Poetry on Ziddi in Marathi
जिद्द्द असेल तर अशक्य अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही, फक्त प्रयत्न कसून करायची तयारी असावी, हेच चांगल्या प्रकारे या कवितेतून सांगितले आहे.
जिद्द हि कविता वाचून येईल एक नवा उत्साह – Poetry on Ziddi in Marathi
तर चला कविता वाचून नवा उत्साह अंगीकारून घेऊ..
जाणीव होते
वेगळं असण्याची।
म्हणून सवय झाली
आता एकटे चालण्याची।।
स्वतःला टिकवून ठेवले
या काट्यांच्या रस्त्यावर।
तरीही सिद्ध करेल
स्वतःला मी वेळ आल्यावर।।
मी नव्हतो असा
वेळेने बनविले मला।
दुःख तर आहे इथे
प्रत्येकाच्या हीश्याला।।
काही केल्या सुटत नाही
जिद्द माझी जिंकण्याची
वाट पाहते जिंदगी
मला माझी हरवण्याची।।
थकणार, पडणार, पण
थांबणार नाही कधी।
उशिराच का होईना
तरीही मी पोहचणार सर्वात आधी।।
-युवाकवी
वैभव कैलास भारंबे.
आशा करतो तुम्हाला सुद्धा हि कविता वाचून प्रेरणा मिळाली असेल, Marathi Poem on Zidd आवडल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेरणा देण्यासाठी या कवितेला त्यांच्याशी शेयर करायला विसरू नका,
मी आणखी अश्याच कविता आणि लेख आपल्यासाठी घेऊन येत राहील,
धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आमच्यावर असेच प्रेम करत रहा.