Lal Bahadur Shastri in Marathi
ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधी वादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री एक महान नेता, व स्वातंत्र्य सेनानी, होते. त्याचप्रमाणे, पूर्ण देशांत त्यांची प्रतिमा, एक दूरदर्शी, इमानदार आणि निष्ठावंत राजनेत्याच्या स्वरुपात प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक संकटांना सामोरे जात देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले.
लाल बहादूर शास्त्री त्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे याकरिता आपले जीवन समर्पित केले होते. त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून देशांतील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत करून इंग्रज सरकारला त्रासून टाकले होते. अश्या प्रकारे त्यांनी देशाच्या अनेक भागात इंग्रज सरकारविरुद्ध भडकावू भाषण करून तेथील लोकांच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याप्रती आग निर्माण केली.
इतकेच नाही तर, देशांत दुध उत्पादनाला चालना देण्यासाठी त्यांनी ‘श्वेत क्रांतीला’ पाठिबा दर्शविला. चला तर जाणून घेवूया महान, स्वतंत्र सेनानी, निष्ठावंत आणि इमानदार राजनेता म्हणून ओळख असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन चरित्र.
स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान ….. लाल बहादूर शास्त्री – Lal Bahadur Shastri Information in Marathi
श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन परिचय – Lal Bahadur Shastri Biography in Marathi
नाव | लाल बहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव |
जन्म | २ ऑक्टोबर १९०४ |
जन्मस्थान | मुगलसराय, वाराणसी, उत्तरप्रदेश |
वडील | मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव |
आई | राम दुलारी देवी |
शिक्षा | हरिश्चंद्र विद्यालय, कशी विद्यापीठ |
पत्नी | ललिता देवी |
मृत्यू | ११ जानेवारी १९६६ |
पुरस्कार | “भारत रत्न” |
“संविधानाने दिलेल्या कायद्यांचा नेहमी सम्मान केला पहिजे, ज्यामुळे आपल्या लोकशाहीची मुलभूत रचना टिकून राहील आणि मजबूत बनेल.”
लाल बहादूर शास्त्री यांचे सुरुवाती जीवन – Lal Bahadur Shastri Chi Mahiti
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान देणारे, थोर स्वातंत्र्य सेनानी व सच्चे देशभक्त लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ साली उत्तरप्रदेश राज्यांतील मुगलसुराय येथे एका प्राध्यापकांच्या घरी झाला होता. लाल बहादूर शास्त्री यांचे वडील मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव एक इमानदार आणि प्रतिष्ठित अध्यापक होते.
ज्यांनी काही काळ आयकर विभागात सेवा दिली होती. लाल बहादूर शास्त्री दीड वर्षाचे असतांना त्यांच्या जीवनांत एक दु:खद घटना घडली. त्यांचे वडील मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव यांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या आई रामदुलारी शास्त्री त्यांना घेऊन आपल्या माहेरी मिर्झापुर या गावी वडिल हजारी लाल यांच्या घरी घेऊन आल्या. त्यामुळे त्यांचे बालपण हे आजोळी आजी आजोबांच्या सान्निध्यात झाले.
लाल बहादूर शास्त्री यांचे शैक्षणिक जीवन – Lal Bahadur Shastri Education
लाल बहादूर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या आजोळी मिर्झापुर येथेच झाले. तर, माध्यमिक शिक्षणाकरिता त्यांना वाराणसी येथे जावे लागले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद नामक गुरु भेटले. त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी कशी विद्यापीठ (वर्तमान महात्मा गांधी कशी विद्यापीठ) मधून पद्वी ग्रहण केली. निल्कामेश्वर प्रसाद यांनी लाल बहादूर शास्त्री यांना महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व समजावून सांगितले.
लाल बहादूर शास्त्री अकरा वर्षाचे असतांना बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी महात्मा गांधी आल्याचे त्यांना दिसले. त्याठिकाणी महात्मा गांधी यांचे भाषण ऐकून ते भारावून गेले. यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांची पाठ कधीच सोडली नाही. महात्मा गांधी यांचे चंपारण्य आंदोलन, रौलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनां त्यांच्या मनात घर करून बसल्या होत्या.
विदेशी मालाचा बहिष्कार, स्वदेशी वापर या सारख्या महात्मा गांधी यांच्या आंदोलनाच्या विचाराच्या विळख्यातून सुटताच सन १९२६ साली कशी विद्यापीठाने त्यांना “शास्त्री” ही उपाधी देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मूळ नाव “श्रीवास्तव” असतांना त्यांच्या नावासमोर “शास्त्री” हे नाव जोडल्या गेले. शास्त्रींनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशांचे महान स्वातंत्र्यसेनानी लाल लाजपत राय यांच्या द्वारा सुरु करण्यात आलेल्या ‘द सर्वेन्ट्स ऑफ़ द पीपल सोसाइटी” शी जोडल्या गेले.
