Marathi Ukhane for Griha Pravesh
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, …. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, … ला सुखात ठेवीन हा माझी पण.
नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, … राणी माझा तळहाताचा फोड.
नंदनवनात अमृताचे कलश, … आहे माझी खुप सालस.
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन,
भाजीत भाती मेथीची, … माझी प्रितीची,
दही चक्का तुप, … आवडते मला खुप.
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.
श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन.
चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, … रावाच्या जीवावर … मारते मौजा.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.