MS Dhoni in Marathi
महेंद्र सिंह धोनी ला आज एक चांगला क्रिकेटर म्हणुन सर्वदुर ओळख आहे. एम.एस धोनी या नावाने तो सुपरीचीत आहे. क्रिकेट जगतात त्याने आपल्या भारताचे नाव सर्वदुर चमकविले आहे. लहान गावातुन निघुन एक महान क्रिकेटपटु होण्यापर्यंत धोनी ला अनेक संघर्षामधुन जावे लागले. या संघर्षामधुन निघाल्यानंतर तो आज या ठिकाणी पोहोचलाय. जगापुढे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महेंद्र सिंह धोनी च्या जीवनाची अनोखी कहाणी – MS Dhoni Information in Marathi
महेंद्र सिंह धोनी विषयी थोडक्यात महत्वाचे – Mahendra Singh Dhoni Information in Marathi
पुर्ण नाव (Name): | महेन्द्र सिंग धोनी |
जन्म (Birthday): | 7 जुलै 1981, रांची, बिहार (भारत) |
उंची (Height): | 5 फुट 9 इंच (1.75 मीटर) |
पत्नी (Wife Name): | साक्षी धोनी |
वडील (Father Name): | पान सिंह |
आई (Mother Name): | देवकी देवी |
मुलगी (Childrens Name): | जीवा |
राष्ट्रीयत्व (Nationality): | भारत |
सुरूवातीच्या काळात महेंद्र सिंह धोनी करता हा प्रवास एवढा सहज सोपा मुळीच नव्हता पण क्रिकेट विषयी त्याला प्रचंड प्रेम आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी या त्यांच्या जमेच्या बाजु ठरल्या म्हणुन त्याने आज हे यश मिळविले आहे. आज धोनी भारतातील दिग्गज क्रिकेट खेळाडुंच्या यादीत पोहोचला आहे एवढेच नाही तर भारतिय क्रिकेट संघात आपल्या कर्णधार पदाने कित्येकांची मने जिंकली शिवाय संघाला चांगले मार्गदर्शन देखील केले.
शाळेत असतांनाच धोनीने क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती परंतु भारतिय क्रिकेट संघाचा हिस्सा होण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागली. ज्यावेळी त्याला भारताकडुन खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी त्याने या संधीचे अक्षरशः सोने केले व हळुहळु स्वतःला सिध्द केले. एवढेच नाही तर आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट विरांमधे ’’माही’’ चे नाव घेतले जाते, त्याने मर्यादित षट्कातही भारतिय संघाचे उत्तम नेर्तृत्व केले.
11 सप्टेंबर 2007 पासुन 4 जानेवारी 2017 पर्यंत महेन्द्र सिंग धोनी भारतिय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर होता व 2008 ते 28 डिसेंबर 2014 पर्यंत कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता. साहसी, रोमांचक व्यक्तिमत्व, व युनिक हेयरस्टाईल ठेवणारा धोनी भारताचा एक लोकप्रीय क्रिकेटर व मार्केटिंग आयकाॅन देखील ठरला आहे. धोनी एक यशस्वी, आक्रमक, उजव्या हाताचा फलंदाज व यष्टिरक्षक आहे.
माहीला आपल्या प्रतिभेचा थोडा सुध्दा गर्व नाही म्हणुन देखील तो भारताचा आवडता क्रिकेट खेळाडु आहे. धोनी त्या कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी ज्युनियर आणि भारतीय ए क्रिकेट संघाच्या क्रमवारीत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. माही एक ’’आदर्श’’ आणि पिन अप.स्टार देखील आहे.
माही ने भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघाला 2011 साली दुसरा विश्वकप मिळवुन देण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले आहे या विजयामुळे त्याचे फार कौतुक झाले आणि भारतीय संघातील सर्वात चांगला खेळाडु ठरला. धोनी ने 23 डिसेंबर 2004 ला बांग्लादेश विरूध्द भारताकडुन एकदिवसीय पहिला सामना खेळला.
पुढे 2007 ते 2016 पर्यंत भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावर राहिला आणि आपल्या प्रतिभेला सिध्द केले. धोनीने 2 डिसेंबर 2005 ला श्रीलंके विरूध्द कसोटी खेळाडु म्हणुन पहिला सामना खेळला होता 2008 ते 2014 पर्यंत तो कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होता.
आपल्या खेळातील आक्रमक शैलीमुळे त्याने विशेष ओळख तयार केली. माही भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या संघाचे चांगले नेर्तृत्व केले आणि अनेक सामन्यांमधे भारताला विजय मिळवुन दिला. या व्यतिरीक्त त्यांच्या नेर्तृत्वात अनेक नोंदी देखील आहेत.
