Mallakhamb in Marathi
मलखांब हा व्यायामातील एक प्रकार असुन साथीदार नसतांना सराव करण्याकरता मलखांबाचा उपयोग केला जातो.
मल्लखांब हा कवायतींचा देखील एक प्रकार आहे.
मलखांबाचे वर्णनच करायचे झाल्यास कमी वेळात आपल्या षरीराच्या प्रत्येक अवयवाला जास्तीत जास्त व्यायाम देण्याकरता जर कुठल्या क्रिडा प्रकाराचा वापर केला जात असेल तर मल्लखांबचा असं वर्णन मलखांबाचं आपल्याला आढळतं.
कुस्तीतला एक पुरक व्यायाम प्रकार … मल्लखांब – Mallakhamb Information in Marathi
Mallakhamb History – मल्लखांब या खेळचा इतिहास
मल्लखांब खेळाचा इतिहास लिहीलेल्या अवस्थेत फार आढळुन जरी आला नसला तरी देखील तो फार जुना असल्याचे पुरावे आढळतात.
पुराणात आढळुन आलेल्या दाखल्यांमध्ये रामायणकाळी प्रत्यक्ष हनुमंताने या मलखांबाचा शोध लावल्याचे कळते.
ओडीसा राज्यात प्रसिध्द अश्या जगन्नाथपुरी मंदीरा जवळ सुमारे पंधराव्या षतकात एक आखाडा सुरू झाला त्याचे नाव जगन्नाथ वल्लभ आखाडा असे असुन त्याच्या स्थापनेपासुन मल्लखांबाचे प्रशिक्षण दिल्या जाते.
आपल्या महाराष्ट्रामध्ये मल्लखांबाचा इतिहास शोधायचा झाल्यास पेषव्यांच्या काळात याचा मोठा प्रसार प्रचार झाल्याचे पहायला मिळते.
पेषव्यांनी मोठया प्रमाणात कुस्तीचे आखाडे देषभरात सुरू केले. या आखाडयांमधुन इतर व्यायाम प्रकारासोबत मल्लखांबाची देखील सुरूवात करण्यात आली.
इतर समाजाच्या तुलनेत गुराखी समाजात मुल्लखांबाला फार महत्व देण्यात आले आहे.
मल्लखांब राष्ट्रीय संघटनेची स्थापना – National Association Of Mallakhamb (Mallakhamb Federation Of India)
29 जानेवारी 1981 साली मल्लखांब राश्ट्रीय संघटनेची स्थापना मध्यप्रदेशातील उज्जैन येथे करण्यात आली.
मल्लखांब फेडरेषन इंडिया नावाने ही राश्ट्रीय संघटना ओळखली जाते. 29 राज्यांमधील राज्य संघटनांनी आजतागायत नोंदणी केलेली आहे. मल्लखांब खेळाडुंकरता दरवर्शी या राश्ट्रीय संघटनेकडुन राश्ट्रीय स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असतं.
मल्लखांबाविषयी इतिहासात नमुद असलेली गोष्ट – Mallakhamb Story
दुसÚया बाजीराव पेषव्यांच्या काळात सुमारे एकोणिसाव्या षतकाच्या सुरूवातीला मराठी राज्य अतिषय निकराने ब्रिटीशांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा तव्दतच पानिपतात झालेल्या पराभवातुन सावरण्याचा प्रयत्न करू पाहात होते.
फुटीचे राजकारण, राजकिय आणि सामाजिक अस्थिरता, अंतर्गत वाद, यातच पेषव्यांपुढे एक मोठे आव्हान येऊन उभे राहिले.
हे आव्हान आले होते ते हैदराबाद च्या निजामाकडुन…अनेक राज्यांमधुन विजय मिळवल्याने अली आणि गुलाब या दोन भिमकाय बलदंड पहेलवानाचंा आत्मविश्वास अधिकच दुणावला होता आणि या जोरावर पेषव्यांच्या भर दरबारात त्यांनी कुस्तीकरता आव्हान दिले.
पेषव्यांच्या दरबारात असलेल्या बावन्न पहेलवानांपैकी अलि आणि गुलाब ला सामोरे जाण्याची हिम्मत एकानेही दाखविली नाही. अत्यंत कठीण असा प्रसंग पुढे उभा राहिलेला!
एकीकडे पेषव्यांच्या अब्रु चा प्रश्नं उभा झालेला आणि दुसरीकडे दरबारातील बावन्न पहिलवानांपैकी एक ही हिमतीने पुढे यायला तयार नाही हे पाहुन साधारण सतरा अठरा वर्श वयाचे बाळभट देवधर पुढे आले. ते पेषव्यांकडे भिक्षुकी करीत असत.
