Marathi Ukhane for male
नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, … आज पासुन माझी गृहमंत्री.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात,
रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर … माझी प्यारी.
सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप, … मिळाली आहे मला अनुरुप.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, … चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
… माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
Marathi Ukhane for Pooja
पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, … ला आवडते नेहमी दुधावरची साय,
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, … आहे माझे जीवन-सर्वस्व.
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, .. चे रुप आहे अत्यंत देखणे.
भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, …चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,
देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती, … माझ्या जीवनाची सारथी.