त्याच्या नेर्तृत्वातच 2009 साली भारतिय संघ क्रमांक एक चा संघ बनला 2007 साली आयसीसी विश्वचषक 20.20 आणि 2013 आयसीसी चॅंपियंस ट्राॅफी जिंकतांनाच्या दरम्यान देखील महेंद्र सिंग धोनीने भारतिय क्रिकेट संघाचे नेर्तृत्व केले होते. आयपीएल सामन्यांमधे देखील माही ने अनेक आंतरराष्ट्रीय रेकाॅर्डवर आपले नाव कोरले आहे.
आपल्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स् च्या मदतीने 2010 आणि 2011 मधे दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.
महेंद्र सिंह धोनीचे बालपण आणि सुरूवातीचा काळ – MS Dhoni Chi Mahiti
धोनीचा जन्म 7 जुलै 1981 ला बिहार मधील रांची (आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे) येथे झाला. मुळात हा राजपुत परिवार उत्तराखंड मधील होता. त्यांचे वडिल पान सिंह मेकाॅन (स्टील मंत्रालया अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी कनिष्ठ व्यवस्थापन पदांवरही काम केले आहे.
आई देवकी देवी या गृहीणी आहेत. माही ला एक मोठा भाऊ (नरेंद्र सिंह धोनी) आणि एक मोठी बहिण (जयंती गुप्ता) आहे. भाऊ राजकारणात सक्रिय असुन बहिण इंग्रजी विषयाची शिक्षीका आहे.
झारखंड च्या रांची मध्ये श्यामाली इथं डीएव्ही जवाहर विद्या मंदिर मधुन धोनी ने आपले शालेय शिक्षण पुर्ण केले.तो एक अॅथलेटिक विद्यार्थी होता, सुरूवातीच्या काळात क्रिकेट पेक्षा बॅडमिंटन आणि फुटबाॅल या खेळांमधे त्यांला अधिक रूची होती. आपल्या शाळेतील फुटबाॅल टिमचा तो चांगला गोलकिपर म्हणुन ओळखला जायचा.
या दरम्यान धोनी च्या फुटबाॅल कोच ने त्याला स्थानीक क्लब च्या क्रिकेट टीम चा विकेटकिपर म्हणुन पाठविले. त्यावेळी धोनी ने आपल्या चांगल्या प्रदर्शनाने सगळयांनाच आकर्षीत केले आणि 1995 ते 1998 दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब टीम मधे नियमित विकेटकिपर म्हणुन स्थान मिळविले.
माही ने सुरूवातीपासुन चांगले प्रदर्शन केले आहे.1997.98 दरम्यान माही ला विनु मंकड ट्राॅफी करीता अंडर.16 चॅम्पियनशिप करीता निवडले. 10 वी नंतर माही ने क्रिकेटला गांभीर्याने घेण्यास सुरूवाती केली होती. क्रिकेट करता या दिग्गज खेळाडुला आपल्या शिक्षणासोबत मात्र तडजोड करावी लागली.माही ने 12 वी नंतर शिक्षण सोडले.
महेंद्र सिंह धोनीची सुरूवातीची कारकिर्द – MS Dhoni Career
1998 च्या दरम्यान भारताचा हा महान खेळाडु फक्त शालेय आणि क्लब स्तरावरच क्रिकेट खेळत होता त्याच वेळी कोल फिल्ड लिमीटेड संघात खेळण्याकरीता माही ची निवड झाली. या दरम्यान माही ने क्रिकेट असोसिएशन चे पुर्व राष्ट्रपती देवल सहाय यांना आपल्या दृढसंकल्पाने, कष्ट, आणि चांगल्या प्रदर्शनाने खुप प्रभावित केले.
त्यामुळे धोनी ला प्रथम श्रेणीतील क्रिकेट मधे खेळण्याची संधी दिल्या गेली. 1998.99 दरम्यान माही पुर्वी जोन यु.19 संघ किंवा इतर भारतिय संघ बनविण्यात यशस्वी होउ शकला नाही परंतु पुढच्या सत्रा मधे सीके नायडु ट्राॅफी करीता पुर्वी जोन यु.19 संघाकरता माहीची निवड झाली.
दुर्देवाने यावेळी धोनीच्या संघाने चांगले प्रदर्शन केले नाही परिणामी त्यांचा संघ निच्चांकावर घसरला.
