Marathi Bodh Katha
एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता, बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती, स्वभावाने सुध्दा भोळा आणि परोपकारी होता, त्याने एका साधू महाराजांना त्याचे गुरू मानले होते आणि त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे तो पालन करत असे, सोबतच कोणत्याही समस्येला त्याच्या गुरुजींना सांगून त्यावर तो उपाय काढून घेत असे.
एक दिवस त्याला असाच एक विचार आला की आपल्या गावाला एक मंदिर बंधायचे, जेणेकरून जवळच गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था होईल, राहण्यासाठी गरीब लोकांना एक सहारा मिळेल, मोठमोठ्या साधू संतांचे लोकांना दर्शन होईल, तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथोमोपचार केंद्र सुरू करावे जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, या गोष्टीचा मनात विचार घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने याविषयी आपल्या गुरूंकडे आपल्या मनातील गोष्ट मांडली.
एक शिकवण देणारी कथा – Marathi Bodh Katha
तेव्हा गुरूंनी त्याला सांगितले की एकच मंदिर का दोन मंदिरे उभे कर एक गावात आणि एक तुझ्या राहत्या नगरात. जेणेकरून तुला सुध्दा देवाचे दर्शन जवळच होईल. आणि तू अश्याच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन तो तेथून निघून घरी आला आणि दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला लागला. त्याने दोन्ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही दिवसांत मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, दोन्ही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूक सुध्दा केल्या गेली.
काही दिवसांच्या कालावधी नंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले, परंतु काही दिवसानंतर व्यापाऱ्याच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक गावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात जात होते. वास्तविक पाहता गावातील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता तरी सुध्दा लोक गावातील मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते.
या सर्व स्थितीला पाहून व्यापारी थक्क झाला आणि या समस्येला घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा त्याने गुरूंना याविषयी सांगितले की लोक नगरच्या मंदिरापेक्षा गावतील मंदिरात मोठ्या संख्येने जात आहेत, अश्याप्रकारे त्याने घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना ऐकवला. आणि असे का होत आहे आणि यावर उपाय काय करावं म्हणून गुरूंना प्रश्न विचारू लागला.
गुरूंनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि व्यापाऱ्याला एक गोष्ट करायला सांगितली, त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले की गावाकडील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गावाकडच्या मंदिरात बोलावून घे. हा उपदेश ऐकत व्यापारी तेथून निघून आला, गुरुजींनी सांगितलेल्या प्रमाणे त्याने पुजाऱ्यांची अदलाबदल केली.
काही दिवासात पाहतो तर काय ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक खूप कमी प्रमाणात जात होते, आणि नगरातील मंदिरात गावाकडून लोक दर्शनाला यायला लागले होते, हे पाहून तो आश्चर्य चकित झाला, आणि त्याने हा काय प्रकार असावा म्हणून गुरूंना भेटायला गेला.
गुरु जवळ आल्यानंतर त्याने सांगितले की गुरूजी पाहिले लोक गावातील मंदिरात गर्दी करायचे पण आता नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे तेव्हा गुरुजी त्या व्यापाऱ्याला सांगतात की यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे. नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात, ज्या मंदिरात तो पुजारी असतो. पुजारी आपल्या मधुर वाणी मुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुध्दा त्याच्याजवळ जाण्यासाठी उत्सुक असतात. हे ऐकून व्यापाऱ्याला सर्व परिस्थिती लक्षात आली होती.
याच प्रकारे आपल्या जीवनात सुध्दा आपले बाहेरील रंग रूप जास्त महत्वाचे नसते, महत्वाचा असतो तो आपला स्वभाव. जर आपला स्वभाव चांगला असेल, लोकांना आकर्षित करणारा, तर लोक आपल्या जवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते,आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक पसंत करतात. ही गोष्ट सुध्दा आपल्याला हीच शिकवण देते.
आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आपल्याला आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही स्टोरी आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!