MSW Course Information in Marathi
मित्रांनो जसे कि आपल्याला माहित आहे आजचे युग हे शिक्षणाचे युग आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच उच्चशिक्षण हे सुद्धा जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अनन्य साधारण आहे. आजच्या पिढीला पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजाशी जोडणाऱ्या शिक्षणाची सुद्धा गरज आहे. असाच एक सुवर्णमध्य आपल्याला एम. एस. डब्ल्यू. (MSW) कोर्समध्ये पाहायला मिळू शकतो. होय, जर आपल्याला सामाज शास्त्रामध्ये रस असेल तर हा कोर्स आपल्यासाठीच आहे.
एम. एस. डब्ल्यू. (MSW) कोर्सबद्दल संपूर्ण माहिती – MSW Course Information in Marathi
एम. एस. डब्ल्यू. (MSW) कोर्सची माहिती – MSW Course Details
कोर्सचे नाव (Name of Course) | एम.एस.डब्ल्यू. (MSW) |
पूर्ण अर्थ (Full Form) | मास्टर ऑफ सोशल वर्क (Master of Social Work) |
शैक्षणिक पात्रता (Eligibility) | कुठल्याही शाखेची पदवी (Graduation in any stream) |
कालावधी (Duration) | २ वर्ष (2 years) |
परीक्षा पद्धती (Exam Type) | सेमिस्टर पद्धती (Semester Pattern) |
शुल्क (Fees) | १ ते २ लाख (अंदाजे) (1 – 2 Lakh) (Approx.) |
एम. एस. डब्ल्यू. कोर्सचा पूर्ण अर्थ – MSW Course Full Form in Marathi
एम. एस. डब्ल्यू. (MSW) चा पूर्ण अर्थ म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क (Master of Social Work). समाजातील सर्वसमावेशक घटकांचा अभ्यास या कोर्समध्ये समाविष्ट करून घेण्यात आला आहे.
एम. एस. डब्ल्यू. कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता – MSW Course Eligibility
कुठल्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून कमीत कमी ५०% गुणांसह पदवीची परीक्षा उत्तीर्ण. काही महाविद्यालयात या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला बी.एस.डब्ल्यू. मधील पदवी गरजेची आहे. परंतु समाज शास्त्र आणि कला शाखेचे विद्यार्थी सुद्धा या कोर्साठी पात्र आहेत.
एम.एस.डब्ल्यू. कोर्स चा अभ्यासक्रम – MSW Course Syllabus
हा कोर्स २ वर्षाचा असून या साठीची परीक्षा ४ सेमिस्टर मध्ये घेण्यात येते. चारही सेमिस्टरला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. एम एस डब्ल्यू कोर्स चे मुख्य विषय :
- सोशल वर्क
- एनालिसिस ऑफ इंडियन सोसायटी
- वूमन एन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट
- सोशल वर्क एन्ड जस्टीस
- कम्युनिटी ऑर्गनायझेशन
- लेबर वेलफेयर एन्ड लेजिस्लेशन इ. असतात.
एम. एस. डब्ल्यू. कोर्स शुल्क – MSW Course Fees
या कोर्स साठी आपल्याला जवळपास १ ते २ लाखांपर्यंत शुल्क लागू शकते. तसेच आपण कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहात यावर सुद्धा हा शुल्क आधारित असतो.
एम. एस. डब्ल्यू. कोर्सचा कालावधी – MSW Course Duration
कोर्सचा कालावधी २ वर्षाचा आहे. या २ वर्षांत विध्यार्थ्यांना ४ सेमिस्टर परीक्षा द्याव्या लागतात.
एम. एस. डब्ल्यू. प्रवेश प्रक्रिया – MSW Admission Process
कोर्सला गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. काही महाविद्यालयांत प्रवेशासाठी पूर्व परीक्षा सुद्धा घेण्यात येते तर काही ठिकाणी मुलाखत घेण्यात येते.
एम. एस. डब्ल्यू. कोर्ससाठी काही नामांकित महाविद्यालय – MSW Colleges
- युनिवर्सिटी ऑफ दिल्ली, दिल्ली
- टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्स, मुंबई
- जामिया मिलिया इस्लामिया महाविद्यालय, दिल्ली
- गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद
- मद्रास क्रिश्चन कॉलेज, चेन्नई इ.
एम. एस. डब्ल्यू. कोर्समध्ये नोकरीच्या संधी – Job Opportunities after MSW
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खालील पदांवर कार्य करू शकता :
- महिला व बालकल्याण विभाग
- सामाजिक न्याय आणि रोजगार विभाग
- मानव संसाधन विभाग
- सहाय्यक शिक्षक
- एन.जी.ओ. मध्ये प्रकल्प अधिकारी
- एन.जी.ओ. व्यवस्थापक
- सामाजिक कार्यकर्ता इ.
एम. एस. डब्ल्यू. (MSW) कोर्सबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Questions to Ask about MSW Course
१. एम. एस. डब्ल्यू. कोर्सचा पूर्ण अर्थ काय?
उत्तर: मास्तर ऑफ सोशल वर्क (Master of Social Work).
२. एम. एस. डब्ल्यू. कोर्सचा कालावधी किती वर्षांचा आहे?
उत्तर: २ वर्ष.
३. एम. एस. डब्ल्यू. कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: ५०% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण.
४. एम. एस. डब्ल्यू. कोर्समध्ये शासकीय नोकरीची संधी आहे का?
उत्तर: होय, हा कोर्स केल्यानंतर आपण शासनाच्या विविध विभागांत कार्य करू शकता.
५. एम. एस. डब्ल्यू. कोर्ससाठी किती शुल्क लागेल?
उत्तर: या कोर्ससाठी जवळपास १ ते २ लाख शुल्क लागू शकतो.