अली आणि गुलाब यांचे आव्हान त्यांनी स्विकारले आणि तयारीकरता काही अवधी मागितला. नाशिक नजिकचं कोठुरे हे त्यांचं गावं ! गावी जाउन आईचे आशिर्वाद घेतले आणि वणी गडावर जाऊन सप्तश्रृंगीची आराधना सुरू केली.
त्यांची प्रामाणिक आणि कठोर अशी तपश्चर्या पाहुन देवीने असा आशिर्वाद दिला की प्रत्यक्ष रामभक्त हनुमान बाळभटांना कुस्तीचे धडे देतील.
हुनमंताने दृश्टांत देउन बाळभटांना एका लाकडाच्या खांबावर कुस्तीचे डाव शिकवीले.
मागितलेली मुदत संपण्या अगोदर बाळभट पुनश्च पुण्यात आले आणि आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, ताकदीने बलाढय अश्या अलीला आपल्या कुस्तीतील गुणांनी धुळ चारली. बाळभटांचे हे कुस्तीचे डावपेच पाहुन गुलाब पहेलवान तर पळुनच गेला.
बाळभट देवधर ज्या लाकडी खांबावर सराव करीत होते त्याला मल्लखांब असे नाव देण्यात आले.
आणि अशी मल्लखांब या व्यायामप्रकाराची सुरूवात झाली.
पहेलवानांनी आपल्या साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्या लाकडी खांबावर सरावाचे धडे गिरवायचे असतात त्याला ‘मल्लखांब’ असे म्हणतात.
कुस्तीचे आखाडे आणि मल्लखांबाचा प्रचारप्रसार:
सुमारे 1818 दरम्यान मराठा संस्थान खालसा झाले आणि ब्रिटीशांनी उत्तरप्रदेशात कानपुरनजीक ब्रम्हावर्त या ठिकाणी पेषव्यांची रवानगी केली. पुणे येथुन ब्रम्हावर्त येथे जात असतांना पेषव्यांच्या सोबत बाळभट सुध्दा होते.
ज्या ज्या ठिकाणी पेषव्यांचा मुक्काम असे त्या त्या ठिकाणी बाळभट देवधरांनी कुस्तीकरीता आखाडे उभारले त्या कुस्तीच्या आखाडयांमध्ये सुध्दा मल्लखांब लावले.
पहिला आखाडा वाराणसी येथे सुरू झाला. बाहभटांनी कोंडभटनाना गोडबोले, टकेजमाल यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत केले.
पुढे मलखांबाचे प्रात्यक्षिक इतरांना देतांना टकेजमाल नेहमी बाळभटांसोबत असायचे.
ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन, भोपाळ, देवास, बडोदा, सुरत, झांशी, या ठिकाणी सुरू झालेले आखाडे आजही सुरूच आहेत आणि तेथे मल्लखांबाचे प्रशिक्षण दिल्या जातं.
बाळभटांमुळे कोंडभटनाना गोडबोले, टकेजमाल, जुम्मादादा, राजरत्न प्रा. माणिकराव, दामोदरगुरू मोघे, बाळभट दादांचे पुत्र नारायणगुरू देवधर यांनी पुढे भारतात मल्लखांबाचा प्रचार प्रसार होण्याकरीता खुप प्रयत्न केले.
मल्लखांबाच्या इतिहासाविषयी मतमतांतरे:
रामायणाच्या काळी रामभक्त हनुमंताने मल्लखांबाचा शोध लावल्याचे काहीजणांचे मत आहे.
बाराव्या षतकात सुमारे 1135 मध्ये सोमेश्वर चालुक्य यांच्या ‘मानसोल्लास’ ग्रंथात मल्लखांबांवरच्या व्यायामाचा उल्लेख आढळतो.
जगन्नाथपुरी येथील प्राचीन मंदीराजवळ सुमारे पंधराव्या षतकात तेथील जगन्नाथ वल्लभ आखाडयात सुरूवातीपासुन मलखांबाचे प्रशिक्षण दिल्या जात होते.
या प्राचीनकाळी अस्तित्वात असलेल्या परंपरेलाच बाळभट देवधर यांनी नवसंजिवनी दिली असे म्हंटल्यास चुकीचे होणार नाही.
मल्लखांबाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण, ही कला, हा स्वतंत्र व्यायामप्रकार फक्त महाराश्ट्रात अस्तित्वात आहे असे नव्हें तर महाराश्ट्राच्या बाहेरच्या राज्यांत देखील ही कला प्रचलित आहे.
असा असतो मलखांब – Mallakhamb Mahiti
मल्लखांब हा सामान्यतः आठ फुट उंचीचा, सरळ आणि गुळगुळीत तसच वरच्या टोकाकडे निमुळता होत जाणारा असतो.