लाला लाजपत राय यांनी सुरु केलेल्या ‘द सर्वेन्ट्स ऑफ़ द पीपल सोसाइटी” चा मुख्य उद्देश्य हा देशांतील नव युवकांना प्रशिक्षित करून त्यांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याकरता त्यांनी नेहमीच जागृत असलं पाहिजे. यानंतर सन १९२७ साली लाल बहादूर शास्त्री यांचा ललिता देवी यांच्यासोबत विवाह झाला. या दाम्पत्यांना लग्नानंतर सहा आपत्ये झाली.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल बहादूर शास्त्री यांचे महत्वपूर्ण योगदान – Lal Bahadur Shastri History
ब्रिटीशांच्या राजवटीपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांपैकी लाल बहादूर शास्त्री हे देखील थोर क्रांतिकारक होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले सर्वस्व अर्पण करून देशांतील लोकांच्या मनात आपल्या भाषणाच्या माध्यमातून स्वातंत्र्याची टिंनगी पेटवली होती. लाल बहादूर शास्त्री केवळ १६-१७ वर्षाचे असतांना त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात उडी घेतली होती. शास्त्रीजी महात्मा गांधी यांच्या विचारधारे मुळे खूप प्रेरित झाले होते. त्यामुळे ते महात्मा गांधी यांना आपले गुरु मानत असत.
महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध चालवलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी होवून शास्त्री यांनी महत्वपूर्ण कामगिरी निभावली होती. शास्त्री यांच्या गुरु भक्तीबाबत सांगायचं म्हणजे सन १९२१ साली शास्त्रीजी शाळेत शिक्षण घेत असतांना त्यांनी महात्मा गांधी यांनी चालविलेल्या असहयोग आंदोलनांत त्यांनी आपले पूर्ण सहयोग दिला होता. त्यामुळे त्यावेळी त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. परंतु, वयाने लहान असल्या कारणामुळे त्यांना सोडून देण्यात आलं होत.
याचप्रमाणे, सन १९३० साली महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या “सविनय अवज्ञा आंदोलनात” सहभागी होवून त्यांनी सक्रीय भूमिका बजावली. महात्मा गांधी यांनी चालवलेल्या सविनय अवज्ञा आंदोलनाचा मूळ उद्देश हा देशांतील नागरिकांना इंग्रज सरकारला कर न देण्याबाबत जागृत करणे हा होता. त्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांनी या आंदोलनांच्या माध्यमातून आपले महत्वपूर्ण योगदान दर्शवित आपल्या भाषणाच्या माध्यमातून लोकांना कर न भरण्याचा सल्ला दिला.
यावेळी सुद्धा त्यांना सुमारे अडीच वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कॉंग्रेस पक्षाचे सदस्य भारताला स्वातंत्र्य घोषित करण्याच्या मुद्द्यावर अडून राहिले. त्यामुळे देशांत पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा मुद्दा पेटला. याकरिता कॉंग्रेसने जन आंदोलनाची स्थापना केली. या आंदोलना दरम्यान लाल बहादूर शास्त्री यांना ब्रिटीश सरकारने पकडून तुरुंगात कैद केले. सुमारे एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
अश्या प्रकारे लाल बहादूर शास्त्री गुरु महात्मा गांधी यांच्या सोबत कायम त्यांच्या सावली सारखे सोबत राहिले. सन १९४२ साली झाली महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध सुरु केलेल्या “भारत छोडो आंदोलनात” सहभागी होवून महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. अश्या प्रकारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईत त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. या आंदोलनानंतर त्यांना अकरा दिवस भूमिगत रहाव लागलं होत. परंतु, यानंतर सुद्धा त्यांना इंग्रज सरकारने पकडले होते. यानंतर सन १९४५ साली त्यांची सुटका करण्यात आली होती.
लाल बहादूर शास्त्री यांचे राजनीतिक कौशल्य –
सन १९४६ साली देशांत झालेल्या प्रांतीय निवडणुका दरम्यान लाल बहादूर शास्त्री यांची प्रशासकीय व संघटन क्षमता पाहून पंडित गोविंद वल्लभ पंत इतके प्रेरित झाले की, ज्या वेळी पंत उत्तरप्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना आपले संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले. शास्त्री यांनी आपल्याला मिळालेल्या संसदीय सचिव पदाची कामगिरी योग्यरित्या पाडली. त्यामुळेच त्यांना गोविंद पंत यांच्या मंत्रिमंडळामध्ये जागा मिळाली.
