू नये तर त्याचा मृत्यु आनंदपर्व म्हणुन साजरा व्हावा. कुणा एकाच्या आनंदापेक्षा आणि स्वार्थापेक्षा सर्व प्रजेचे सुख समाधान जास्त महत्वाचे असते असा संदेश नरकचतुर्दशीचे पावन पर्व आपल्याला देतो.
आशा करतो या लेखाद्वारे आपल्या ज्ञानात भर पडली असेल, जर आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
Thank You So Much And Keep Loving Us!