रणजी ट्राॅफी ची सुरूवात – MS Dhoni Ranji Career
1999.2000 मध्ये धोनी ला रणजी ट्राॅफी खेळण्याची संधी मिळाली.बिहार विरूध्द आसाम असा हा सामना खेळला गेला.या सामन्यात महेंद्र सिंग धोनी ने नाबाद 68 धावा केल्या. पुढच्या सत्रामधे धोनी ने बंगाल विरूध्द सामना खेळला यात त्याने शतक मारले तरी देखील संघ हा सामना हरला.
या ट्राॅफी च्या सत्रात माही ने एकुण 5 सामन्यांमधे 283 धावा काढल्या.या ट्राॅफी नंतर धोनी ने स्थानिक स्तरावर अनेक सामने खेळले. धोनीच्या चांगल्या प्रदर्शनानंतर देखील ईस्ट जाॅन सिलेक्टर तर्फे त्यांची निवड करण्यात आली नाही, यामुळे धोनी खेळापासुन दुरावला आणि त्याने नौकरी करण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 20 व्या वर्षी माही ला खेळ कोटयातुन खडगपुर रेल्वे स्थानकावर ट्रॅव्हलिंग टिकीट परीक्षक (टीटीई) पदावर नौकरी मिळाली आणि तो पश्चिम बंगाल मधल्या मिदनापुर ला निघुन गेला.
2001 ते 2003 पर्यंत धोनीने रेल्वे कर्मचारी म्हणुन काम केलं.धोनी ला लहानपणापासुन खेळाची आवड असल्याने नौकरीत त्याचे मन जास्त काळ रमले नाही. दुलीप ट्राॅफीत निवड झाल्यावर देखील सामना खेळु शकला नाही. 2001 साली महेंद्र सिंग धोनी ची पुर्व क्षेत्रात दुलीप ट्राॅफी खेळण्याकरीता निवड झाली.
परंतु बिहार क्रिकेट असोसिएशन ही माहिती माहीला वेळेवर देऊ शकले नाही कारण माही त्यावेळी पश्चिम बंगाल मधील मिदनापुर येथे होता. धोनी ला ही माहिती त्यावेळी मिळाली जेव्हां त्यांची पुर्ण टिम अगरतला या ठिकाणी आधीच पोहोचली होती.या ठिकाणीच हा सामना खेळला जाणार होता.
माहीच्या मित्राने कोलकत्ता विमानतळावरून फ्लाईट पकडण्याकरता एका कारची सोय केली परंतु ती कार मध्येच खराब झाली आणि माही विमानतळावर वेळेवर पोहोचु शकला नाही. या सामन्यात दिपदास गुप्ता ने यष्टीरक्षक बनुन हा सामना खेळला.
देवधर ट्राॅफी टुर्नामेंट – MS Dhoni Deodhar Trophy Career
2002.2003 सत्रा दरम्यान धोनी ने रणजी ट्राॅफी आणि देवधर ट्राॅफीत चांगले प्रदर्शन सुरू ठेवले, त्यामुळे क्रिकेट विश्वात त्याला ओळख मिळाली.
2003 मधे जमशेदपुर इथं प्रतिभा संसाधन विकास विंग च्या झालेल्या सामन्यात माजी कर्णधार प्रकाश यांनी माहीला खेळतांना पाहिले आणि धोनीच्या खेळाची माहिती त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ला दिली आणि अश्या त.हेने धोनी ची निवड बिहार अंडर.19 संघाकरता झाली. पुर्व जोन संघातर्फे धोनीने 2003 – 2004 सत्रात देवधर ट्राॅफी स्पर्धेत भाग घेतला.
धोनीने हा सामना जिंकला आणि देवधर ट्राॅफी आपल्या नावावर केली. या सामन्यात धोनीने आणखीन एक शतक झळकवले. या सत्रात माहीने एकुण 4 सामने खेळले होते यात त्याने 244 धावा बनविल्या. 2003.2004 सत्रात धोनीची झिम्बाॅम्बे आणि केनिया दौ.याकरीता ’भारतिय संघात’ निवड करण्यात आली होती.
’इंडिया ए टीम’ तर्फे धोनी पहिला सामना झिम्बाॅम्बे इलेवन विरूध्द यष्टिरक्षक म्हणुन खेळला.सामन्या दरम्यान 7 झेल त्याने पकडले आणि स्टंपींग केली. महेंद्र सिंग धोनी ने आपल्या संघाची ’पाकिस्तान ए’ संघाला हरविण्यात देखील मदत केली.या सामन्या दरम्यान धोनी ने अर्धशतक झळकविले.