जमिनीत तो जवळजवळ दोन फुट आत गाडलेला असतो. त्याला पुरलेला मल्लखांब असे म्हणतात.
जमिनीच्या वर दिसणारा भाग हा मनुश्याच्या देहाप्रमाणे दिसतो. सर्वात वरचा भाग म्हणजे गोल डोकं, त्याखाली छोटी मान आणि खालचे षरीर भक्कम पहेलवानासारखे असा या मलखांबाचा आकार असतो.
मलखांब खेळण्याकरता सर्वात उत्तम लाकुड शिसवीचे समजले जाते कारण ते गुळगुळीत असते, त्याची प्रकृती थंड असते त्याच्यावर षरीर कवायत करतांना घसरले तरी कातडे सोलवटुन निघत नाही मात्र सागवानाच्या मलखांबावर ही शाश्वती देता येत नाही.
मल्लखांब पुरतांना देखील विशेष काळजी घेतली जाते.
खड्डयात वाळू,चुना,विटा असे जिन्नस टाकायचे आणि खाली तळभागाला डांबराचा जाड थर लावायचा त्यामुळे त्या लाकडाला वाळवी लागण्याची भिती राहात नाही.
मलखांब ज्या ठिकाणी रोवतात तेथील जमीन सुध्दा अत्यंत मऊ केली जाते त्यामुळे कवायत करतांना खेळाडु सहज चढु आणि उतरू षकतो.
मलखांबाचे प्रकार – Types of Mallakhamb
मलखांबावर कवायतीचे एकुण पंधरा वर्ग आहेत
- सलामी – मल्लखांबावर पकड घेऊन अढयांप्रमाणेच विविध प्रकारे षरीर उलटे करायचे अढी न मारता परत खाली जमिनीवर उतरायचे या क्रियेला ‘सलामी मारणे’ असं म्हणतात.
- अढी – मलखांबावर वेगवेगळया तऱ्हेने शरीर उलटे करावयाचे, पोट मलखांबाच्या बाजुला यायला हवे या प्रकारे दोनही पायांनी मलखांबाला विळखा घालायचा याला अढी असे म्हणतात. हा मलखांबावरील कसरतींमधला प्राथमिक प्रकार समजला जातो.
- सुईदोरा – जसं आपण सुईत दोरा ओवतो अगदी तसच मलखांबाला धरून दोन्ही हातामधल्या जागेतुन पाय समोर टाकायचे व पलटी मारून पाय काढणे याला सुईदोरा असे म्हणतात.
- तेढी – मलखांबाला अनेक तऱ्हेने धरायचे आपल्या षरीराला उलटे करून खांबाकडे पाठ करायची आणि विशिश्ट प्रकारे मलखांबाला विळखा घालायचा त्याला ‘तेढी’ असे म्हणतात.
- दसरंग – अढी, तेढी, बगली हे प्रकार मलखांबावरून न उतरता दोन्ही बाजुनी सारखे करायचे याला ‘दसरंग’ असे म्हणतात.
- फिरकी – दसरंग हा प्रकार करत असतांना हाताची आणि पायाची पकड कायम ठेवायची व वरचेवर आपल्या षरीराला एकीकडुन दुसरीकडे नेण्याच्या प्रक्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात.
- वेल – पायाच्या आणि हाताच्या खास पकडीच्या मदतीने पकडीला सतत बदलायचे आणि हलकेहलके वरती चढण्याच्या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात.
Mallakhamb Chi Mahiti
- उतरती – वर सांगितलेल्या ‘वेल’ या पध्दतीच्या विरूध्द प्रकार यात केला जातो. यात खेळाडु वेलाप्रमाणे पकडी बदलत खाली खाली घसरतो.
- झाप – मलखांबाच्या बोंडावर उभं राहायचं किंवा बसायचं आणि वेगवेगळे फरारे, पतंगी असे प्रकार करत मलखांबापासुन दुर फेकले जायचे आणि तेव्हांच खांबाला अढीत धरायचे याला ‘झाप’ असे म्हणतात.
- फरारे – मलखांबावर खेळाडु आपल्या हाताने अनेक तऱ्हेने धरून आणि पायांना लांब ताठ करतो आणि तोल सांभाळतो या क्रियेला ‘फरारे’ असं म्हणतात.
- बगली – आपल्या बगलेनी मलखांबाला अनेक प्रकारे पकडायचे आणि तेढी मारायची त्याला ‘बगली’ असे म्हणतात.
