महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली आहे. ह्या योजने करीत १ जुलै पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तरी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै ठेवलेली आहे. महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांना ही योजना खूप उपयोगकारी ठरणार आहे.
ह्या लेखाद्वारे आपण जाणून घेऊत कि ही योजना नेमकी काय आहे, लाभ काय आहेत, आणि कोणाला हे लाभ मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना -Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
जस ह्या योजनेच नाव सांगत, हि योजना महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याकरिता, व त्यांच्या पोषण व आरोग्यामद्धे सुधारणा करिता सुरू केलेली आहे.
ह्या योजने अंतर्गत जे ही महिला पात्र ठरतील, त्यांना कालावधी दरम्यान प्रत्येकी दर महा १,५०० रुपये इतकी रक्कम त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात येईल.
योजनेस कोण पात्र?
ह्या योजने करता लाभार्थी म्हणून महाराष्ट्र राज्यातील वयोगट २१ ते ६० मधील विवाहित, विधवा, घटस्फोटित, व निराधार महिला असतील.
योजनेसाठी पात्र ठरण्याकरिता पात्रता –
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, व निराधार महिला पात्र.
- वयोगट २१ ते ६०.
- अर्ज करणाऱ्या लाभार्थी चे बँकेत खाते असणे आवश्यक.
- लाभार्थी चे कौटुंबिक उत्पन्न रुपये २.५ लाखाहून जास्त नसावे.
योजनेसाठी कोण पात्र नाही?
- महिला ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न रुपये २.५ लाखाहून जास्त आहे.
- महिला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत.
- ज्यांच्या कुटुंबामध्ये संयुक्तपणे ५ एकरपेक्षा जास्ती जमीन आहे, अश्या महिलांना लाभ मिळणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ४ चाकी वाहन नोंदणीकृत आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कॉंट्रॅक्ट वर कर्मचारी म्हणून सरकारी विभागात कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त झाल्यावर निवृत्तीवेतन घेत आहेत.
तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेने घ्यायलाच हवा. ही योजना तुम्ही नक्कीच तुमच्या जवळपास च्या प्रत्येक गरजू महिले पर्यन्त पोहचवा, त्यांना ह्या योजनेचा लाभ सांगा, व अर्ज करण्यास, आणि लाभ घेण्यास त्यांची मदत करा. ह्या योजनेसाठी अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरून केला जाऊ शकतो, पण लक्षात ठेवा, योजनेचा अर्ज कालावधी १५ जुलै ठरविण्यात आला आहे, तरी लवकरच अर्ज करून ठेवा. अश्या अनेक योजना आम्ही तुमच्या पर्यन्त पोचवत राहू.