Mansa Musa
“बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया“
हि म्हण तर सर्वांना परिचयाची आहेच पण काय पैसाच सर्वकाही आहे? नात्यांपेक्षा पैसा मोठा आहे का? किंवा पैसा नसेल तर माणूस जगू शकत नाही का? ह्या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत पण आजच्या जगात बरेच लोक असे पाहायला मिळतात जे पैश्याच्या मागे एवढे वेडे होतात कि त्यांना पैशाच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच दिसत नाही.
आता आपण म्हणणार, मग त्यांनी काय पैसे कमवायला नकोत का? पैसे कमावणार नाही तर खाणार काय वगैरे वगैरे…
माझे म्हणणे असे नाही, कि कोणी पैसे कमवू नये पण म्हणतात ना चप्पल कितीही चांगली असो तिला पायातच घालावी लागते. तसेच पैशाविषयी सुद्धा आहे तुम्ही कितीही पैसा कमवा किंवा कमवलेल्या पैशांवर मजा करा, पण सत्य हे आहे कि त्या पैशाला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मग तो कोणीही असो आणि कितीही श्रीमंत असो.
आजच्या लेखात मी आपल्याला एका अश्या व्यक्तीविषयी माहिती सांगणार आहे जो फक्त एका राज्यातून किंवा देशातून श्रीमंत नव्हता तर संपूर्ण जगातून श्रीमंत होता. कोण होती ती व्यक्ती आणि त्याच्याजवळ किती संपत्ती होती या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढे लेखात पाहणार आहोत, तर चला पाहूया…
एवढी संपत्ती असूनही शेवटी त्याला मरावेच लागले, हि गोष्ट इतिहास नेहमी आठवण ठेवेल – Mansa Musa
जगात श्रीमंत लोकांची कमीच नाही आणि जेव्हा सुद्धा आपल्याला श्रीमंत व्यक्ती असा शब्द कानावर पडतो तेव्हा लगेच आपल्याला मोठमोठ्या उद्योगपतींची आठवण येते. पण आजच्या लेखात इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे सर्व जगापेक्षा जास्त संपत्ती होती. अश्या राजाविषयी माहिती पाहत आहोत तो राजा म्हणजे मनसा मूसा.
मनसा मूसा हा माली साम्राज्याचा राजा होता, या राजाला मनसा मूसा प्रथम म्हणून ओळखल्या जात. त्याचे वास्तविक नाव मुसा किटा होते परंतु जेव्हा तो राजा बनला तेव्हा मनसा हे त्याच्या नावाच्या आधी लागले कारण मनसा चा अर्थ बादशाह असा होत होता.
इसवी सन १३१२ मध्ये मनसा मुसा राजा बनला. त्याने २५ वर्षाच्या कालावधीत त्याच्या राज्यात अनेक मस्जिदी निर्माण केल्या, टिम्बकटू ची जिंगारेबेर मस्जिद या राजाच्या काळातील आहे. तेव्हाच्या काळात जेव्हा सोन्याला खूप मागणी वाढत होती, तेव्हा त्याच्या राज्यात सोन्याच्या खूप मोठ्या खाणी होत्या आणि त्यामध्ये सोन्याचे भांडार सुद्धा होते. हे सर्व त्या राजाच्या हाती होते मग आपण विचार करू शकता कि सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याला व्यापारात अमाप फायदा झालाच असेल.
त्याची संपूर्ण संपत्ती हि आजच्या रुपयांमध्ये मोजली तर ती जवळपास अडीच लाख करोड रुपये एवढी होती. आज जर तो राजा जिवंत असता तर जगातील सर्व श्रीमंत व्यक्तींपेक्षा श्रीमंत असता.
अमाप संपत्तीचे दर्शन:
या राजाविषयी एक गोष्ट खूप प्रचलित आहे ती अशी कि सन १३२४ मध्ये मनसा जेव्हा मक्का च्या यात्रेवर निघाला होता तेव्हा त्याला साडे सहा हजार किलोमीटर चे अंतर पार करावे लागणर होते. तेव्हा त्याच्यासोबत ५०-६० हजार लोकांची गर्दी होती.
या ६० हजार लोकांपैकी १२ हजार तर त्याचे स्वतःचे सल्लागार होते. सोबतच मुसा ज्या घोड्यावर बसलेला होता त्या घोड्याच्या समोर ५०० लोकांचे एक पथकच होते आणि त्या प्रत्येकाच्या हाती सोन्याने बनलेली एक काठी होती. व रेशमी धाग्यांनी बनलेली वस्त्र परिधान केलेली होती.
राजाच्या सोबतीला ८० उंट होते आणि त्या प्रत्येक उंटाच्या पाठीवर १३६ किलो सोने लादलेले असायचे. जेव्हा राजा इजिप्त ची राजधानी कैरो मधून जात होता तेव्हा त्याने तेथील गरीब लोकांना काही दान दिले तर येत्या काही दिवसात तेथे महागाई वाढली.
शेवटचे दिवस – Mansa Musa Death
मनसा मुसा याने सन १३१२ पासून तर २५ वर्ष शासन केले. आणि यादरम्यान त्याने अमाप संपत्ती जमा केली. संपत्ती एवढी कि त्या संपत्तीचे मोजमाप केले तर किती तरी ट्रिलियन डॉलर एवढी होईल. पण १३३७ मध्ये त्या राजाचा मृत्यू झाला आणि त्याच्या शरीराने प्राण सोडले.
यानंतर त्याच्या मुलांना एवढा राजकारभार सांभाळता आला नाही, आणि गृहयुद्ध आणि विदेशातील काही राजांनी आक्रमण केल्या मुळे त्या राजाच्या राज्याचे पतन झाले.
म्हणून मी म्हणतो पैश्यामुळे खूप काही होते पण पैसाच सर्वकाही नसतो. जीवनात पैसा अवश्य कमवा पण पैशासाठी जीवनातील सुंदर क्षण गमवू नका. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे माणसासाठी पैसा बनला आहे, पैशासाठी माणूस नाही.
आपलं खर धन आपला परिवार, मित्र,नातेवाईक, हे सर्व आहेत त्यांना जपा. कारण जेव्हा मृत्यू तुमच्या दाराजवळ येऊन उभा राहील तेव्हा पैसा तुमच्या जराही कामी येणार नाही. तुमच्या कामी फक्त तुम्ही दुसऱ्यावर केलेले परोपरकार तसेच एखाद्याला दिलेला आनंद किंवा केलेली समाजसेवा हेच तुमच्या कामी येईल. ह्या गोष्टी आपल्या मरणोपरांत सुद्धा आठवण केल्या जातील. म्हणून बिनदास्त जगा आणि आयुष्याची मजा घ्या.
आशा करतो कि आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेलच आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!