Malana Village Rules and History
भारत हा सर्व धर्म समभाव असणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखल्या जातो, आपल्या देशात बरेच असे रहस्य आहेत ज्यांचे अजूनही कोणाला कारण कळले नाही, जगात सुद्धा भारताची एक वेगळी ओळख आहे,
काही घटना आणि ठिकाण एवढे प्रसिद्ध आहेत कि त्या ठिकाणांना भेट द्यायला विदेशातील बरेचशी मंडळी येतात. आणि या ठिकाणांवर विदेशात जाऊन लिखाण करतात, आणि जगाला त्या ठिकाणांचे दर्शन घडवतात,
अश्याच प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे, जेथे जगात कुठेही न बोलली जाणारी भाषा बोलली जाते, तर आजच्या लेखात आपण अश्याच एका ठिकाणाविषयी माहिती पहाणार आहोत जे भारतात आहे पण तिथे राजा सिकंदर चे काही वंशज राहतात, तर चला जाणून घेवूया त्या गावाविषयी.
भारतातील असेही एक गाव जिथे आहेत राजा सिकंदर चे वंशज – Malana Village Rules and History in Marathi
पूर्वोत्तर भारतातील हिमाचल प्रदेश मधील हे एक छोटेशे गाव आहे, या गावाचे नाव आहे मलाना. या गावाला जायला कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नाही आहे. या गावाला जाण्यासाठी रस्त्याने दगडांच्या पायऱ्या केलेल्या आहेत,
या सर्व पायऱ्यांना चढून च आपल्याला या गावात जाता येत. “जरी” नावाच्या गावाजवळ पार्वती घाट म्हणून एक घाट आहे. “जरी” गावापासून तर मलाना गावापर्यंत पोहचण्यासाठी एकूण ३-४ तासांची वेळ लागते.
जरी गावापासून या गावाचा रस्ता सरळ उंचीवर आहे. या गावाच्या आजूबाजूला सगळीकडे खोल दऱ्या तसेच उंचच्या उंच पहाड सुद्धा आहेत.
गावात आहेत सिकंदर चे वंशज – Malana Village History
मलाना गावाची एकूण लोकसंख्या १७००-१८०० आहे. या गावाला दरवर्षी अनेक लोक भेट देतात. मग ते पर्यटक असोत कि आणखी कोणी. या गावात राहणारे लोक स्वतःला राजा सिकंदर चे वंशज मानतात, यामागचे कारण असे कि,
जेव्हा राजा सिकंदर भारतात आला होता तेव्हा त्याचे काही सैनिक या गावात राहिले होते आणि त्यानंतर ते येथेच राहून स्थित झाले होते, यामुळे येथील काही लोक स्वतःला त्यांचे वंशज मानतात, एवढचं नाही तर या गावात एका मंदिरात राजा सिकंदर ची एक जुनी तलवार ठेवलेली आपल्याला दिसते.
या गावातील जे म्हातारे लोक आहेत ते बाहेरून आलेल्या लोकांशी स्वतःचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाहीत, एवढच नाही तर तिथे एखाद्या दुकानावर आपण काही घ्यायला गेलो तर ते आपल्याला आपल्या हाती वस्तू देत नाहीत ते खाली ठेवून देतात आणि आपल्याला सुद्धा पैसे खाली ठेवायला सांगतात.
पण तेथील नवीन पिढी ह्या गोष्टींना मानत नाही. ते कोणाशीही बोलतात आणि बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी हात मिळवतात. पण या गावाची एक गोष्ट वेगळी आहे या गावातील लोक एक वेगळी भाषा बोलतात जे फक्त त्यांनाच समजते इतर कोणत्याही व्यक्तीला ती भाषा समजत नाही, त्या भाषेचे नाव “कनाशी” आहे.
एवढच नाही तर ते कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हि भाषा शिकवत नाहीत. या गावाविषयी असे सुद्धा म्हटले जाते कि या गावातील लोक लग्न सुद्धा त्यांच्याच गावात करतात. आणि कोणी गावच्या बाहेर लग्न केले तर त्याला समाजातून बाहेर काढून टाकल्या जात. पण अशा घटना खूप कमी झालेल्या निदर्शनास आल्या आहेत.
नशेचे पदार्थ – Malana Cream
सोबतच या गावात चरस सारख्या नशेली पदार्थाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात केल्या जाते, आणि येथून बाहेर गावांमध्ये याची विक्री केल्या जाते. याचा प्रभाव गावातील काही लहान मुलांवर पडत आहे, काही मुले तर लहानपणापासून नशेली पदार्थ विकायला लागतात.
यामुळेच या गावात बाहेरून येणाऱ्या लोकांना रात्री गावामध्ये येण्यास परवानगी नाही आहे, याचसोबत या गावातील लॉज रात्री बंद होऊन जातात. आहे ना हे एक आगळे वेगळे गाव.
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला सोशल मिडीयावर सांगायला विसरू नका.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!