धोनीने अश्या त.हेने तीन देशांसमवेत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधे चांगले प्रदर्शन केले.त्याचा खेळ पाहुन त्याच्यातली प्रतिभा भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली च्या देखील लक्षात आली.
महेंद्र सिंग धोनीची एकदिवसीय सामन्यातील कारकिर्द – MS Dhoni One Day Career
सतत आपल्या चांगल्या प्रदर्शनामुळे 2004.2005 साली महेंद्र सिंग धोनीची निवड राष्ट्रीय एकदिवसीय सामन्याकरीता झाली. आपला पहिला एकदिवसीय सामना त्याने बांग्लादेश संघा विरूध्द खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात धोनी चांगले प्रदर्शन करू शकला नाही आणि केवळ शुन्यावर बाद झाला.
खराब प्रदर्शना नंतर देखील धोनीच्या नशीबाने त्याला साथ दिली आणि म्हणुनच पाकिस्तान विरूध्द खेळल्या जाणा.या एकदिवसीय सामन्यासाठी निवडसमीतीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. या वेळी मात्र धोनीने निवडकत्र्यांना आणि क्रिकेट रसिकांना निराश केले नाही आणि या सामन्यात जिद्दीने आणि जोमाने पाकिस्तान विरूध्द उत्तम प्रदर्शन केले.
या सामन्यात धोनीने 148 धावा काढुन पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज होण्याचा बहुमान मिळवीला. महेंद्र सिंग धोनीला भारत – श्रीलंका व्दिपक्षीय साखळी सामन्यांमधे पहिल्या दोन सामन्यांमधे फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही तरी देखील या मालिकेत तिस.या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याकरीता पुढे करण्यात आले.
माहीने या संधीचे अक्षरशः सोने केले आणि उत्कृष्ट प्रदर्शन केले.या सामन्यात त्याने 299 धावांच्या लक्ष्याला पहाता 145 चेंडुत नाबाद 183 धावा बनविल्या. धोनीने या मालिकेचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि जोरदार प्रदर्शन केल्याने त्याला मालिकावीर घोषीत करण्यात आले 2005-2006 मधे भारत – पाकिस्तान एक दिवसीय मालिकेत धोनी ने मालीकेत 4-5 सामन्यांमधे 68 धावा, नाबाद 72 धावा, नाबाद 2 धावा, नाबाद 77 धावा, बनविल्या आणि आपल्या संघाला 4-1 ने मालिका जिंकण्यास मदत केली.
आपल्या चांगल्या प्रदर्शनाने धोनी 20 एप्रील 2006 ला रिकी पाॅंटिंग ला मागे टाकत आयसीसी एक दिवसीय रॅंकिंग मधे पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 2007 क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या आधी वेस्टइंडीज आणि श्रीलंके विरूध्द दोन मालिकांमधे धोनीने उत्कृष्ट प्रदर्शन केले परंतु धोनी विश्व कप स्पर्धेत प्रदर्शन करण्यात अपयशी राहिला आणि भारतिय संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.
2007 साली दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड विरूध्द दोन मालिकांसाठी एक दिवसीय सामन्यांकरीता महेंद्र सिंग धोनी ला व्हाॅईस कॅप्टन अर्थात उपाध्यक्ष बनविण्यात आले.धोनीने दक्षिण अफ्रिकेत भारतिय संघाचे आयसीसी विश्व कप-20 ट्राॅफी करीता नेर्तृत्व केले आणि पाकिस्तान संघाला हरवुन ट्राॅफी जिंकली. 20-20 त आपल्या यशस्वी कर्णधारपदा नंतर महेंद्र सिंग धोनी ला सप्टेंबर 2007 मधे ऑस्ट्रेलिया विरूध्द एक दिवसीय मालीकेकरीता भारतिय संघाच्या नेर्तृत्वाची जवाबदारी सोपविण्यात आली.
पुढे महेंद्र सिंग धोनी ने 2011 मध्ये विश्वकप जिंकण्याकरीता भारतिय संघाचे नेर्तृत्व केले, याकरीता क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांसमवेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने देखील त्याचे कौतुक केले. 2009 साली सामन्यांदरम्यान धोनी ने 24 डावांमधे 1198 आणि 30 डावांमधे रिकी पाॅंटींग च्या धावांइतक्या धावा काढल्या.
