मार्टिन लूथर किंग चे भाषण – Martin Luther King Speech
मार्टिन लूथर किंग, Jr.
“I Have A Dream”
वाशिंगटन डी.सी. | 28 आॅगस्ट 1963
मी फार आनंदी आहे की आज अशा शुभ क्षणी मी आपल्या सोबत आहे. यास जगातील या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा संघर्षमयी लढा मानला जाईल. पाच ेबवतम वर्षा आधी एका महान अमेरीकीच्या प्रतिकात्मक छायेत आपण सगळे उभे आहोत त्यांनी उद्घोषणेवर हस्ताक्षर केले होते. या निर्णयाने लाखो अन्यायग्रस्त निग्रो लोकांच्या मनात एक आशेची किरण जागृत झाली होती. हा आनंद बराचकाळ अंधकाराच्या कैदेत राहील्यानंतर एका प्रकाशाच्या किरणा प्रमाणे उर्जा देणारा ठरला.
परंतु आज शंभर वर्षानंतरही निग्रो लोक स्वतंत्र झाले नाहीत शंभर वर्षानंतरही निग्रो समृध्दीच्या सागरात गरीबांच्या एका छोटया बेटावर राहात आहेत. निग्रोंचे जीवन विरोधी भाव आणि भेदभावाच्या बेडयांमधे बंदी झाले आहे. शंभर वर्षानंतरही निग्रोंचे जीवन समाजाच्या कानाकोप-यात सडते आहे. त्यांना स्वतःच्या देशात शरणार्थी सारखे वाटते, त्यामुळे आज अशा स्वतःची लाज वाटणा-या दशेत आपण एकत्र आलो आहोत. ज्यावेळी आपल्या स्वातंन्न्याच्या जाहीरनाम्यावर शिल्पकारांनी हस्ताक्षर केले त्यावेळी त्या स्वातंन्न्याचा भागीदार हा अमेरीकेतील प्रत्येक नागरीक झाला होता.
हा जाहीरनामा एक वचन होते ज्यामध्ये सर्वांना समान हक्क आणि स्वातंन्न्य दिले होते. मग तो काळा असो वा गोरा सर्वांना हे स्वातंन्न्य अबाधित केले होते त्यामुळे आज जी परिस्थिती आहे ती फारच असंवैधानिक मानायला हरकत नाही. आज हे स्पष्ट झाले आहे की अमेरिकेत अश्वेत नागरिकांना आपले स्वातंत्र अजूनही मिळाले नाही. निग्रो लोकांना असा चेक मिळाला आहे ज्यात अपर्याप्त कोष लिहून वापर केला आहे.
आज अमेरिकेची न्याय व्यवस्था पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. आम्ही हे मानण्यास तयार नाही आहोत की या देशात संधीच्या तिजोरीत अपर्याप्त कोष म्हणून घोषित केले आहे. यामुळे आता आपणांस आपला हक्क हवा आहे. स्वतंत्रता आणि न्याय हवा आहे. आपण या पवित्र स्थानावर यासाठी आलो आहोत की अमेरिकेस आठवण करून दयायची आहे की आता स्वतःस शांत बसवण्याची तसेच मनास दिलासा देण्याची वेळ नाही. ही वेळ लोकतंत्रास दिलेल्या वचनास पाळण्याची आहे. अंधारी आणि निर्जन घाटातून निघून समानतेच्या तळावर मूक्तपणे संचार करण्यासाठी सर्वांनी एकसाथ चालावे.
आता वेळ आली आहे आपल्या देशास वंशीय भेदभावापासून मुक्त करण्याची. आपल्या देशास वंशभेदाच्या दलदलीतून बाहेर काढून बंधूभावाच्या अतूट बंधनात बांधण्याची. आता वेळ आली आहे वंशभेदास मिटवून प्रभूच्या सर्व संतानांना एकसमान बनविण्याची. या गोष्टीस दुर्लक्ष करणे हे अमेरिकेसाठी आता फारच घातक ठरेल. अश्वेतांचे मन जोपर्यंत शांत होत नाही जोवर त्यांना समान हक्क आणि न्याय मिळत नाही, 1963 हे वर्ष एका खराब काळाचा अंत नसून तो एका सुखद काळाची सुरूवात मानली जावी. तो आपणाकडून आशा करतो की निग्रोंनी त्यांचा राग शांत करून आपला हक्क घ्यावा.
