Makad in Marathi
हा प्राणी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना परिचित आहे. माकड झाडावर राहते.
माकडाची माहिती – Monkey Information in Marathi
हिंदी नाव : | बंदर |
इंग्रजी नाव : | MONKEY |
माकडाला चार पाय असतात; परंतु पुढच्या पायांचा हातासारखा उपयोग करतो. ‘माकड’ चालताना चारही पाय वापरतो. त्याला एक लांब शेपटी, दोन कान असतात. माकडाची शरीररचना जवळ जवळ माणसासारखी असते,
माकडाचे खाद्य – Monkey Food
झाडांची कोवळी पाने, फुले, फळे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे वगैरे माकडाचे अन्न होय, तसेच माकडाला ओले खोबरे खूप आवडते. काही माकडे मांसाहारी पण असतात.
रंग : माकडाचा रंग तांबूस तसेच काळा असतो. त्याच्या अंगावर सोनेरी केस असतात.
माकडाच्या शरीरापेक्षा शेपटी अधिक लांब असते. माणूस आणि माकड यांत खूप साम्य आहे. माकड हा माणसाचा मूळ पूर्वज आहे. माकडाची उत्क्रांती होत होतच माकडाचा मानव झाला. माकड प्राणी माणसाळला की माणसे त्याचा वापर आपल्या उपजीविकेसाठी करतात.