यामुळे माही 2009 मधे अनेक महिन्यांकरीता आयसीसी एक दिवसीय फलंदाजांमध्ये क्रमांक एक वर राहीला. महेंद्र सिंह धोनी ने 2011 साली विश्व कप स्पर्धेत भारताचे नेर्तृत्व केले.श्रीलंके विरूध्द अखेरच्या सामन्यात त्यांनी फलंदाजी क्रमवारीत स्वतःला अग्रक्रमावर ठेवत नाबाद 91 धावा काढल्या 2013 मध्ये धोनी ने आयसीसी चॅंपीयंन्स ट्राॅफी मध्ये भारताचे नेर्तृत्व केले आणि टेस्ट मॅच, एकदिवसीय विश्वकप व चॅंपीयंस ट्राॅफी जिंकणारा एकमात्र कर्णधार बनला.
एकदिवसीय सामन्यात धोनीचे शानदार प्रदर्शन:
- धोनी ने खेळलेले एकदिवसीय सामने: 318
- एकुण खेळलेले सामने: 272
- एकदिवसीय सामन्यांमधील एकुण धावा: 9967
- एकदिवसीय सामन्यांमधे लावलेले एकुण चैकार: 770
- एकदिवसीय सामन्यांमधे लावलेले एकुण षट्कार: 217
- एकदिवसीय सामन्यामधे बनविलेले एकुण शतक: 10
- एकदिवसीय सामन्यांमधे बनविलेले व्दिशतक: 0
- एकदिवसीय सामन्यांमधे बनविलेले एकुण अर्धशतक: 67
महेंद्र सिंग धोनीची कसौटी सामन्यातील कारकिर्द – MS Dhoni Test Match Career
2005 साली श्रीलंके विरूध्द खेळल्या गेलेल्या मालिके दरम्यान एम एस धोनी ला भारतीय कसौटी संघात यष्टीरक्षक म्हणुन निवडण्यात आले होते. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात 30 धावा काढल्या, पाऊसामुळे हा सामना मधातच बंद करण्यात आला होता. 2006 च्या सुरूवातीला पाकिस्तान विरूध्द खेळतांना माहीने कसोटी सामन्यातील पहिले शतक आक्रमक पध्दतीने झळकविले त्यामुळे भारताला फाॅलो.
आॅन पासुन वाचण्यात मदत झाली. धोनीने पुढच्या तीन सामन्यांमधे शानदार प्रदर्शन केले.यातील एक सामना पाकिस्तान विरोधात आणि दोन सामने इंग्लंड विरोधात खेळले. 2008 साली धोनी ने आॅस्ट्रेलिया विरूध्द खेळल्या गेलेल्या मालिके दरम्यान उपकर्णधार म्हणुन संघाचे नेर्तृत्व केले. या सोबतच या मालिकेच्या चैथ्या सामन्या दरम्यान कर्णधार पदावर महेंद्र सिंह धोनीची नियुक्ती करण्यात आली.
त्यापुर्वीच्या सामन्यात कर्णधार अनिल कुंबळे जखमी झाले होते आणि त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली होती. महेंद्र सिंह धोनी ने 2009 साली श्रीलंके विरूध्द खेळल्या गेलेल्या मालिकेत शानदार प्रदर्शन करीत दोन शतकं झळकवले होते आणि भारतिय संघाला विजय मिळवुन दिला कर्णधार म्हणुन त्याच्या उत्तम कामगिरीमुळे 2009 साली भारतिय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत क्रमांक 1 चा संघ बनला 2014 मधे धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरूध्द खेळला होता.
या सामन्यात त्याने 35 धावा काढल्या. हा सामना संपल्यानंतर महेंद्र सिंह धोनीने कसोटी सामन्यातुन निवृत्ती जाहिर केली तरी देखील पुढे एक दिवसीय कसोटी सामने खेळणे त्याने सुरू ठेवले परंतु 2017 साली जानेवारीत एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधार पदातुन देखील तो निवृत्त झाला. धोनी आज देखील मर्यादीत षटकांचा सामना खेळु शकतो.
धोनी ने खेळलेल्या कसोटी सामन्यांची माहिती:
- एकुण खेळलेले कसोटी सामने: 90
- एकुण खेळलेल्या इनिंग: 144
- कसोटी सामन्यातील एकुण धावा: 4876
- कसोटी सामन्यांमधे मारलेले एकुण चैकार: 544
- कसोटी सामन्यात मारलेले एकुण षट्कार: 78
- कसोटी सामन्यांमधील शतकं: 6
- कसोटी सामन्यांमधे पुर्ण केलेले व्दिशतक: 1
- कसोटी सामन्यांमधे बनविलेले अर्ध शतक: 33
महेंद्र सिंग धोनीचे टी-20 कारकिर्द – MS Dhoni T20 Career
महेंद्र सिंग धोनीने पहिला टी-20 सामना दक्षिण अफ्रिके विरूध्द खेळला होता परंतु पहिल्या टी-20 सामन्यात त्याचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. या सामन्यात धोनी ने केवळ 2 चेंडुंचाच सामना केला आणि 0 वर बाद झाला पण तरी देखील भारतिय संघाने हा सामना जिंकला होता.