- आसने – मल्लखांबाच्या अंगापासुन ते बोंडापर्यंत वेगवेगळया तऱ्हेची आसनं निरनिराळया प्रकारे करता येतात.
- आरोहण-उडया – मल्लखांबाच्या नजिक उभं राहुन किंवा काही अंतरावरून पळत येऊन किंवा उडी मारून हातानी पकड घ्यायची अन्यथा न घेता सुध्दा आपल्या पायाने मल्लखांबाला अढित वा तेढीत धरायचे याला ‘आरोहण-उडया’ असे म्हणतात.
- अवरोहण – मलखांबावर अनेक कसरती केल्यानंतर उतरण्याचे सुध्दा खुप प्रकार आहेत त्याला अवरोहण/उडया असे म्हणतात.
- ताजवे – मल्लखांबाच्या बोंडावर पाठ, पोट किंवा आपल्या षरीराचा एखादा भाग टेकवायचा, व मलखांबाला हातापायाने न पकडता षरीर तोलायचे त्याला ‘ताजवे’ (तराजु) असं म्हणतात.
मलखांबाचे इतर प्रकार:
मल्लखांबाचा आणखीन एक प्रकार म्हणजे दोरीचा मल्लखांब. आधी तो वेतावर केला जायचा पण पुढे पुढे वेत मिळेनासं झाल्यामुळे त्याऐवेजी दोरी वापरणे सुरू झाले.
अंगठयाएवढी जाड सुती दोरी वर वीस फुट लांब टांगायची आणि त्या दोरीवर श्वास रोखायला लावणारी चित्तथरारक आणि नयनरम्य कसरती करायच्या.
हा प्रकार जास्त मुली करतांना दिसतात.
टांगत्या मल्लखांबाचा आणखीन एक प्रकार पाहायला मिळतो तो ‘टांगता मलखांब’.
पुरलेल्या मलखांबाच्या तुलनेत अध्र्या उंचीचा, दिसायला तसाच जरी दिसत असला तरी हा वर टांगलेला असतो.
हा मल्लखांब झुलता असतो आणि स्वतःभोवती गोल फिरतो आणि एखादया लंबकासारखा आडवा सुध्दा हलतो. यावर कवायती करणे आव्हानाने भरलेले आणि जोखमीचे असते.
स्पर्धांकरीता हे प्रकार उपयोगात येतात.
या शिवाय बाटली मल्लखांब (काचेच्या बाटल्या), हत्यारी मल्लखांब (शरीराभवती शाॅट लावणे), पलिते मलखांब (हातात जळत्या मशाली घेणे), हे मल्लखांबाचे इतर प्रकार देखील पहायला मिळतात.
मल्लखांबामुळे होणारे शारिरीक फायदे – Benefits Of Mallakhamb
- मलखांबाला तेल लावले असल्याने षरीराचे सतत घर्शण त्या खांबाला होते आणि उत्तमरित्या आपल्या शरीराला तेलाची मालीष होते.
- यकृत, प्लिहा, तसच अंतरिंद्रियही कार्यक्षम राहातात.
- उलट-सुलट वेगवान हालचाली झाल्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण, या शरीरातल्या व्यवस्था कार्यक्षम राहातात.
- अतिरीक्त वाढलेली चरबी, सुटलेले पोट, मेद, कमी होते.
- आपल्या हातापायांचे पंजे, मांडया, पोटऱ्या, दंड,खांदे, यांच्या आतल्या संस्था फार कार्यक्षम होतात.
- पोटाचे स्नायु, बरगडया, पाठीचा कणा बळकट होण्यास मदत मिळते.
- फक्त शारीरीक विकासच नव्हें तर मानसिक स्वास्थ्य मल्लखांबामुळे उत्तम राहाण्यास मदत मिळते.
तसं पाहाता मल्लखांब हा काटकसरीचा खेळ आहे असं म्हंटल्यास ते चुकीचं ठरणार नाही कारण या खेळाकरता तशी कुठलीही सामुग्री लागत नाही.
मोठे क्रिडांगण, चेंडु, रॅकेट, बॅट, बुट याची देखील आवश्यकता नाही.
शरीराची जडणघडण उत्तम होते, प्रमाणबध्द शरीर, उत्तम आरोग्य, कुशाग्र मानसिक क्षमता, आजच्या वेगवान स्पर्धेकरता लागणारे क्रिडाकौषल्य मिळवायचे असेल तर ‘मल्लखांब’ हा उत्तम पर्याय आहे.
Read More:
- कबड्डी या खेळाची संपूर्ण माहिती
- क्रिकेट या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास
- खो-खो या खेळाबद्दल संपूर्ण माहिती
आशा आहे की आपणास “मल्लखांब या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Mallakhamb Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल.
जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.