Naming Ceremony Wishes in Marathi
प्रत्येक व्यक्तिची ओळख हि ज्या दिवसापासून निर्माण होते तो दिवस म्हणजे नामकरण सोहळा अर्थातच बारसं. जन्मापासून १२ दिवसानंतर होणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमात नातेवाईक, मित्र या सगळ्यांचा समावेश असतो, प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने या कार्यक्रमात लहान बाळासाठी काहींना काही भेटवस्तू, खेळणे, सोन्याची चैन, कंबरपट्टा अशा काही भेटवस्तू घेऊन येत असतात. आणि याच दिवशी बाळाचे नाव ठेवण्यात येत असते.
मग सुरुवातीला लहान बाळाला त्याची आई नटवून थटवुन त्याला पाळण्यात टाकते, पाळण्यात टाकल्यानंतर लहान लहान मुले त्या पाळण्याच्या अवतीभोवती जमा होतात, याच दरम्यान तिथे महिला मंडळ गाणे म्हणतात, त्यानंतर बरेचश्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत आणि त्याच निमित्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत, Naming Ceremony Quotes आजच्या लेखात आपण ह्या विषयावर काही Quotes पाहणार आहोत, तर चला पाहूया…
नामकरण सोहळ्यासाठी मराठी मॅसेज – Naming Ceremony Quotes in Marathi
![Naming Ceremony Quotes in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naming-Ceremony-Quotes-in-Marathi.jpg)
आज आपल्या आयुष्यातील खास दिवस, आपल्या मुलाच्या नामकरण दिवसाबद्दल हार्दिक अभिनंदन.
Naming Ceremony Quotes
![Naming Ceremony Quotes](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naming-Ceremony-Quotes.jpg)
ओठांवर हसू गालावर खळी आमच्याकडे उमलली आहे छोटीसी कळी.
Naming Ceremony Message in Marathi
![Naming Ceremony Message in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naming-Ceremony-Message-in-Marathi.jpg)
कृष्णाचा यशोदेला ध्यास, आई –बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन खास, ‘पुत्ररत्न ‘ च्या नामकरण सोहळ्याचा हार्दिक शुभेच्छा.
Naming Ceremony Message
![Naming Ceremony Message](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naming-Ceremony-Message.jpg)
आजपर्यंतर ‘घर’ हे नुसते घर होते, बाळाच्या येण्याने ते ‘गोकुळ’ होऊन गेले. नवजात बालकास आशीर्वाद व शुभेच्छा.
Naming Ceremony Invitation SMS in Marathi
![Naming Ceremony Invitation SMS in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naming-Ceremony-Invitation-SMS-in-Marathi.jpg)
पहिली बेटी धनाची पेटी ‘कन्यारत्न ‘ झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
नामकरण सोहळा साठी कोट्स – Barshyachya Shubhechha
महिला मंडळाचा गाण्यांचा कार्यक्रम झाल्यावर बाळाला पाळण्यात टाकून नाव ठेवण्याचा कार्यक्रम सुरू होतो, परिवारातील एक एक सदस्य बाळाचे नाव ठेवण्यासाठी पुढे येतो, बाळाची आत्या पाळण्यातील बाळाच्या कानात नाव बोलते, आणि ते नाव सर्वांना सांगितल्या जाते. असे करता करता बाळाची मावशी, आई, आजी ह्या सर्व त्यांच्या मनातील नाव बाळाला देतात त्यानंतर त्या दिवस पासून बाळाला दिलेल्या त्या नावापासून ओळखल्या जात, पण एक नाव असं असतं ज्या नावाने आई वडील मुलाला हाक मारतात आणि पुढे भविष्यात त्या बाळाच्या आई वडिलांनी ठेवलेले नाव त्याची ओळख बनतं.
त्यानंतर जीवन भर त्या नावासोबत तो व्यक्ती जगतो आणि जीवनात त्याच नावाला मोठं करण्यासाठी लढत असतो. आणि या नावामुळे त्याला पूर्ण जग ओळखू लागतो, आणि याची सुरुवात होते त्या नाव ठेवण्याच्या कार्यक्रमापासून आजच्या लेखनातही नाव ठेवण्याच्या कार्यक्रमावर वर काही Naming Ceremony Quotes पाहिले, पुढे आणखी काही Namkaran Quote पाहणार आहोत. तर चला पुढेही पाहूया काही Naming Ceremony Quotes.
![Barshyachya Shubhechha](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Barshyachya-Shubhechha.jpg)
इटुकले पिटुकले माझे हात, इवले इवले माझे गाल, गोड गोड किती छान, सर्वांची मी छकुली लहान, आज माझा नामकरण सोहळा.
Naamkaran Wishes in Marathi
![Naamkaran Wishes in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naamkaran-Wishes-in-Marathi.jpg)
आपल्या मुलाची काळजी देव त्याच्या अद्भुत प्रेमाद्वारे घेवो हाच आशीर्वाद. अभिनंदन!
Naming Ceremony Wishes in Marathi
![Naming Ceremony Wishes in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Naming-Ceremony-Wishes-in-Marathi.jpg)
मी तुम्हाला नामकरण सोहळ्यासाठी आजीवन शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासू नये. देव सदैव तुमच्या पाठीशी राहो.
Quotes for Naming Ceremony
![Quotes for Naming Ceremony](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Quotes-for-Naming-Ceremony.jpg)
नवजात शिशुच्या नामकरण सोहळ्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! देव सदैव आपल्या मुलाचे रक्षण करो, हीच प्रार्थना.
Namkaran Sohala Quotes in Marathi
![Namkaran Sohala Quotes in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/05/Namkaran-Sohala-Quotes-in-Marathi.jpg)
नवजात बाळाच्या आगमनामुळे आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, आपल्या आयुष्यातील आनंद असाच राहो, हीच प्रार्थना.
ज्याप्रमाणे शेक्सपियर म्हणतात नावामध्ये काय आहे, नावामध्ये बरेच काही आहे जसे नावामुळे जगाला आपली ओळख कळते, आपण कोण आहे हे जगाला माहिती होतं. आणि माणसाचं संपूर्ण आयुष्य हे नाव कमविण्यात निघून जात कळतही नाही. आणि या आयुष्यातून गेल्यावर माणसाला त्याच्या नावाने आठवण केल्या जात. म्हणून नाव असणे खूप महत्वाचे आहे. नाव नसते तर व्यक्तींना ओळखल्या गेलं नसतं. आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये सर्वांना ओळखण्यास कठीण झाले असते.
याच Naming Ceremony Quotes लिहिले आहेत, आशा करतो आपल्याला हे लिहिलेले Quotes आवडले असतील. आपल्याला आवडल्यास या Barshyachya Quotes ना आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!