अमेरीकेत सुखशांती तोवर होणार नाही जोवर त्यांना नागरीकतेच्या सर्व गोष्टी सक्षमपणे मिळत नाही. विद्रोहाचा ज्वालामुखी मनात धगधगत आहे त्यामूळे त्याचा स्फोट झाल्यास ऐतिहासीक अमेरीकेचा इतिहास बदलून जाईल. आज न्यायमहलाच्या दारावर उभा राहून मी आपल्या लोकांना म्हणेल की, आपला हक्क मिळविण्या साठी अनूचित कार्याने स्वतःस पापी बनवू नका. आपणांस आपल्या स्वातंन्न्यास व्देष आणि हिंसेने कटूतेचा प्याला पिउन मिळवायचे नाही.
नेहमी आपल्या संघर्षास अनुशासन आणि सन्मानानेच पूढे न्यायचे आहे. आपल्याला आपल्या संघर्षास त्या स्तरावर घेउन जायचे आहे जेथे शारिरीक बळाचा विरोध आत्मबळाने केला जातो.
आज निग्रो समुदाय हा एका विशेष आतंकवादाने घेरला गेला आहे. आम्हाला असे काहीच करायचे नाही ज्यामुळे श्वेत लोक आपणा सर्वांवर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. आपले श्वेतबंधू जाणून चुकले आहेत की त्यांचे भाग्य आपणा सर्वांशी जोडलेले आहे. त्यामूळे सर्वांनी संयमाने विरोध करावा.
आपण एकटे चालणार नाही आहोत . . . . . . . . . आपण जसे जसे पूढे जाउ आपण प्रण करूया की आपण नेहमी पूढे जाउ या आपण कधीच परतू नाही. काही लोक आपल्याला विचारत आहेत की तूम्हाला तूमचे नागरी हक्क केव्हा मिळतील, तूम्ही केव्हा समाधानी व्हाल. याचे एकच उत्तर आम्ही तोवर संतृष्ट होणार नाही जोवर एक ही निग्रो स्वतःस अन्यायग्रस्त म्हणणार नाही. आम्ही तोवर संतृष्ट होणार नाही जोवर प्रत्येक गावात, शहरात, हाॅटेलमध्ये, रस्त्यावर समानतेसाठी न्याय मिळत नाही.
आम्ही तोवर संतृष्ट होणार नाही जोवर एक अश्वेत एका छोटया मर्यादित समाजातून एक विशाल समाजात राहायला जात नाही आमच्या मुलांना चांगले हक्काचे शिक्षण मिळत नाही. जोवर मिस्सिसिप्पीचा निग्रो मतदान करत नाही आणि न्युयाॅकेतील निग्रो यास असे वाटत नाही की हे माझ्या मुलांसाठीचे स्वर्ग आहे. तोवर आम्ही संतृष्ट होणार नाही आम्ही तोवर समाधानी होणार नाही जोवर न्याय जलासमान आणि धर्म धारदार प्रवाहासारखा प्रवाहीत होत नाही.
मी या गोष्टी जाणतो की तूम्ही येथे अपार कष्ट सहन करून येथे आले आहात. तुमच्यापैकी काही आजच तुरूंगातून मोठे कष्ट सोसून आले आहेत काही लोक अशा जागेहून आले आहेत जे स्वातंन्न्याचे पर्व पाहण्यासाठी अतोनात कष्ट आणि पोलीसांचा अन्याय सहन करत ते येथे आहेत त्यांचा त्याग आणि भावना आपण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मिस्स्सििप्पीत परत जा, अलबामा परत जा, साउथ कॅरोलिना वापस जा, जाॅर्जिया, लुजीयाना, उत्तरीय शहरातील झोपडपट्टया आणि वस्त्या वापस जा, कारण नक्कीच परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे निराश होउ नका. नव्या आशेने परत जा. मित्रहो मी तूम्हाला सांगू इच्छितो की, माझे एक सूंदर अमेरिकेचे स्वप्न आहे ज्याचे खरे रूप आता आपणांस साकारायचे आहे.
