आजच्या 21 व्या शतकात सर्व माहितीची देवाण-घेवाण हि डिजिटल होत आहे, सर्वकाही ऑनलाइन होत आहे. माहिती हि डिजिटल फॉर्म मध्ये संग्रहित आणि प्रदर्शित केली जात आहे.
अशावेळेस, आजच्या बदलत्या काळानुसार आपल्याला सुद्धा डिजिटल साक्षर होणे हि काळाची गरज बनलेली आहे. ज्याला कंप्यूटर येत नाही तो खूप मागे आहे अस समजल्या जाते, म्हणून कंप्यूटर बद्दल माहिती असणे हे खूप महत्वाचे झाले आहे.
कंप्यूटर शिकण्यासाठी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे कोर्सेस घेतात, त्यातीलच एक कोर्स म्हणजे MSCIT. हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोर्स आहे. हा कोर्स फक्त महाराष्ट्रामध्येच चालतो.
आपण इथे या article मध्ये MSCIT कोर्स बद्दल बरीच माहिती घेणार आहोत, जस MSCIT कोर्स काय आहे, या कोर्सचे काय फायदे आहेत, हा कोर्स कसा करावा, हा कोर्स करण्यासाठी काय निर्धारित मापदंड आहेत, कोर्स केल्यानंतर पुढे काय काय संधी उपलब्ध आहेत, ह्या सर्व बाबतीत आपण इथे चर्चा करणार आहोत.
चला तर जाणून घेऊया आणखी माहिती आपल्या लोकप्रिय MSCIT कोर्स बद्दल.
MSCIT कोर्स बद्दल संपूर्ण माहिती – MSCIT Course Information Marathi
MSCIT कोर्स details:
Full form | Maharashtra State Certificate in Information Technology |
Course type | माहिती तंत्रज्ञान (आयटी) |
Course duration | 2-3 महिने ( थोड कमी जास्त होऊ शकत) |
Course fee | कोर्स फीस बदलू शकते, म्हणून ह्या ऑफिशियल पेज वर जाऊन फीस पाहा |
Course eligibility | कुठल्या शिक्षणाची अट नाही |
Course benefits | संगणक क्षमता वाढवतो, रोजगार संधी सुधारतो, विश्वास वाढवतो, मान्यता प्राप्त प्रमाणपत्र पुरवतो |
Course provider | Maharashtra Knowledge Corporation Ltd (MKCL) |
Official Website | https://mscit.mkcl.org/ |
MS-CIT कोर्स काय आहे? – What is MS-CIT Course?
MSCIT हा एक Computer Certificate Course आहे, जो कि MKCL (Maharashtra Knowledge corporation limited) ने २००१ मध्ये सुरु केला. फक्त MKCL नाही तर MSBTE (Maharashtra State Board of Technical Education) चा पण हा कोर्स सुरु करण्यामध्ये महत्वाचा वाटा आहे.
MSCIT चा फुल फॉर्म “Maharashtra State Certificate in Information Technology” असा आहे.
MSCIT हा basic कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कंप्यूटर बद्दल बरीच माहिती मिळते, जसे कि कंप्यूटर कसा वापरायचा, कंप्यूटर चे काय काय काम आहेत, कंप्यूटर च्या पार्टस बद्दल माहिती आणि आणखी बरच काही.
हा कोर्स केल्याने आपल्याला कंप्यूटर वापरण्यामध्ये खूप आत्मविश्वास येतो, तसेच हा कोर्स महाराष्ट्र शासन अंतर्गत घेण्यात येतो. हा कोर्स केल्यानंतर व्यक्तीला महाराष्ट्र शासनाकडून सर्टिफिकेट दिल्या जाते, आणि या सर्टिफिकेट च्या बळावर आपण बऱ्याच क्षेत्रात जॉब साठी अप्लाय करू शकतो.
MSCIT कोर्स साठी Eligibility Criteria:
आता जस आपल्याला MSCIT कोर्स काय आहे ह्याबद्दल बरी माहिती आहे, तर आपण आता पाहूया कि MSCIT कोर्स करण्यासाठी काय पात्रता आहे?
तस पहिल्या गेल तर MS-CIT कोर्स करण्यासाठी कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही, लहानापासून तर मोठ्यापर्यंत कोणीही हा कोर्स करू शकतो. सर्वसाधारणता दहावी आणि बारावी झाल्यानंतर विद्यार्थी हा कोर्स करतात. परंतु आपण कुठल्या हि वयात हा कोर्स करू शकतो. हा कोर्स करण्यासाठी शिक्षणाची आणि वयाची काहीही अट नाही, फक्त हा कोर्स करण्यासाठी Information Technology ची आवड असायला पाहिजे. ज्यांना कंप्यूटर शिकण्याची आवड आहे ते हा कोर्स अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतात.
