काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली, पण लाडक्या भावांच काय? तर ह्याच उत्तर सरकार कडून आता मिळालेल आहे. पंढरपूर ह्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ह्याबद्दल घोषणा केली आहे. योजने अंतर्गत जे तरुण १२ वी उत्तीर्ण झालेत त्यांना दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा झाला असलेल्या तरुणांना ८ हजार रुपये, आणि ग्रॅजुएट(पदवीधर) असलेल्या तरुणांना मिळणार १० हजार रुपये.
नक्की योजना काय, आणि कोण असेल पात्र, हे जाणून घ्यायला हा लेख पूर्ण वाचा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – Mukhyamantri Yuva Internship Yojana
नेमकी योजना काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी योजनेबद्दल सांगतांना तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणारे लाभ सांगितले, पण तरी सुद्धा योजनेबद्दल पुष्कळ प्रश्न अजून ही डोक्यात घर करून बसले आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेच्या काही दिवसानंतरच “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना“, ह्या योजनेचा GR सादर करण्यात आला होता.
ह्या योजनेमध्ये देखील १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना दरमहा ६ हजार रुपये वेतन, डिप्लोमा झाला असलेल्या तरुणांना ८ हजार रुपये वेतन, आणि ग्रॅजुएट(पदवीधर) असलेल्या तरुणांना १० हजार रुपये वेतन जाहीर करण्यात आले, ज्यामध्ये उमेदवारांना इंटर्नशिप च्या संधी दिल्या जातील आणि त्यासाठी दरमहा वेतन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार असेल जे आपण आधीच पाहिले. तर मुख्यमंत्र्यांनी जी योजना सांगितली ती योजना हीच असेल, का काही वेगळी योजना असेल हे काही अद्याप कळलेल नाही.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
लाडकी बहीण योजना आणल्यावर “लाडक्या बहीणींसाठी योजना आणलीत, आता भावांच काय?” अशी टिका झालेली, आणि त्याच प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले कि लाडक्या भावांकडे ही आमच लक्ष आहे, आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी देखील योजना आणलेली आहे, ज्या अंतर्गत १२ वी उत्तीर्ण झालेल्या तरुणाला दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेला असलेल्या तरुणाला ८ हजार रुपये, आणि ग्रॅजुएट असलेल्या तरुणाला मिळतील १० हजार रुपये.
त्यासाठी तरुण एखाद्या कारखान्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल, ज्याने त्याला अनुभव मिळेल, आणि त्या अनुभवाच्या दमावर त्याला नौकरी देखील मिळेल.
अश्या प्रकारे कुशल कामगार तयार होतील, आणि बेरोजगारी चा जो मोठा प्रश्न समोर उभा आहे, त्याला सुद्धा लढा देता येईल.
ह्या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला सरकार च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करावा लागेल. योजनेबद्दल संपूर्ण माहिती जोपर्यंत समोर येत नाही, किवा नेमकी योजना नक्की काय, हे जोपर्यंत पूर्ण कळत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही.
आणि हो, शासन जे वेबसाइट जाहीर करेल, त्या वेबसाइट वरूनच तुम्हाला अर्ज करायचं आहे, कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. आपली महत्वपूर्ण माहिती अनधिकृत स्त्रोतांना देऊ नका. योग्य माहिती आणि अधिकृत घोषणांसाठी फक्त अधिकृत सरकारी स्रोतांचीच वाट पाहा, आणि आम्ही सुद्धा तुमच्या पर्यन्त माहिती पोचवत राहू.
तर आपण आज मुख्यमंत्री शिंदे ह्यांनी केलेल्या योजनेच्या घोषणेबद्दल पाहिल. ही योजना नेमकी काय, आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि मुख्यमंत्री लाडक्या भावांबद्दल बोलले ती योजना हीच का वेगळी, हे सुद्धा अजून पूर्णपणे कळलेल नाही.
अधिक माहिती साठी आमच्या सोबत जुळून रहा, आम्ही तुमच्या पर्यन्त अश्याच योजनांची माहिती पोचवत राहू.