Most Dangerous Lab in World
बऱ्याच लोकांनी संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना विषाणूमागे चीन चा हात असण्याचा दावा केला होता, त्यापैकी काही जणांनी या दाव्याला खारीज केले तर काही जणांनी याचे काही पुरावे देत चीन वर निशाणा साधला.
पण आपल्याला माहिती आहे का जगात अशी एक भयानक प्रयोगशाळा होती, जिथे माणसांवर जीवघेण्या विषाणूंचे प्रयोग केल्या जात असत. या प्रयोग शाळेत माणसांवर इतके भयानक प्रयोग केल्या जात असत कि माणसाला एक वेळ मरण परवडेल पण असे प्रयोग नाही.
आजच्या या लेखात आपण जगातील त्या भयानक आणि धोकादायक प्रयोग शाळेविषयी माहिती पाहणार आहोत, कि कशाप्रकारे लोकांवर तिथे वेगवेगळे प्रयोग केल्या जात असत.
तर चला जाणून घेवूया.
चीनच्या लोकांवर असे विचित्र प्रयोग केल्या गेले. वाचून भीती वाटेल. – Most Dangerous Lab in World
जगातील हि भयावह असणारी प्रयोगशाळा जापान च्या इम्पेरीयल सैन्याने चीनच्या पिंगपोंग जिल्ह्यामध्ये हि प्रयोगशाळा उभी केली होती. हि जवळ जवळ सन १९३० ते १९४५ च्या दरम्यान ची गोष्ट आहे. आणि या प्रयोगशाळेला त्यांनी युनिट ७३१ असे नाव दिले होते.
वास्तविक पाहता चीनचा या प्रयोगशाळेशी काहींही संबंध नव्हता. पण या प्रयोग शाळेत ज्या व्यक्तींवर प्रयोग व्हायचे ते लोक मात्र चीनचे होते.
शिगा युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स च्या एका प्रोफेसर च्या म्हण्यावर तेथील सरकार ने जेव्हा पुरालेख विभागाचे काही कागदपत्रे बाहेर काढले, तेव्हा ह्या प्रयोगशाळेत घडलेल्या घटना समोर आल्या.
या कागदपत्रांना एवढ्यासाठी त्यांनी बाहेर काढले होते कि त्यांना फक्त जाणून घ्यायचे होते दुसऱ्या विश्वयुद्धात जपान ने चीन वर किती प्रमाणात अत्याचार केले. या कागदपत्रांमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या खूप भीती निर्माण करणाऱ्या होत्या.
बऱ्याच डॉक्टर, सर्जन, नर्स यांचे नावे त्यामधून बाहेर आले, ज्यांनी चीनच्या जिवंत लोकांवर हे खतरनाक प्रयोग केले. जेव्हा या प्रयोगशाळेत केले गेलेले प्रयोग हळूहळू बाहेर आले तेव्हा एखाद्या माणसाला शॉक बसेल असे होते.
असे विचित्र केल्या गेले प्रयोग.
त्या प्रयोगापैकी एक प्रयोग फ्रॉस्टबाइट टेस्टिंग असा होता, आणि या प्रयोगाला करण्याचे काम योशिमुरा हिसाटो या शास्त्रज्ञाने केले, या शास्त्रज्ञाला या प्रयोगात खूप मजा यायची तो या प्रयोगात लोकांच्या हाताला किंवा पायाला पूर्णपणे थंड करायचा इतका थंड करायचा कि व्यक्तीचे शरीर अकडायचे, आणि त्यानंतर लगेच तो व्यक्तीच्या हाताला किंवा पायांना उकळत्या गरम पाण्यात टाकायचा.
या प्रक्रियेत व्यक्तीच्या अवयवांचा लाकडासारखे फुटण्याचा आवाज यायचा, इतक्या क्रूर पणे या प्रयोगशाळेत प्रयोग केल्या जायचे.
एवढंच नाही तर आणखी असाच एक प्रयोग सुद्धा या प्रयोग शाळेत केला जायचा तो म्हणजे या प्रयोगशाळेत असलेल्या एका मारुता नावाच्या शाखेत, या शाखेत एक प्रयोग केल्या जायचा ज्यामध्ये ते माहिती करून घ्यायचे कि एखादा मनुष्य किती टोर्चर सहन करू शकतो.
या प्रयोगासाठी ते चीनच्या काही लोकांचा वापर करत असत, ज्यामध्ये ते हळूहळू लोकांच्या शरीराचे एक एक भाग कापायचे, तेही कोणत्याही व्यक्तीला बेशुद्ध न करता.
एवढ्या यातना या प्रयोग शाळेत दिल्या जात होत्या, सोबतच आणखी एका प्रकारे लोकांना यातना दिल्या जायच्या त्या अश्या कि प्लेग किंवा कॉलरा चे पॅथोजन माणसाच्या शरीरात सोडले जायचे, आणि त्या माणसाच्या शरीराला कापले जायचे हे पाहण्यासाठी कि या रोगाचे माणसाच्या शरीरात कोणते परिणाम होतात, तेही जिवंत असताना. यामधूनही काही लोक वाचले तर इतक्या वेदनांच्या नंतर त्यांना जिवंत जाळून टाकल्या जायचे.
असे म्हटल्या जाते कि या प्रयोगशाळेतील बरीचशी माहिती हि जाळून टाकल्या गेली आहे, आणि या प्रयोग शाळेत काम करणारे बरेचशे लोक चांगल्या ठिकाणी जपान कामाला होते, पण आजच्या वेळेत या लॅब शी संबंधित कोणताही चेहरा जगासमोर आलेला नाही.
अश्या क्रूरतेने या युनिट ७३१ च्या प्रयोग शाळेत लोकांवर असे भयानक प्रयोग केले जात होते, जे मानवाला असहनीय होते. जगात आज अश्या प्रयोगशाळा दिसत नाहीत पण अश्या प्रयोगशाळा असल्या तर त्यांचा शोध घेऊन प्रत्येक देशातील शासनाने त्या बंद करायला पाहिजेत.
तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!