हा कोर्स करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या degree, किवा वय याची अट नाही, परंतु खाली दिलेल्या पॉइंट्स मुळे तुम्हाला कळेल कि MSCIT कोर्स तुमच्यासाठी आहे कि नाही –
- MS-CIT करण्यासाठी कंप्यूटर शिकण्यामध्ये रुची असायला पाहिजे.
- हा कोर्स करणारी व्यक्ती ०५वा वर्ग पास झाली असली तर फारच चांगल(हे अनिवार्य नाही)
MSCIT course फी structure:
आता आपण जाणून घेऊया MSCIT ह्या कोर्स च्या फीस बद्दल. तस फीस बद्दल बोलाव, तर फीस तशी बदलत राहू शकते, म्हणून आपल्याला जर MSCIT कोर्स ची फीस बघायची असेल, तर कृपया ह्या ऑफिशियल लिंक वर जाऊन पाहू शकता.
इतक तर नक्कीच कि ह्या कोर्स ची फी हि सामान्य माणसाला परवडणारी अशीच असते, जेणेकरून कोणी हि हा कोर्स अगदी सहज पणे करू शकेल. पण हे हि जाणून घ्या कि तुम्ही एक इन्स्टॉलमेंट मध्ये फीस भारता, कि दोन इन्स्टॉलमेंट मध्ये, ह्यानुसार सुद्धा फी मध्ये थोडा बदलाव बघायला मिळू शकतो.
MSCIT कोर्स Duration:
सर्वसाधारणपणे ह्या कोर्स चा जो कालावधी असतो तो २, ४ किवा 6 महिन्यांचा असतो, या कालावधी मध्ये MSCIT ची Theory, आणि Practical घेतल्या जाते. हा कोर्स करतांना आपल्याला दररोज साधारणतः १-२ तास आपल्याला संस्थेमध्ये जाऊन शिकावं लागतं. या कोर्स चा कालावधी जास्ती नसल्यामुळे आपण अगदी आरामात हा कोर्स पूर्ण करू शकतो.
Learning Activity | Duration |
---|---|
e-learning of classroom content (theory) | 50 hours |
e-learning of lab content (practical) | 50 hours |
Self-study, book reading, revision, practice | 44 hours |
Total hours | 144 hours |
पण आपण हा कोर्स ६० दिवसांमध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो.
MS-CIT कोर्स Website:
आपल्याला जर MS-CIT कोर्स बद्दल काही पण शंका असेल तर आपण https://mscit.mkcl.org/ वेबसाईट ला भेट देऊ शकतो. या वेबसाईट वर तुम्हाला MS-CIT कोर्स बद्दल अधिक माहिती मिळून जाईल.
MS-CIT कोर्स Admission Procedure:
MS-CIT कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत नाही, व हा कोर्स करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही. आपल्याला फक्त ALC (Authorized Learning Center) ला जावे लागते, हे शासन मान्य सेंटर असतात. नंतर तिथे आपल्याला एडमिशन घेण्यासाठी फोटो, आईडी प्रूफ, सिग्नेचर वगरे सबमिट करावी लागते आणि एडमिशन फीस भरून आपण थेट एडमिशन घेऊ शकतो.
ALC (Authorized Learning Center) मध्ये एडमिशन घेतल्यानंतर आपल्याला ठरलेल्या वेळेत ALC मध्ये जाऊन आपला कोर्स पूर्ण करावा लागतो. MS-CIT कोर्स साठी एडमिशन घेतल्यापासून ते MS-CIT सर्टिफिकेट मिळेपर्यंत सर्व जबाबदारी हि ALC center ची असते. कोर्सच्या कालावधी मध्ये आपल्याला खूप काही शिकवल्या जाते, आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर फायनल परीक्षा घेऊन आपल्याला सर्टिफिकेट दिल्या जाते.
MS-CIT कोर्स सिलेबस(MS-CIT Course Syllabus):
MS-CIT कोर्स मध्ये आपल्याला कंप्यूटर बद्दल बेसिक कन्सेप्ट्स शिकवले जातात. तसेच कंप्यूटर च्या वेगवेगळ्या पार्टस सुद्धा माहिती दिली जाते. तशाचप्रकारे कंप्यूटर कसे सुरु करावे आणि कसे बंद इथून शिकवल जात.
