बरेचदा आपण सामान्य ज्ञानात पाहत असतो की जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे, जगातील सर्वात मोठी नदी ही अमेझॉन नदी आहे, अश्याच प्रकारे बरेचशे प्रश्न असतात जे जगातील सर्वात मोठे आणि लहान यांची तुलना आपल्याला करताना दिसतात. मग ते सजीव प्राणी असो की एखादी निर्जीव गोष्ट असो. पण काही गोष्टी अश्या असतात की त्यांच्या विषयी माणूस माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो.
तर आज आपण आजच्या लेखात पाहणार आहोत की संपूर्ण विश्वात हलके असणारी गोष्ट कोणती आहे. जी वजनाने हलकी आहे. आपण जर हा लेख वाचत असाल याचा अर्थ आपण लेखाचे शीर्षक वाचून ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी येथे आलात तर आपल्याला सांगू इच्छितो की या लेखाद्वारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तर चला पाहूया..
जगातील सर्वात हलका पदार्थ एरोजेल – Lightest Material on Earth
जगातील वजनाने सर्वात हलका पदार्थ कोणता ? – Aerogel Ultralight Material
जगातील वजनाने सर्वात हलका पदार्थ हा एरोजेल आहे. याला जास्तकरून हवेची संज्ञा दिली जाते कारण हा पदार्थ ९९.८% हवेपासूनच बनलेला आहे.हा पदार्थ दिसायला पारदर्शी असतो आणि निळ्या रंगाचा असतो.
एरोजेल हा पदार्थ धुक्याप्रमाणे आहे. ज्याला सिलिकॉन डायऑक्ससाईड आणि वाळूचे मिश्रण करून बनविल्या जाते. आणि याच पदार्थांचा वापर करून काच बनविल्या जात असतो. पण एरोजेल हा काचापेक्षा वजनाने खूप हलका असतो. आणि या पदार्थाची एक विशेषतः म्हणजे हा पदार्थ त्याच्या वजनापेक्षा हजारो पटीने मोठा दाब सहन करू शकतो. जवळ जवळ १२०० डिग्री तापमानावर जाऊन हा पदार्थ वितळतो.
एरोजेल चा शोध कोणी लावला? – Who Invented Aerogel
इसवी सन १९३२ मध्ये सॅमूलर किसलर या शास्त्रज्ञाने या पदार्थाचा शोध लावला. तेव्हाच्या काळात ही खूप मोठी उपलब्धी होती. या पदार्थाचा उपयोग सुरुवातीला वायर च्या इंस्युलेटर साठी केला जात होता. पण काही काळानंतर या पदार्थाचा वापर अंतरिक्ष मध्ये पाठवल्या जाणाऱ्या जेट मध्ये केला गेला. या पदार्थाचा शोध लागल्या नंतर या पदार्थाला अधिकृत करण्यात आले. मॉनसॅनटो या कंपनीने हा पदार्थ अधिकृत केला. परंतु द जेट प्रॉपलशन लॅबोरेटरी ने या पदार्थाला योग्य रित्या ओळखले आणि त्यांनंतर या पदार्थाला अंतरिक्ष च्या जेट साठी वापरण्यात आले.
तर आजच्या लेखात आपण पाहिले जगातील सर्वात हलका पदार्थ एरोजेल विषयी थोडक्यात माहिती पाहिली आशा करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल आपल्याला ही माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!