Majhi Aai Nibandh
आपल्याला सर्वांना माहिती आहे कि जीवनात आईच महत्व काय आहे ते. जगापेक्षा ९ महिने जास्त आई आपल्याला ओळखते लहान पणापासून आपल्याला काय हवं काय नको याची काळजी ती घेत असते. अगदी स्वतः ला विसरुन.
अस म्हणतात कि, आपली प्रथम गुरू आई असते जी आपल्याला बोलणे, चालणे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी संस्कार शिकवते. आपल्याला आयुष्यात योग्य अयोग्य याची जाणीव करून देते आपल्या जीवनात योग्य शिस्त लावते देश समाज कुटुंब कर्तव्य आदर्श या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगते. आईच्या प्रेमाची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही.
मित्रांनो आईची महती सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात तरी सुध्दा आजच्या या लेखात आम्ही आपल्या साठी आई या विषयावर निबंध घेऊन आलो आहोत आशा करतो हा “माझी आई” हा निबंध उपयोगी पडेल.
“माझी आई” या विषयावर निबंध – Majhi Aai Nibandh in Marathi
Short Essay on My Mother in Marathi
माझी आई खूप प्रेमळ आहे. ती आम्हां सर्वांची म्हणजे घरातल्या सर्वांचीच खूप खूप काळजी घेते. सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती घरासाठी सतत काहीना काही करत असते.
माझी आई दररोज सकाळी लवकर उठुन घरातली सगळी काम करून. आमचे शाळेत न्यावयाचे खाऊचे डबे तयार करते आणि मगच आम्हांला उठवते. आमची तयारी करायला आम्हांलाती खुप मदत करते. आम्हांलाही ती न्याहरी करायला लावून शाळेत पाठवते नंतर ती कामावर जाते.
संध्याकाळी घरी आल्यावर आई प्रथम घर नीटनेटके करते. मग स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाक करता करता ती आमचा अभ्यास घेते. आम्ही अभ्यास केला नाही तर तिला खूप राग येतो. कधी कधी ती मारही देते. आमचे वाढदिवस ती दणक्यात साजरे करते. सगळे सणवार ती आनंदात साजरे करते. ती स्वतः आनंदी राहते आणि आम्हा सर्वांना आनंद देते. अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते.