Mangala Gauri Aarti
हिंदू धर्मात सर्वात पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. भगवान शंकर यांना आवडत असलेला श्रावण महिना म्हणजे सणासुदीचा महिना, व्रत वैकाल्पाचा महिना आहे.
श्रावण महिन्यात भाविक मोठ्या आस्थेने भगवान शंकर यांची आराधना करीत असतात. शिवाय, पुराणांमध्ये श्रावण महिन्यात भगवान शंकर यांची आराधना करण्याचे विशेष महत्व सांगितल असल्याने भाविक या महिन्यात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा करीत असतात.
तसचं, भगवान शंकर यांचा जलाभिषेक करण्यासाठी भाविक दूरवरून नदीच्या पत्राचे पाणी कावडच्या साह्याने आणून त्यांचा अभिषेक करतात. या महिन्यात महिलांना व्रत पूजा करण्यास विशेष महत्व सांगितल आहे. तसचं, व्रत पूजा केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन देखील करण्यात आलं आहे.
श्रावण महिन्यात भगवान शिव यांच्यासोबत माता पार्वती यांची आराधना देखील केली जाते. श्रावण महिन्यात ज्या प्रमाणे भगवान शिव यांची पूजा अर्चना करण्यास सोमवार या दिवसाला महत्व देण्यात आलं आहे.
त्यानुसार, माता पार्वती यांची पूजा अर्चना करण्यास मंगळवार या दिवसाला महत्व देण्यात आलं आहे. कारण, या महिन्यात माता पार्वती यांना आवडत असलेल्या मंगलागौरी व्रताचे पालन करण्यास विशेष महत्व दिल आहे. विवाहित महिला हे व्रत मोठ्या संख्येने करीत असतात.
मंगलागौरी व्रताचे महत्व पुराणांत सांगण्यात आलं आहे. तसचं, त्याबाबत एक कथा देखील प्रचलित आहे. आम्ही आजच्या या लेखात मंगळागौरीची आरतीचे लिखाण करीत आहोत, चला तर पाहूया मंगळागौरीची आरती –
मंगळागौरीची आरती – Mangala Gauri Aarti in Marathi
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी। अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या। सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री। जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें। नंदेटें तगरें। पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें। तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे। खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
मंगलागौरी व्रताबद्दल अशी मान्यता आहे की, हे व्रत विवाहित महिलांकरिता असून, या व्रताचे पालन केल्याने विवाहित महिलांचे त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. तसचं, मंगळदोष असलेल्या महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना उत्तम लाभ मिळतो.
काही महिला आपल्या पतींच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करीत असतात तर काही महिला पुत्र प्राप्तीसाठी हे वर करीत असतात. मंगलागौरी व्रत केल्याने भगवान शिव यांच्या सोबत माता पार्वती यांची पूजा अर्चना करण्याचा लाभ आपणास मिळतो. विवाहित महिलांप्रमाणे कुमारिका सुद्धा आपणास चांगला वर मिळावा याकरिता हे व्रत करित असतात.
मंगलागौरी या व्रताबद्दल अशी आख्यायिका आहे की, मंगलागौरी हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी पाच वर्ष करावयाचे असते. त्यामुळे नवविवाहित महिला एकत्रिपणे हे व्रत साजरे करीत असतात. पूजेच्या ठिकाणी सर्व नवविवाहित महिला एकत्र गोळा होवून सकाळी पूजा करीत असतात.
पूजा करण्यासाठी माता अन्नपूर्णा यांच्या धातूच्या मूर्तीची आरास मांडून शेजारी भगवान शिव यांची पिंड ठेवण्यात येते. यानंतर मंगलागौरीची षोडशोपचार पूजा करून मंगलागौरी कथेचे पठन करण्यात येते. कथा संपल्यानंतर देवी मंगलागौरी यांची आरती करण्यात येते, व नंतर प्रसादाचे वाटप करून, पूजेसाठी आलेल्या सवाष्णींना भोजन ग्रहण केले जाते.
मंगलागौरी पूजेचे आयोजन करण्यात आले असलेल्या घरी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून. हळद कुंकू, विड्याची पाने, सुपारी व हातात साखर देवून सवाष्णींची ओटी भारतात. तसचं, व्रताच्या निमित्ताने महिला रात्री जागरण करून रात्रभर उखाणे, फुगड्या, झिम्मा, भेंड्या या सारखे खेळ खेळत असतात.
सकाळी स्नान करून देवी मंगलागौरीला दही भाताचा नैवद्य दाखवून आरती केली जाते. आरती झाल्यानंतर, पुष्पांजली म्हटली जाते व त्यानंतर देवीचे विसर्जन केले जाते. देवी पार्वती यांना अनुसरून माता अन्नपूर्णा रुपी त्यांचे मंगलागौरी व्रत नवविवाहित महिला तसचं कुमारीकांसाठी खूप लाभदायक असून त्यांनी नियमित याचे पालन केले पाहिजे तसचं, इतरांना देखील या व्रताबद्दल माहिती सांगितल पाहिजे. मित्रांनो, वरील माहिती आम्ही इंटरनेटच्या साह्याने मिळवली असून, खास आपल्याकरिता या लेखाचे लिखाण केल आहे.