Mohammed Rafi – मोहम्मद रफी भारतीय चित्रपटातील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांना भारतीय उपमहाद्वीपाच्या शतकातील श्रेष्ठ गायकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद रफी यांची पवित्र आणि सौम्य आवाजातील गाणी आणि देशभक्तीवर गीतांसाठी अजरामर झाले आहेत.
त्यासोबतच त्यांनी अनेक प्रसिद्ध रोमँटिक गीत, कव्वाली, गझल आणि भजन गायले आहेत. जी श्रोत्यांच्या मुखावर आजवर आहेत. चित्रपटातील अभिनेत्यात समरस होऊन त्यांचा आवाज जणू त्याच कलावंतांचा वाटायचा. 1950 ते 1970 पर्यंत त्यांनी 300पे क्षा जास्त चित्रपटांत गीते गायिली.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्यांची एक विशेष ओळख आहे की त्यांनी स्वतःच्या बळावर कमावलेली आहे. त्यांच्या नावे 6 filmfare award आणी 1 राष्ट्रीय फिल्मफेअर अवॉर्ड आहे. 1967 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
महान गायक मोहम्मद रफी – Mohammed Rafi Biography in Marathi
मोहम्मद रफी यांनी हिंदी सोबत अनेक भाषांमध्ये 7400 गीते गायली आहे त्या भाषांमध्ये आसामी, कोकणी, भोजपुरी, ओडिया, पंजाबी, बंगाली, मराठी, सिंधी, कन्नड, गुजराती, तेलगु, मैथिली, उर्दु यांचा समावेश आहे. भारतीय भाषांशिवाय इंग्लिश, फारशी, अरबी आणि डच भाषा मध्ये पण त्यांनी गीत गायले आहे. त्यांचे सर्व संगीत आजही श्रवणीय आहेत आहेत.
मोहम्मद रफी यांचे आरंभिक जीवन – Mohammed Rafi Early Life
मोहम्मद रफी हे हाजी अली मोहम्मद यांच्या 6 पुत्रांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचा परिवार मुख्यत्वे कोठला येते आहे हे अमृतसर जवळ एक गाव आहे. घरासमोरून रोज जाणारा फकिराचे गाणे ऐकून त्यांना गायनाची प्रेरणा मिळाली.
1935 मध्ये रफी लाहोर पाकिस्तान येथे गेले तेथे भट्टी गेट गल्ली जवळ त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहम्मद दिनू हे न्हाव्याचे काम करत त्यांच्या मित्राने यांची प्रतिभा पाहिली आणि त्यांना गायनासाठी प्रेरित केले.
त्यानंतर ते 1944 मध्ये मोहम्मद रफी मुंबई येथे आले तेथे आल्यावर गायनातील बारीक गोष्टींचे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी उस्ताद अब्दुल वाहिद खान आणि पंडित जीवनलाल मट्टू तसेच फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी मोहम्मद रफी लाहोर येथे एका संस्थेमध्ये गायन केले होते.
भारतीय ऑल इंडिया रेडिओ स्टेशन लाहोरचे त्यांना गायनासाठी आमंत्रित केले होते. 1945 साली चित्रपट “गाव की गोरी” मधून त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. नोशाद यांच्यासोबत “हिंदुस्तान के हम है” मधील काम फारच प्रशंसेच्या पात्र ठरले. त्यानंतर चित्रपट “लैला-मजनू” तील “तेरा जलवा जिसने देखा” मध्ये त्यांनी प्रथम चित्रपटातही काम केले.
1949 पासून त्यांच्या चित्रपटसृष्टीचा सफर खऱ्या अर्थाने सुरू झाला “चांदनी रात”, “दिल्लगी”, “दुलारी” चित्रपटांमध्ये गीत गायले.
संगीतकार नौशाद शामसुंदर, हुस्नलाल, जी. एम. दुर्वांनी यांच्यासाठी त्यांनी गायन केले. 1948 मध्ये महात्मा गांधीच्या हत्येनंतर त्यांचे “सुनो सुनो दुनिया वालो”, “बाबूजी” की अमर कहानी” हे गीत श्रोत्यांनी फार पसंत केले. भारताच्या प्रथम प्रधान मंत्र्यांनी त्यांना आपल्या घरी बोलवून हे गीत ऐकले होते.
1948 रोजी प्रथम स्वतंत्रता दिवसानिमित्त त्यांना पंडित जवाहलाल नेहरू यांच्याकडून मेडल मिळाले होते.
मोहम्मद रफी यांचे व्यक्तिगत जीवन – Mohammed Rafi Personal Life
मोहम्मद रफी यांनी दोन विवाह केले. त्यांचा पहिला विवाह बेगम बशीरसोबत झाला होता. भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या पत्नीने भारतात राहण्यास नकार दिला परंतु ते भारतात राहिले. त्यांना या पत्नीपासून एक मुलगा सईद होता. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांची एकूण चार मुले व तीन मुली आहेत
मोहम्मद रफी यांचा मृत्यू – Mohammed Rafi Death
अचानक आलेले हृदयविकाराच्या झटक्याने 31 जुलै 1980 रोजी रात्री 10:25 ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी त्यांचे शेवटचे गाणे फिल्म “आसपास” साठी गायले होते ज्याचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते.
मोहम्मद रफी यांच्या अंतिम संस्कार जुहु मुस्लिम कब्रस्तानमध्ये केला गेला होता. त्यावेळी तेथे 10,000 लोक उपस्थित होते पाऊस असतानाही लोकांनी तेथे हजेरी लावली होती. त्यांना सन्मान देण्यासाठी भारत सरकारने दोन दिवस राष्ट्रीय घोषित केला होता.
2010 मध्ये रफी यांच्या मकबरा जवळ सिनेसृष्टीतील महानायिका मधुबाला यांचा मकबरा बांधला गेला. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिवस साजरा करण्यासाठी त्यांचे असंख्य चाहते तेथे दरवर्षी जमा होतात. त्यांच्या मकबरा जवळ एक नारळाचे झाड लावण्यात आले आहे.
हे पण नक्की वाचा –
लक्ष्य दया: तुमच्या जवळ मोहम्मद रफी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा महान गायक मोहम्मद रफी – Mohammed Rafi Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट: Mohammed Rafi Biography – मोहम्मद रफी यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.