Most Expensive Thing in the Universe
आपल्याला माहिती असेल की गुगल जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे उपलब्ध असतेच मग तो प्रश्न कशाच्याही संबंधी असो. सुई पासून तर विमानापर्यंत काहीही सर्च केल्यावर आपल्याला उत्तर मिळतेच. त्याच प्रमाणे लाखो लोकांनी जगातील सर्वात महाग वस्तू कोणती आहे. तर त्यामध्ये सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती या गोष्टींचा उल्लेख आढळला नाही.
आपल्यालाही जीवनात कधी ना कधी हा प्रश्न पडला असेलच की विश्वात सर्वात महाग काय असेल बर आणि आपलेही उत्तरे जराशी अशीच आली असतील की सोने चांदी या पेक्षा काय महाग असू शकते? पण नाही सोने आणि चांदी यापेक्षाही महाग गोष्ट या विश्वात अस्तित्वात आहे. आणि आजच्या लेखात आपण त्याच गोष्टीविषयी माहिती पाहणार आहोत, आणि आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडेल, तर चला पाहूया..
हि आहे विश्वातील सर्वात महागडी वस्तू – Most Expensive Thing in the Universe
विश्वातील सर्वात महाग वस्तू ही एंटीमॅटर आहे. आणि एंटीमॅटर हा एक पदार्थ असून यामध्ये साधारण अणू प्रमाणे प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतात पण सगळे उलट्या प्रकारे. ज्या प्रमाणे साधारण अणू मध्ये आपल्याला केंद्रक हे पॉसिटीव्ह असते आणि आजूबाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह असतात. पण जर या पदार्थात पाहिले असता. पूर्णतः विरुध्द असते. जसे या पदार्थात केंद्रक निगेटिव्ह आणि इलेक्ट्रॉन्स पॉसिटीव्ह असतात. या पदार्थाचा वापर जास्त करून अंतरिक्षात होणाऱ्या प्रवासासाठी इंधन म्हणून केल्या जाते.
आणि वैज्ञानिकांचे यावर असे सांगणे आहे की अर्धा किलो एंटीमॅटर जगातल्या हायड्रोजन बॉम्ब पेक्षाही जास्त ताकद असते. आवश्यक ऊर्जा मिळविण्यासाठी या पदार्थाचा वापर केल्या जातो. नासाच्या एका रिपोर्ट मध्ये नासाने सांगितले होते की १ मी.ग्रॅम एंटीमॅटर बनविण्यासाठी १.८३ लाख करोड रुपये खर्च येणार आहे. याचा वापर मेडिकल फिल्ड मधेही केला जाऊ शकतो, सोबतच परमाणु हत्यारे बनविण्यासाठी सुध्दा केला जाऊ शकतो.
एंटीमॅटर पदार्थाचा शोध हा विसाव्या शतकामध्ये लागला होता. एंटीमॅटर पदार्थ अंतरिक्षात तुकड्यांच्या स्वरुपात आढळून येतो. साधारण पदार्थात प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्स आपल्याला आढळून येतात, परंतु या पदार्थामध्ये आपल्याला अँटिप्रोट्रॉन, प्रोसिट्रॉन, आणि अँटिन्यूट्रॉन यांचा समावेश पाहायला मिळतो. आणि या पदार्थाला प्रयोगशाळेत बाकी मूलद्रव्यांसोबत मिळवून याचा इंधणासाठी वापर करतात. सोबतच काही परमाणु बॉम्ब साठीही याचा वापर केला जाऊ शकतो. सोबतच रॉकेट ला लॉन्च करण्यासाठी सुध्दा या एंटीमॅटर चा वापर होत असतो.
वरील लेखात आपण एंटीमॅटर या पदार्थाविषयी पाहिले ज्याची किमंत जगात सर्वात जास्त आहे आणि या पदार्थाचा वापर कुठे केल्या जाते याविषयी सुध्दा थोडीशी माहिती आपण या लेखामध्ये पाहिली, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You So Much And Keep Loving Us!