टी-20 सामन्यातील धोनीची कारकिर्द:
- धोनी ने खेळलेले एकुण टी.20 सामने: 89
- एकुण धावा: 1444
- एकुण चैकार: 101
- एकुण षट्कार: 46
- एकुण शतकं: 0
- एकुण अर्ध शतक: 2
कर्णधार पदाच्या कारकिर्दी मधील धुरंधर धोनीच्या काही विशेष गोष्टी – MS Dhoni Captain
ज्यावेळी महेंद्र सिंग धोनीला कर्णधार बनविण्यात आले त्यापुर्वी भारतिय संघाची धुरा राहुल द्रविड सांभाळत होते. ज्यावेळी राहुल द्रविड ने आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यावेळी भारतीय संघाच्या कर्णधार पदाची सुत्र धोनीकडे आली. महेंद्र सिंग धोनीला कर्णधार बनविण्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा मोठा हात आहे.
माही ला कर्णधार बनविण्याकरीता राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी BCCI सोबत चर्चा केली होती त्यानंतर BCCI ने धोनी ला 2007 साली भारतिय संघाचा कर्णधार बनविले होते. भारतिय कर्णधार झाल्यानंतर सप्टेंबर 2007 साली दक्षिण अफ्रिकेत आयोजित प्ब्ब् विश्व टी-20 मध्ये धोनीने भारतिय संघाचे नेर्तृत्व केले होते आणि या स्पर्धेत भारताला विजयी केले.
विश्व टी-20 चषक जिंकल्यानंतर धोनीकडे एक दिवसीय सामना आणि कसोटी सामना याच्या कर्णधार पदाची देखील सुत्रे आली.धोनीने आपल्या जवाबदारी ला अतिशय प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडले. धोनी कर्णधार असतांना भारतिय संघाने 2009 साली ICC कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवीले या शिवाय क्रिकेटच्या धुरंधर धोनीने कर्णधार असतांना अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदविले.
महेंद्र सिंग धोनी ने दोन विश्वचषकात भारतिय संघाचे नेर्तृत्व केले आहे.कर्णधार असतांना 2011 साली त्याच्या नेर्तृत्वात भारताने विश्वचषक आपल्या नावावर केला.आणि 2015 मध्ये विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतिय संघाने उपांत्यफेरी (सेमीफायनल) पर्यंत मजल मारली होती.
महेंद्र सिंग धोनीची IPL कारकिर्द – MS Dhoni IPL Career IPL
च्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्स संघाने महेंद्र सिंग धोनी ला 5 मिलियन डाॅलर म्हणजे 10 करोड रूपयांमध्ये खरेदी केले. या दरम्यान चा तो सगळयात महागडा खेळाडु ठरला. त्याच्या नेर्तृत्वात चेन्नई सुपर किंग्स् ने या लिगमधील दोन सत्रांवर विजय मिळवीला.या व्यतिरीक्त देखील धोनी ने 2010 साली 20-20 स्पर्धेत आपल्या संघाला विजय मिळवुन देण्याकरीता फार सहाय्य केले होते.
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स् संघावर काही कारणांमुळे 2 वर्षांची बंदी आली होती. त्यामुळे त्याला IPL चा दुसरा संघ रायजिंग पुणे सुपरजायंट ने जवळजवळ 1.9 मिलियन डाॅलर म्हणजे 12 करोड रूपये देउ केले.
धोनी ने पुढे या संघाकरीता देखील सामने खेळले होते. 2018 साली चेन्नई सुपर किंग्स् संघावर लावण्यात आलेली बंदी उठवली गेली त्यानंतर या सत्रात या संघाने पुन्हा धोनीला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले त्यामुळे धोनीने या संघाचे नेर्तृत्व केले.
महेंद्र सिंग धोनीचे विक्रम MS Dhoni Records
महेंद्र सिंग धोनी असा यष्टिरक्षक आहे ज्याने कसोटी सामन्यात एकुण 4 हजार धावा बनविल्या आहेत, यापुर्वी कोणत्याही यष्टिरक्षकाने एवढया धावा बनविल्या नाहीत.हा विक्रम धोनीच्या नावावर नोंदला गेला आहे.
