Maharshi Dhondo Keshav Karve
महर्षी धोंडो केशव कर्वे यांची संपूर्ण माहिती – Maharshi Dhondo Keshav Karve Information in Marathi
नाव (Name): | महर्षी धोंडो केशव कर्वे |
जन्म (Birthday): | 18 एप्रील 1858 |
कार्य (Work): | स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा |
वडिल (Father Name): | केशव कर्वे |
पत्नी (Wife Name): | राधाबाई धोंडो कर्वे, आनंदीबाई धोंडो कर्वे |
मृत्यु (Death): | 9 नोव्हेंबर 1962 |
पुरस्कार (Awards): | भारतरत्न |
महिलांना शिक्षण मिळावे, त्यांच्या हक्काची त्यांना जाणीव व्हावी, विधवांना पुर्नविवाह करता यावा यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आपल्या वयाची 104 वर्ष अविरत संघर्ष केला. महर्षी कर्वे यांना धोंडो केशव आणि अण्णासाहेब या टोपण नावाने देखील ओळखले जायचे.
त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात 18 एप्रील 1858 ला रत्नागिरी जिल्हयात खेड तालुक्यामधे शेरावली या गावी झाला. त्यांचे बालपण मुरूड या रत्नागिरी जिल्हयातील एका गावात गेले.
शिक्षणाकरता त्यांना फार परिश्रम घ्यावे लागले, दुरवर पायपीट करावी लागायची 1881 ला ते मॅट्रिक झाल्यानंतर मुंबई येथील एल्फिन्स्टन काॅलेजात गणिताची पदवी घेण्याकरता त्यांनी प्रवेश मिळवीला. कर्वे 14 वर्षांचे असतांना त्यांचा विवाह 8 वर्षांच्या राधाबाईंशी झाला.
राधाबाईंचा वयाच्या 27 व्या वर्षी 1891 ला बाळांतपणात मृत्यु झाला, कर्वेंनी त्या वर्षी फग्र्युसन काॅलेज येथे गणित हा विषय शिकविण्यास सुरूवात केली. 1914 पर्यंत त्यांचं हे कार्य सुरू होतं. राधाबाईंच्या निधनानंतर कर्वेंना पुर्नविवाह करण्यासंबंधी घरून फार आग्रह झाला. त्यावेळी त्यांचे वय 45 च्या आसपास होते.
प्रौढ विधुराचा विवाह देखील त्याकाळी लहान वयाच्या कुमारीकेशी लावुन देण्याची प्रथा होती परंतु जर मुलीच्या पतीचे लवकर निधन झाले तर तिला मात्र तीचं आयुष्य विधवा म्हणुन व्यतीत करावे लागे. महर्षी कर्वेंना ही बाब अजिबात मान्य नव्हती आणि म्हणुन त्यांनी पंडीता रमाबाईंच्या शारदा सदन येथे वास्तव्यास असलेल्या गोदुबाई या विधवेशी पुर्नविवाह केला.
समाजाला ही गोष्ट अजिबात रूचली नाही आणि म्हणुनच ज्यावेळी ते पत्नीसह मुरूड येथे गेले तेव्हा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता. पण एवढयाने खचतील ते कर्वे कसले त्यांनी या गोष्टींचा देखील धिटाईने सामना केला. गोदुबाई पुढे आनंदी कर्वे व बाया कर्वे या नावाने प्रसिध्द झाल्या. महिर्षी कर्वेंच्या कार्यांत त्यांनी यथोचित साथ दिली आणि बरोबरीने उभ्या राहिल्या.
महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ज्यावेळी हा पुर्नविवाह केला ती व्यक्तीगत बाब नसुन त्यावेळी समाजाल्या जुन्या विचारांशी केलेले ते एक बंडच होते. समाजात विधवा पुर्नविवाहाची बाब वाढीस लागावी म्हणुन केलेली ती एक जागरूकताच होती.
21 मे 1894 रोजी कर्वेंनी पुर्नविवाह केलेल्यांचा एक मेळावा भरविला आणि या वेळी त्यांनी ’विधवा विवाह प्रतिबंध निवारक’ मंडळाची स्थापना देखील केली. विधवांना पुन्हा विवाह करण्यास विरोध करणा.या लोकांवर अंकुश लावण्याची जवाबदारी या मंडळाची होती.
रूढी परंपरांमधे गुरफटलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास घेता यावा केशवपन, बालविवाहा सारख्या परंपरा बंद व्हाव्यात म्हणुन अनाथ बालीकाश्रमाची त्यांनी 1896 ला स्थापना केली.
कर्वेंचे कार्य – Maharshi Karve Social Work
1900 साली अण्णांनी अनाथ बालिकाश्रमाचे स्थानांतर पुण्यातील हिंगणा (आताचे कर्वेनगर ) येथे केले. येथे विधवांकरता वसतीगृहाची त्यांनी निर्मीती केली त्यामुळे विधवा महिलांना हक्काचे छत मिळाले.
या ठिकाणी 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयात महर्षी कर्वेंची 20 वर्ष वयाची विधवा मेहुणी ’पार्वतीबाई आठवले’ पहिली विद्यार्थिनी होती. आश्रमाच्या आणि शाळेच्या कार्याकरता कौशल्यपुर्ण मनुष्यबळाची आवश्यकता होती त्याकरता कर्वेंनी 1910 साली ’निष्काम कर्ममठा’ची स्थापना केली.
या संस्थांचे कार्य पुढे वाढत गेल्याने या संस्थांना एकत्र करण्यात आले त्याचे नामकरण सुरूवातीस ’हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ’ व पुढे ’महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे करण्यात आले. जपान येथे कर्वेंनी भेट दिल्यानंतर तेथील महिला विद्यापीठ पाहुन ते अत्यंत प्रभावीत झाले आणि पुणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना केली.
विðलदास ठाकरसी यांनी भरीव असे 15 लक्ष रूपयांचे त्याकाळी अनुदान दिल्यामुळे विद्यापीठाला ’श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले. विधवा महिलांचे प्रश्न त्यांचे शिक्षण याकरीता कर्वेंनी भरीव कार्य केलं. अस्पृश्यता, जातीभेद, जातीव्यवस्था या विरोधात देखील त्यांनी आवाज उचचला.
महर्षी कर्वेंची 4 मुलं रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनी देखील अनेक क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य केले आहे. महर्षी धोंडो केशव केर्वे यांचे मराठी (आत्मवृत्त 1928) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक 1936) अश्या दोनही भाषांमध्ये आत्मचरित्र लिहीण्यात आले आहे. महर्षी कर्वेंनी स्त्रीला सन्मानाची वागणुक मिळावी याकरीता व स्त्रीयांच्या शिक्षणाकरता मोलाचं कार्य केलं आहे.
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ धोंडो केशव कर्वेबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्