माझे स्वप्न आहे की आपला देश ख-या अर्थाने आपल्या न्यायप्रिय सिध्दांतांना अमलात आणून एक समानतेचा देश म्हणून विकास करेल. माझे स्वप्न आहे की एके दिवशी जाॅर्जियाचे लाल पहाडावरचे गुलामांचे पुत्र आणि मालकांचे पुत्र एकाच टेबलावर बसून जेवण करतील तेथे समानतेची लहर सगळीकडे पसरलेली असेल. माझे स्वप्न आहे की एके दिवशी मिस्सिसिप्पी राज्यात अन्याय व अत्याचाराच्या आगीस न्याय आणि स्वतंत्रतेच्या पावसाने पूर्णपणे मिटवून समानतेच्या सागराचा निर्माण होईल.
माझे स्वप्न आहे की एक दिवस येथील सर्व बालक आनंदाने नांदतील. त्यांच्यात रंगाचा भेद नसेल तर चारिन्न्यावरून भेद असेल. आज माझे एक स्वप्न आहे की अलबामात अनिष्ट जातिवाद आणि प्रशासनही संघाच्या कोणत्याच कायदयास न मानण्याचा हट्टीपणा नष्ट होईल आणि काळा असो वा गोरा सर्व एकत्र वाढतील आणि शिकतील.
माझे एक स्वप्न आहे की एक दिवस प्रत्येक नागरिक समान होतील त्यांच्यात कोणतेच उच्चनिच्च भाव नसेल. सर्व अनिष्ट रूढीपरंपरा नष्ट होउन समानतेच्या सागरात सर्व समान आणि उत्साहाने वावरतील. ही आमची आशा आहे की आपण प्रत्येक जण परत जाउ. मी दक्षिण ला परत जाईल की आपण आपसातील कलह मिटवून आपले सर्व हेवेदावे विसरून एक शांतिमय स्थिर जीवनाकडे आपण वळणार आहोत. मला आशा आहे की आपण सर्व गोरे काळे एकत्र काम करू, पूजा करू, संघर्ष करू. सोबत एक दुस-याच्या सुखदुःखात एक सोबत राहू.
हा एक असा दिवस असेल जेव्हा प्रभूची सर्व संतान एकाच नव्या अर्थाने गाउ शकतील.
”My country’t is of thee, sweet land of liberty, of thee I sing.
Land where my fathers died, land of the pilgrim’s pride,
from every mountainside, let freedom ring.”
आणि जर अमेरिकेस एक महान देश बनवायचे असेल तर खरोखरच मानवतेने परिवर्तन करावे लागेल.
यासाठी न्यू हॅम्पशायर च्या विलक्षण पहाडांमध्ये समानतेचे नारे नांदू दया.
न्यूयाॅर्कच्या विशाल पर्वतामध्ये स्वातंन्न्याच्या आवाजास नांदू दया.
पेन्सिलवेनिया च्या अल्घेनीज पर्वतामध्ये स्वातंन्न्याची नारे नांदू दया.
बर्फानी झाकलेल्या कोलरॅडो च्या टेकडयांवर स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.
कॅलिफोर्निया च्या वळणदार घाटांमध्ये स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.
हेच नाही जाॅर्जिया च्या इस्टोन माउंटेन मधूनही स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.
टेनेसी च्या लुकआउट माउंटन मधून स्वातंन्न्याची नारे गंुजू दया.
मिस्स्सििप्पी च्या द-यांमधूनही स्वातंन्न्याची नारे गरजू दया.
येथील सर्व पहाडांमधून पर्वतातून, नदयांच्या कपारींमधून स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.
आणि जेव्हा असे होईल तेव्हा आपण स्वातंन्न्याचे नारे प्रत्येक वस्तीत, गावात प्रत्येक राज्यात आणि शहरात आनंदाने नांदू लागेल तेव्हा त्यादिवशी या ईश्वराचे सर्व पुत्र श्वेत, अश्वेत, यहूदी, किंवा कोणत्याही जाती धर्माची प्रोटेस्टंट असो वा कॅथलीक सर्व जण आपल्या हातात हात घालून निग्रोचे आध्यात्मिक गाणे गातील.
“Free at last! free at last!
thank God Almighty, we are free at last!”
काय तूम्ही या आधी हे गाणे ऐकले होते? हे एक आध्यात्मिक संगीत आहे जे उत्तर अमेरीकेवर आधारीत आहे . . .
जरूर वाचा:
Please: आम्हाला आशा आहे की हा मार्टिन लूथर किंग चे भाषण – Martin Luther King Speech तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.
नोट: Martin Luther King Speech – मार्टिन लूथर किंग चे भाषण या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.