महेंद्र सिंग धोनीच्या कर्णधार पदा दरम्यान एकुण 27 कसोटी सामने झाले होते ज्यात सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असण्याचा विक्रम माहीच्या नावावर आहे. धोनीच्या कर्णधार पदाच्या नेर्तृत्वात भारतिय संघाने खाली दिलेले विश्वचषक जिंकले होते.यामुळे धोनी पहिला असा कर्णधार बनला ज्याने सर्व त.हेच्या ICC स्पर्धा जिंकल्या आहेत.
ICC स्पर्धा | वर्ष |
टी.20 विश्वचषक | 2007 |
ODI विश्वचषक | 2011 |
चॅंपियन्स ट्राॅफी | 2013 |
महेंद्र सिंग धोनीने आपल्या कर्णधार पदाच्या दरम्यान एकुण 331 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनी पहिला असा कर्णधार आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे धोनी ने 204 षट्कार ठोकण्याचा देखील विक्रम केलेला आहे आणि तो सर्वात जास्त षट्कार मारणारा क्रिकेटर म्हणुन देखील प्रसिध्द आहे या शिवाय कर्णधार पदावरील सर्वात जास्त टी.20 सामने जिंकण्याचा किर्तिमान देखील त्याच्याच नावावर आहे.
महेंद्र सिंग धोनीला मिळालेले सन्मान – MS Dhoni Awards
- महेंद्र सिंग धोनी ला एकदिवसीय सामन्यांमधे शानदा प्रदर्शनाकरीता 6 मालिकावीर पुरस्कार आणि 20 मॅन आॅफ द मॅच पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या संपुर्ण कारकिर्दीत कसोटीत 2 मॅन आॅफ दी मॅच पुरस्कार देखील मिळाले आहेत.
- 2007 साली भारत सरकारने धोनी ला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.क्रिडा जगतातील दिला जाणारा हा सर्वश्रेष्ठ सन्मान आहे.
- 2008 आणि 2009 मध्ये महेंद्र सिंग धोनीला ICC , ODI ’’प्लेयर आॅफ दी इयर’’ चे नाव दिल्या गेले. त्याने सलग 2008 ते 2014 7 वर्षांपर्यंत आयसीसी विश्व एकदिवसीय 11 संघ देखील बनविला.महेंद्र सिंग धोनी ला 2009, 2010, आणि 2013 मधे आयसीसी विश्व कसोटी संघात देखील सहभागी केल्या गेले होते.
- महेंद्र सिंग धोनीला 2011 मध्ये डी मोंटफोर्ट विद्यापीठा तर्फे मानद डाॅक्टरेट पदवी ने सन्मानित केल्या गेले.
- धोनीला 2009 साली भारताच्या ’’पद्मश्री’’ या चैथ्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवण्यात आले
- धोनीला 2 एप्रील 2018 मधे ’’पद्मभुषण’’ या देशातील तीस.या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे.
- महेंद्र सिंग धोनी महान क्रिकेटपटु कपिल देव नंतर दुसरे असे खेळाडु आहेत ज्यांना इंडियन आर्मी चे सन्मान पद मिळाले आहे.
- 2011 साली जगातील सर्वात 100 प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत धोनीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
- 2012 मधे जगातील सर्वात महाग खेळाडुंमधे महेंद्र सिंग धोनी 16 व्या क्रमांकावर आहे
- 2015 मधे फोब्र्स ने धोनी ला सर्वात महाग खेळाडंुच्या यादीत 23 व्या क्रमांकावर ठेवले आहे.या लिस्ट अनुसार त्याची कमाई 31 मिलियन अमेरिकी डाॅलर होती.
महेंद्र सिंग धोनीचे व्यक्तिगत जीवन – MS Dhoni Family
धोनी आणि प्रियंका झा यांची प्रेमकहाणी – MS Dhoni Love Story
महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर जो चित्रपट निघाला त्यात असा खुलासा केला आहे की धोनीची प्रियंका झा नावाची एक मैत्रिण होती. त्या दोघांचे नाते अतिशय चांगले होते परंतु दोघांचा हा सोबतचा प्रवास फार काळ टिकु शकला नाही. त्याचे कारण म्हणजे 2002 साली एका कार अपघातात प्रियंकाचा दुर्देवी मृत्यु झाला त्यामुळे ही प्रेमकहाणी पुर्णत्वास जाऊ शकली नाही.
