Best Marathi Suvichar Sangrah
“मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.”
“नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.”
“एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.”
“संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.”
“उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे.तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.”
“पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.”
“जबाबदारी पडली कि ती शिकवतेच.”
“धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते.”
“श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.”
Suvichar Marathi image
“स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”
“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”
“खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”
“विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”
“जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”
“माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.”
“दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”
“संशयातून संशयच उत्पन्न होतो.”
“जो बदलत नाही तो असमंजस असतो.”
“प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.”
“कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही.”
“सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.”
“इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”
“फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.”
“या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”
“श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.”
“वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.”
“माणूस जितका मूर्ख, तितका तो खोटा बोलणारा असतो.”
“सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.”
“अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”
“उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”
“जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”
“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”
“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”
“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”
“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”
“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”
“आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”
“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”
“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”
“चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”
“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”
“श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”
“माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”
“घाबरटाला सारेच अशक्य असते.”
“सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”
“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”
Sundar Vichar in Marathi
“सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.”
“सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.”