MS-CIT मध्ये कोणते Subjects, concepts घेतले जातात? (Subjects, concepts in MS-CIT कोर्स):
- Windows
- Internet basics
- Ms Word
- MS Excel
- MS PowerPoint
- MS Outlook
- Era
- Internet Explorer and Mobile apps
- Apply online Government Schemes and documents.
- Use of Mobile app and website
- Cyber Security
एवढेच नव्हे तर आणखी पण खूप concepts या कोर्स मध्ये पूर्ण केल्या जातात.
Detailed syllabus ऑफ MS-CIT कोर्स:
Subject | Information |
---|---|
Computer Basics | कंप्यूटर, आणि इनपुट, आउटपुट बद्दल माहिती |
Operating System | ऑपरेटिंग सिस्टम बद्दल माहिती सांगितली जाते |
21st Century Daily Life Skill | आज च्या काळात गरजेचे असलेले सर्विस बद्दल माहिती देण्यात येते, आणि त्याबद्दल शिकवल जात. |
21st Century Citizenship Skill | विद्यार्थी गवर्नमेन्ट च्या स्कीम मध्ये अप्लाय करू शकले पाहिजे, आणि आपले कागदपत्रे शोधू व हाताळू शकले पाहिजे. |
21st Century Study Skills | विद्यार्थी आपल्या अभ्यासाबद्दल माहिती इंटरनेट द्वारे पाहू आणि समझू शकले पाहिजे, व युटूब वर अभ्यासाचे व्हिडिओ पाहू शकले पाहिजे. |
21st Century Job Skills | विद्यार्थी आपले रेझ्यूमे, लेटर, प्रोजेक्ट, स्लाइड्स, वगरे अगदी सहज वापरू शकले पाहिजे. |
Word Processing (Microsoft Word) | विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर ला अगदी सहजच वापरू शकले पाहिजे, ते ही एडवांस लेवल वर. |
Spreadsheet (Microsoft Excel) | विद्यार्थी सहजच मायक्रोसॉफ्ट एक्सेल सॉफ्टवेअर ला वापरू शकले पाहिजे, व शीट वर्ती वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकले पहिजे. |
Presentation Graphics (Microsoft PowerPoint) | विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट हा सॉफ्टवेअर वापरू शकले पाहिजे, व सुंदर Presentations बनवू शकले पाहिजे. |
Personal Information Manager (Microsoft Outlook) | विद्यार्थ्यांना मेल पाठवणे वाचणे वगरे शिकवले जाते, तसेच त्यांना अपॉइंटमेंट्स वगरे सेव करायला शिकवतात. |
या सर्व सिलेबस वर आपल्याला आपल्या इंस्टीट्यूट मध्ये शिकवल जाते आणि हा सिलेबस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फायनल परीक्षा द्यावी लागते. फायनल परीक्षेला आपल्याला याच सर्व सिलेबस वर प्रश्न दिले जातात.
फायनल परीक्षा कशी होत असते?
MS-CIT ची फायनल परीक्षा अगदी महत्वाची असते सर्टिफिकेट मिळवण्याकरिता. तस परीक्षा म्हणल तर पॅटर्न थोडा बदलत राहू शकतो, म्हणून आम्ही तरी हेच सांगू कि परीक्षेबद्दल माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंट मध्ये पाहू शकता.
आपल्याला फायनल परीक्षे मध्ये पासिंग क्रायटीरिया असतो. आपल्याला पास होण्यासाठी एक ठराविक मार्क तेवढे मिळवणे आवश्यक असतात. हि परीक्षा पास केल्यानंतरच आपल्याला MS-CIT सर्टिफिकेट दिल्या जाते, जर आपण या परीक्षेमध्ये फेल झालो तर आपल्याला हि परीक्षा परत द्यावी लागते नंतरच आपल्याला सर्टिफिकेट मिळते. म्हणून आपण हि परीक्षा चांगल्या पद्धतीने देणं आवश्यक आहे.
MS-CIT नंतर च्या Job Opportunities (Job Opportunities after MS-CIT):
आपल्याला MS-CIT कोर्स मध्ये कंप्यूटर बद्दल बरीच माहिती दिली जाते, म्हणजेच आपण कंप्यूटर संबंधित कुठलेही काम करण्यास येथे सक्षम बनता.
सर्वात आधी तर आपण Government sector बद्दल बोलू, government sector मध्ये पुष्कळ काम हे कंप्यूटर संबंधित असतात जसे कि क्लार्क, अकाऊंटंट वगरे, तर आपण हा कोर्स केल्यानंतर या कामासाठी पात्र होतो. म्हणून जर तुम्हाला महाराष्ट्र government sector मध्ये जर काम करायचा असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता.