प्रियंकाच्या मृत्युची बातमी ऐकुन धोनी अतिशय दुःखी आणि निराश झाला होता. या दुर्घटनेची वार्ता ज्यावेळी धोनी ला समजली त्यावेळी तो भारतिय संघा समवेत प्रवासात होता.या घटनेनंतर धोनीला पुन्हा आपल्या कारकिर्दी कडे परतण्यास जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी लागला होता.
धोनी आणि साक्षी रावत यांची भेट – MS Dhoni Wife
2008 मध्ये महेंद्र सिंग धोनी आपल्या संघासमवेत एका हाॅटेल ला थांबला असतांना त्याची आणि साक्षीची भेट झाली. साक्षी त्यावेळी त्याच हाॅटेल ला प्रशिक्षणार्थी म्हणुन काम करीत होती. साक्षी त्यावेळी हाॅटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम औरंगाबाद येथुन पुर्ण करीत होती.तेव्हां पासुनच ते एकमेकांना भेटु लागले.
योगायोगाने दोघे लहानपणापासुनच एकमेकांना ओळखायचे कारण दोघांचे वडिल मेकाॅन मध्ये एकमेकांचे सहकारी होते आणि हे दोघे एकाच शाळेत शिकायचे. दोघांच्या वयाचा विचार करता साक्षी धोनी पेक्षा जवळपास 7 वर्षांनी लहान आहे.
धोनी आणि साक्षी एकमेकांना जवळपास 2 वर्ष भेटत राहीले आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व 4 जुलै 2010 ला धोनी आणि साक्षी विवाह बंधनात अडकले. पुढे 6 फेब्रुवारी 2015 ला त्यांनी एका मुलीला जन्म दिला. तीचे नाव जीवा असे ठेवण्यात आले.
एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी (धोनी चा बायोपिक) – MS Dhoni Movie
2011 साली क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक नीरज पांडेंनी महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आणि मिळालेल्या यशावर चित्रपट बनविण्याचे ठरविले.
चित्रपटाला एम.एस. धोनी: अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni : The Untold Story) असे नाव देण्यात आले.हा चित्रपट 30 सप्टेंबर 2016 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धोनीची भुमिका सुशांत सिंग राजपुत या कलाकाराने साकारली होती. या भुमिकेला खुप पसंती मिळाली.
महेंद्र सिंग धोनीशी संबंधीत काही खास गोष्टी – Other Specialties Related To Mahendra Singh Dhoni
महेंद्र सिंग धोनी एक चांगला क्रिकेटर आहेच या व्यतिरीक्त तो एक चांगला व्यावसायिक देखील आहे. अनेक व्यवसायांशी तो जोडला गेला आहे शिवाय रांची इथं त्याचे मोठे हाॅटेल देखील आहे ज्याचे नाव माही निवास असे आहे. एवढेच नाही तर 2016 साली महेंद्र सिंग धोनी कपडयांच्या व्यवसायात देखील उतरला त्याने रीती ग्रुप समवेत सेव्हन नावाचा कपडयांचा एक नवीन ब्रॅंड सुरू केला.
वेगाची आणि साहसाची देखील धोनीला आवड आहे, कित्येक महागडया कार आणि बाईक्स चा आहे संग्रह:
धोनी एक उत्तम क्रिकेट आहे तशी त्याला वेगाची आणि वेगवेगळया गाडयांची देखील आवड आहे. त्याच्या जवळ आज अनेक महागडया कार आणि बाईक्स चा संग्रह आहे. धोनी ने अनेक महागडया कार आणि दुचाकी विकत घेतल्या आहेत. धोनी जवळ आॅडी क्यु 7 आहे, इतकेच नाही तर त्याच्याजवळ सर्वात महाग आणि शानदार SUV हमर H2 चा देखील समावेश आहे.
त्याने ही गाडी 2009 मधे खरेदी केली होती. या व्यतिरीक्त धोनी जवळ काॅन्फेडरेट हैलकैट X132 ही शानदार बाईक आहे आणि सुपरबाईक काॅवासाकी निंजा H2 समवेत अनेक महागडया बाईक्स् चा संग्रह आहे. क्रिकेट च्या या उंचीवर पोहोचणं धोनी करीता अजिबात सोपं नव्हतं.
अनेक संघर्षांनंतर आणि जीवनातील चढ- उतारानंतर धोनीने क्रिकेट विश्वात स्वतःला या जागी स्थापीत केलं आहे. कोणतही कार्य दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकतेने केलं तर यश नक्की मिळतं हे धोनी कडे पाहिल्यावर पटतं ! ! ! !
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ महेंद्र सिंग धोनी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्