Mahalaxmi Aarti Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या आणि दक्षिणेची कशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्हातील करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी माता यांच्या बद्दल थोडक्यात वृत्तांत सांगणार आहे. शिवाय, त्यासोबतच कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात दररोज पहाटेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या आरतीचे लिखाण आणि त्यांचे महात्म्य सांगणार आहे.
कोल्हापूरची करवीर निवासीनी श्री महालक्ष्मीची आरती – Mahalaxmi Aarti Marathi
Jay Devi Jay Devi Jay Mahalaxmi
॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥
पौराणिक कथांमध्ये वर्णिल्या प्रमाणे ५२ शक्तीपीठांपैकी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिस्थळ आहे आणि महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असणाऱ्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण स्वरूपी शक्तीपीठ आहे.
कोल्हापूर येथील शक्तीपिठाचे वर्णन पुराणांमध्ये देखील आढळून येते. या पुरातन कालीन मंदिराचे निर्माण चालुक्य राजांनी इ.स. सातव्या शतकात केल होत. हे तीर्थ स्थळ मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपुजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या तीर्थक्षेत्राला दक्षिणेची कशी देखील म्हटल जाते.
अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात केली जाते. मित्रांनो, कोल्हापूर येथील नवरात्री महोत्सव पाहण्याजोगा असतो. या ठिकाणी दरोरोज देवीचे रूप बदलले जाते. येथील मंदिरावर करण्यात आलेली रोषणाई लोकांना आपल्याकडे आकर्षित करीत असते. तसचं, या ठिकाणी रोज होम हवन पूजा अर्चना होत असते.
नवरात्री महोत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या निमित्त देवींच्या आरत्या देखील म्हटल्या जातात. आई अंबाबाई म्हणजेच लक्ष्मीमाता ही आपल्या भक्तांना नवसाला पावणारी देवी आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. आम्ही देखील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्ती पीठ मानल्या जाणाऱ्या जगदंबा मातेच्या आरतीचे लिखाण केलं आहे. मित्रांनो, आपण या आरतीचे वाचन करून इतरांना देखील नक्की पाठवा. धन्यवाद..
मित्रांनो, आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशांत देवींचे एकूण ५२ शक्तीपीठ अस्तित्वात आहेत. त्यांपैकी साडेतीन शक्तीपीठ ही आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत. दक्षिणेची कशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेला पूर्ण शक्तीपीठ मानलं जाते.
कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता । मातुः पुरुं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितम् । तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैव च॥
या वर्णनानुसार कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिराला पूर्ण शक्तीपीठ संबोधले जाते. दुसरे शक्तीपीठ हे माहुरची रेणुकामाता आणि तिसरे शक्तीपीठ तुळजापूरची तुळजा भवानी माता आणि नाशिक जिल्हातील वणी येथील सप्तशृंगी गडावर विराजमान असलेली सप्तशृंगी मातेला आर्ध शक्तीपीठ मानलं जाते.
अश्या प्रकारची साडेतीन शक्तीपीठ आपल्या राज्यात अस्तित्वात आहेत. या शक्तीपीठांचे महात्म्य देखील तितकेच महत्वाचे आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने भक्तजन या स्थळी दर्शनासाठी जातात.
मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या जीवनांत आईला महत्व आहे त्याच प्रमाणे ही देखील एक आईच आहे. जगदंबा, रेणुका आणि सप्तशृंगी अश्या विविध रुपात विराजमान असेलेली ही माता आपल्या लेकरांच्या हाकेला धावून येणारी आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्री निमित्त मोठी यात्रा असते. तसचं, मंदिरात दरोरोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ तिन्ही पहारी आरती होत असते. नवरात्री निमित्ताने आपण देखील आपल्या घरी नऊ दिवस दिवा लावून सकाळ संध्याकाळी आरती ही करीत असतो. याकरिता आम्ही खास आपल्यासाठी माता लक्ष्मीच्या आरतीचे लिखाण केलं आहे. ही आरती लक्ष्मीमातेला अनुसरून असून आपण या आरतीचे पठण लक्ष्मी पूजनाच्या वेळी देखील करू शकतो. धन्यवाद.