एखादा परिवार खूप मोठा असेल तर आपण गमतीमध्ये म्हणतो कि या परिवाराला जिल्हा घोषित केल पाहिजे, पण जर या उलट जर एका गावात फक्त एकच व्यक्ती असेल तर काय म्हणायला हवे,
लेखाचे शीर्षक वाचून आपल्याला माहितीच झाले असेल कि या लेखात आपल्याला अशा गावाविषयी माहिती मिळणार आहे जिथे फक्त एकच व्यक्ती राहते आता आपण विचार करणार असे कसे तर चला पाहूया असे कसे शक्य आहे.
तर आजच्या लेखात या गावाविषयी माहिती पाहणार आहोत, कि या गावातील लोक गेले तरी कुठे, तर चला जाणून घेवूया या गावाविषयी थोडक्यात माहिती कि कोणते आहे हे गाव, आणि कोण राहते या गावामध्ये.
जगातील एक अनोखं गाव जेथे राहते फक्त एकच महिला – Monowi Town with One Resident
या गावचे नाव आहे मोनोवी. मोनोवी हे गाव अमेरिकेच्या नेब्रास्का नावाच्या राज्यात आहे, आणि या गावात फक्त एकच व्यक्ती राहते. जी एक महिला आहे. त्या महिलेचे नाव एल्सी आयलर आहे. त्यांचे आताचे वय ८६ वर्ष आहे.
हे गाव ५४ हेक्टर मध्ये पसरलेल आहे, वर्ष १९३० पर्यंत या गावामध्ये १२३ लोक राहत होते, पण त्यानंतर या गावतील लोक हळूहळू हे गाव सोडून जाऊ लागले, कारण होते कि लोकांना येथे रोजगार मिळत नव्हता.
१९८० मध्ये या गावात फक्त १८ लोकच राहिले, त्यानंतर २००० साली येथे फक्त २ लोक राहिले. एक एल्सी आयलर आणि दुसरे त्यांचे पती ते म्हणजे रूडी आइलर. पण २००४ मध्ये त्यांचीही मृत्यू झाली.
तेव्हा पासून एल्सी आयलर ह्या या गावात एकट्या राहत आहेत या गावाला त्यांनी स्वतःचे एक बार सुरु केलेलं आहे, आणि ते या बार मध्ये आलेल्या लोकांना त्या स्वतःच लोकांना सर्विस देतात.
तेथे आलेले लोक सुद्धा त्यांना मदत करतात, या गावाची प्राकृतिक सुंदरता पाहण्यासाठी लोक बऱ्याच दुरून या गावाला भेट देण्यासाठी येतात.
गावात वापरल्या जाणारे पाणी वीज आणखी इतर गोष्टी या संपूर्ण गोष्टींचा गावचा कर हि वयोवृद्ध महिला भरते. तो जवळपास ३५ हजार रुपये इतका असतो. सोबतच या गावाला व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि गावाला सांभाळण्यासाठी सरकार काही पैसेही देत असते.
आहे ना जगापेक्षा एक वेगळ गाव! तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल जर हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!