आपण आता प्रायवेट सेक्टर बद्दल बघूया, बघा प्रायवेट सेक्टर मध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला कंप्यूटर बद्दल खूप डीप माहिती असणे गरजेचे आहे. तसेच प्रायवेट कंपन्यानमध्ये कंप्यूटर languages पण येणे गरजेचे आहे. हे सर्व आपल्या MS-CIT कोर्स मध्ये नाही शिकवल्या जात म्हणून प्रायवेट सेक्टर मध्ये जर जॉब करायचा असेल तर आपल्याला कंप्यूटर बद्दल डीप माहिती घेण्यासाठी तसा कोर्स लावणे जरुरी आहे.
MS-CIT कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण खालील जॉब करण्यासाठी पात्र ठरतो.
- Computer Operator
- Data Operator
- Telecaller
- IT Consultant
- Network Administrator
- Interface Engineer
आणि आणखी पण खूप सर्व क्षेत्रात आपण जॉब करू शकतो जसे कि, banking, teaching, data analyst आणि खूप काही. आपल्याला जर या क्षेत्रात काम करायचे असेल तर आपण आणखी पण कंप्यूटर चे कोर्सेस करू शकतो.
Salary offered to MS-CIT Professional:
MS-CIT कोर्स केल्यानंतर आपल्याला सैलरी किती मिळेल, हा तर एक मोठा प्रश्न आहे. पण ह्याच उत्तर हि तितकच सोप आहे. तुम्हाला जी सैलरी मिळेल ती खूप गोष्टींवर अवलंबून आहे, जस कामाच स्वरूप, कामाची जागा, इत्यादी. तस बघायला गेलं तर MS-CIT हा कोर्स केल्यानंतर तुम्ही १०००० ते ४०००० पर्यंत सहज कमवू शकता, किवा त्याहून हि जास्त कमवू शकता, आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय हि सुरु करू शकता.
Candidate ची सैलरी हि त्यांच्यात असलेल्या स्किल्स आणि त्यांना असलेल्या अनुभवावर सुद्धा अवलंबून आहे. आपण हा कोर्स केल्यानंतर आणखी पण त्याच्या मध्ये प्रयास करून स्वतःला चांगल्या पद्धतीने विकसित करू शकता.
निष्कर्ष:
कंप्यूटर क्षेत्रात माहिती घेऊ इच्छित अश्या व्यक्तींसाठी MS-CIT हा कोर्से अत्यंत उपयोगी पडतो.
हा कोर्स केल्यानंतर व्यक्ती कुठल्याही प्रकारचे कंप्यूटर वर काम करण्यास सक्षम होतो, कारण हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कंप्यूटर बद्दल सर्वच बेसिक गोष्टींची माहिती होते, तसेच आपण कंप्यूटर कसे वापरावे, कसे बंद करावे, कंप्यूटर चा वापर करून कशाप्रकारे आपण वेगवेगळे काम करू शकतो अशी सर्व माहिती आपल्याला हा कोर्स केल्यानंतर मिळते. आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण पुष्कळ government sector मध्ये जॉब्स करण्यासाठी पण पात्र ठरतो.
म्हणूनच हा कोर्स खूप महत्वाचा आहे आपण केलाच पाहिजे. आपण या article मध्ये Mscit बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.
आम्ही आशा करतो कि तुम्हाला या कोर्स बद्दल सर्व माहिती मिळाली असेल आणि तुम्ही नक्कीच हा कोर्स करण्याचा विचार कराल.
FAQS About MS-CIT कोर्स:
उत्तर: MS-CIT हा कोर्स कॉम्पुटर बद्दल शिकायला इच्छुक अश्या लोकांसाठी आहे. ह्या कोर्स नंतर आपल्याला कॉम्पुटर बद्दल भरपूर अशी माहिती मिळते, व आपण कॉम्पुटर चा वापर अगदी सहजपणे करू शकता, व पुष्कळ अशे गवर्नमेंट सेक्टर मध्ये जॉब्स असतात ज्यामध्ये कंप्यूटर ची गरज असते, तर आपण त्या जॉब्स ला देखील पात्र ठरता.
उत्तर: हा कोर्स अगदी सहजपणे २ किवा ४ किवा 6 महिन्यात पूर्ण करता येतो.
उत्तर: कोर्स साठी लागणारा खर्च हा थोडा बदलत राहू शकतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन बघू शकता.
उत्तर: हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण खूप क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम होतो, जसे कि Banking, Financing, Data Operator, आणि Government जॉब्स देखील.