Limbu chi Mahiti
आपल्याला रोजच्या आहारात लागणारे फळ, म्हणजे लिंबू. जेवणात कांदा-लिंबू हा जोडीने येणारा शब्द म्हणजेच रस्सेदार भाजीवर लिंबू पिळून जेवतांची वेगळीच मजा असते. चटपटीत लीबाचे लोणचे, तर उन्हाळातील थंडगार निंबू-शरबत लोकांचे आकर्षण आहे.
लिंबू मध्ये बरेच गुणधर्म आहेत. लिंबा मध्ये महत्वाचा घटक म्हणजे सायट्रिक ऍसिड असून इतर घटक व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम यांचा समवेश आहे.
लिंबू ची संपूर्ण माहिती – Lemon Information in Marathi
हिंदी नाव: | नीबू |
इंग्रजी नाव: | Lemon |
कागदी लिंबाचे झाड हे साधारण आठ ते नऊ फूट उंच असते. त्याचा आकार घेरदार असतो. फांद्या पसरट असतात. या झाडाला मोठे मोठे काटे असतात. त्यांचा रंग हिरवा असतो, याची साल पांढरट राखाडी रंगाची असते. पाने हिरवीगार असून, त्यांना मंद सुगंध येतो. या झाडांना पांढऱ्या रंगाची फुले नंतर फळे येतात. ही फळे म्हणजेच दबू होय, कच्चे लिंबू हिरवेगार तर पिकल्यानंतर पिवळ्या रंगाचे होते. कार गोल असतो. लिंबात पाच-सहा बारीक पांढऱ्या बिया असतात. शिष्ट्य:या फळाची चव आंबट असते.
प्रकार : या फळाचे दोन प्रकार आहेत. कागदी लिंबू व इडलिंबू,
लिंबूचे औषधी उपयोग – Lemon Benefits
- उलटी, मळमळ यावर लिंबू सरबत उपयोगी ठरते.
- लिंबाचा रस आणि खोबरेल तेल उकळून गार करून ते केसांना लावले तर केस वाढतात.
- पोटदुखी, अजीर्ण या विकारांचा त्रास होऊ नये म्हणून जेवणानंतर लिंबूपाणी घ्यावे.
- कोमट पाणी व लिंबूरसाच्या मिश्रणाने पोटाचे विकार होत नाही.
- दातांच्या, हाडांच्या मजबुतीसाठी लिंबू गुणकारी आहे.
- पित्त झाल्यास लिंबाच्या रसाने ते कमी होण्यास मदत होते व अन्नपचन नीट होते.
- लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकळी उपाशी पोटी गरम पाण्यात घेतल्यास अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
लिंबाची लागवड – Limbachi Lagwad
पाणी निचरा करणारी जमीन याला लागते , थोडी भुसभुशीत, हलकी ,काळी मुरमाड असणारी जमीन याला लागते .आता आलेल्या सुधारित जाती साई शरबती तर फुले शरबती आहे. लाग्वादाचे अंतर 6 बाय 6 मीटर ठेवावे तर खड्ड्याचा आकार 1 बाय 1 असावा लागतो . रोप लागवड करण्यास सोपी जाते. 5 वर्षावरील एक झाड जवळपास 75 ते 125 किलो लिंबू देते.
प्रकार: या फळाचे दोन प्रकार आहेत. कागदी लिंबू व इडलिंबू,
इतर उपयोग : Other Uses
लिंबाचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी करतात. शारीरिक कष्टाने थकवा किंवा उन्हाने त्रास होत असेल तर लिंबाचे सरबत गुणकारी ठरते. लिंबाचे गोड व तिखट लोणचे करतात. तसेच मिरची व लिंबू यांचे लोणचे केले जाते. रोजचे जेवण रुचकर, स्वादिष्ट होण्यासाठी जेवणात लिंबाची फोड वापरतात. साखरेच्या पाकात लिंबू पिळून सुधारस हा गोड पदार्थ जेवणात पक्वान्न म्हणून वापरतात.
असे हे बहुगुणी लिंबू जाड, पातळ, पिवळी, हिरवी, सपक आणि खरखरीत साल अशा विविध प्रकारचे असते. पायाला भेगा पडल्या तर लिंबूरस तेलात मिसळून लावतात. तसेच साबणातसुद्धा लिंबाचा वापर करतात. या झाडाची लागवड बिया लावून करतात, एक जोड धंदा म्हणून लिंबाची झाडे लावतात.
लिंबू विषयी काही प्रश्न – Quiz Question Lemon
उत्तर: सायट्रिक आम्ल ( ऍसिड)
उत्तर: विटामिन सी जे immune system ला boost करण्याचे कार्य करते.
उत्तर: जरी पाने हे विषारी नसलेले (non-toxic ) असले तरी, ते तसच खाल्यास शरीरासाठी फारसे उपयोगी नाही. आपण नेहमी त्याला पाण्यात उकळून ते पाणी प्यावे किवा त्या पानांवर काही वेळ आपले अन्न पदार्थ ठेवावे, जेणेकरून त्या अन्नामार्फात आपल्या शरीरासाठी उपयोग होतो.
उत्तर: हो, यात विटामिन सी असल्याने, ते अँटिऑक्सिडंट सारखे त्वचा चागली ठेवण्यास मदत करते.