Mahadev Govind Ranade Mahiti
एक वैशिष्टयपुर्ण भारतिय विव्दान, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक… महादेव गोविंद रानडे.
ते भारतिय राष्ट्रीय काॅंग्रेस चे संस्थापक सदस्य देखील होते.
रानडे बाॅम्बे लेजिस्लेटिव कौंसिल चे सदस्य असुन देखील अनेक पदांवर त्यांनी कार्य केलं आहे.
याशिवाय ते केंद्रात वित्तआयोग समितीचे सदस्य आणि मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधिश देखील राहिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ता ’’महादेव गोविंद रानडे’’ – Mahadev Govind Ranade
प्रसिध्द व्यक्ति असुन देखील त्यांचे व्यक्तिमत्व फार शांत आणि प्रभावशाली असे होते.
ब्रिटन सोबत सामंजस्य करून भारतात सुधारणा करण्याची त्यांची ईच्छा होती.
आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी वक्र्तृत्वतेजक सभा, पुणे सार्वजनिक सभा आणि प्रार्थना समाजाच्या स्थापनेत मोलाचे सहकार्य केले आणि तव्दतच ते बाॅम्बे अॅंग्लो मराठी वृत्तपत्र व इन्दुप्रकाश वृत्तपत्राचे संपादक म्हणुन देखील कार्य करायचे. या वृत्तपत्रांची निर्मीती सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करावयासाठी रानडे यांच्या विचारधारेनुसार करण्यात आली होती.
रानडे यांचे प्रारंभिक जीवन – Mahadev Govind Ranade Information in Marathi
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्हयातील निफाड गावी एका चित्पावन ब्राम्हण कुटुंबात झाला.
त्यांच्या पहिल्या पत्नी च्या मृत्युनंतर त्यांनी एखाद्या विधवेशी विवाह करावा अशी त्यांच्या मित्रांची ईच्छा होती पण परिवाराच्या ईच्छेनुसार ते एका बालिका वधुशी विवाहबध्द झाले.
रानडेंच्या मृत्युपश्चात रमाबाई रानडे यांनी समाजात सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेची अनेक कामं केलीत.
रानडेंचे सामाजिक कार्य –
रानडे सामाजिक विश्वास अभियानाचे संस्थापक होते, त्याचे समर्थन त्यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत केले.
बालविवाह, महिलांचे केशवपन, लग्न समारंभात होणारा अवाजवी खर्च, सामाजिक भेदभाव, या सर्व समस्यांचा त्यांनी आयुष्यभर विरोध केला आणि सतत या प्रथांमधे बदल करण्याकरता प्रयत्नरत राहिले.
1861 साली विधवा पुर्नविवाह संस्थेच्या संस्थापक सदस्यांमधे रानडे एक होते. अंधविश्वास, बुवाबाजी याचा त्यांनी सतत विरोध केला शिवाय सर्वधर्मांना देखील या अंधविश्वासावर विश्वास न ठेवण्यासंबंधी ते प्रवृत्त करीत होते.
महादेव गोविंद रानडे, इतिहासकार डाॅ. आर.जी. भंडारकर आणि वामन आबाजी मोडक यांनी एकमेकांच्या सहाय्याने महाराष्ट्र महिला शैक्षणिक विभाग आणि ’हुजुर्पगा’ या पुण्यातील सर्वात प्राचीन शाळेची स्थापना 1885 साली केली.
कार्य:
रानडे, महादेव गोविंद, राइज ऑफ दी मराठा पावर (1990), पुर्नप्रकाशन (1999)
बिपन चन्द्र, रानडेंचे आर्थिक लेख, ज्ञान बुक्स प्रायव्हेट लिमिटेड
प्रसिध्दी:
झी मराठी या वाहिनीवर 2012 साली ’उंच माझा झोका’ नावाची मालिका प्रसारीत करण्यात आली होती.
या मालिकेत रमाबाई रानडे आणि महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनावर आणि महिलांच्या हक्कासाठी त्यांनी जो आवाज ऊचलला त्याविषयी दाखविण्यात आले होते. ही मालिका महाराष्ट्रात फार लोकप्रीय झाली.
“आमच्या आयुष्यातील काही आठवणी” या रमाबाई रानडे लिखीत पुस्तकावर आधारीत ही मालिका होती.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ महादेव गोविंद रानडेबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्