शिवाय, पोलीस आणि परिवहन मंत्री पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान शास्त्रींनी देशांतील महिलांची स्थिती सुधारणे व त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महिलांची वाहक पदी भरती करून, परिवहन विभागात महिलांकरिता आरक्षण लागू केले. आपल्या पदाचा योग्यरीत्या वापर करत त्यांनी पोलीस नियमात काही सुधारणा केल्या. जसे की, लोकांची गर्दी पांगवण्यासाठी पूर्वी काठीचा वापर केला जात असे. परंतु, लाल बहादूर शास्त्री यांनी हा नियम मोडीत काढत त्या ऐवजी पाण्याची फवारणी करण्याचा नियम लागू केला.
तसचं, देशांत संविधान लागू केल्यानंतर आणि देश धर्मनिरपेक्ष व प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यानंतर देशांत सर्वसाधारण निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री कॉंग्रेस पक्षाच्या महासचिवपदी विराजमान होवून आपल्या पक्षाची धुरा सांभाळत होते. कॉंग्रेस पक्षाची महत्वपूर्ण पद आपल्याकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी सांभाळत आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला.
त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाचा मोठ्या प्रमाणात विजय मिळाला.सन १९५२ साली देशांत झालेल्या प्राथमिक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय झाल्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांची देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसचं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतांना लाल बहादूर शास्त्री यांना रेल्वे आणि परिवहन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. आपल्या या पदाची जबाबदारी म्हणून त्यांनी रेल्वेतील प्रथम श्रेणी आणि तृतीय श्रेणी यांच्यात असणारे अंतर भरपूर प्रमाणात कमी केले.
सन १९५६ साली झालेल्या रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस सरकार पुन्हा सत्येवर आल्यानंतर त्यांना परिवहन आणि संचार मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, यानंतर त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा कारभार सांभाळला. सन १९६१ साली गृह मंत्री पदावर कार्यरत असतांना गोविंद वल्लभ पंत यांचे निधन झाले. परिणामी या पदाची धुरा लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे सोपवण्यात आली.
गृह मंत्री म्हणून त्यांनी देशाच्या सुरक्षे संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.सन १९६२ साली झालेल्या भारत चीन युद्धा दरम्यान त्यांनी देशांतर्गत सुरक्षा कायम राखण्यात महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान म्हणून – Lal Bahadur Shastri As Prime Minister
सन १९६४ साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अपघाती निधन झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा राजनीतिक इतिहास पाहता पंतप्रधान पदी त्यांची नियुक्ती केली. ज्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान पदी नियुक्ती केली गेली त्यावेळेस देश अनेक बिकट संकटाचा सामना करिता होता. सन १९६५ साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या वेळी त्यांनी आपल्या कुशल रणनीतीच्या बळावर देशांत शांतता कायम ठेवली.
लाल बहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान नारा – Jay Javan Jay Kisan Slogan
लाल बहादूर शास्त्री जेंव्हा देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झाले होते. तेंव्हा देशांत खूप बिकट परिस्थिती पसरली होती. त्यावेळेस देशांत खाण्या पिण्याच्या गोष्टी आयात केल्या जात. याकरिता आपला देश नॉर्थ अमेरिकेतून येणाऱ्या धान्यावर पूर्णतः अवलंबून होता. भारत पाक युद्धाच्या वेळी देशांत सर्वत्र कोरडा दुष्काळ पडला होता.
लोक अन्न पाण्यासाठी त्रासून गेले होते. देशांतील लोकांची परिस्थिती पाहता शास्त्री यांनी देशांतील लोकांना एका दिवसाचा उपवास पकडण्याची विनंती केली. तसचं, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘जय जवान जय किसान’ हा बहुमुल्यू नारा दिला. जो कालांतराने खूप प्रसिद्ध झाला.
लाल बहादूर शास्त्री यांचे निधन – Lal Bahadur Shastri Death
सन १९६६ साली भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शांततेचा करार हस्ताक्षरीत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान यांना रशियाची राजधानी ताश्कंद येथे भेटले. यावेळेस भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक मुख्य मुद्यांवर हस्ताक्षर करण्यात आले. शांततेचा करार हस्ताक्षरीत करण्यात आल्याच्या रात्री म्हणजे सन ११ जनवरी १९६६ साली लाल बहादूर शास्त्री यांचे रहस्यमय निधन झाले.
लाल बहादूर शास्त्री यांचे निधन रात्री झाल्याने लोकांनी त्यांच्या निधनाचे अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावले. काही लोकांच्या मते त्यांचा मृत्यू षड्यंत्र रचून त्यांचा खून करण्यात आला. तर, काहीच्या मते, त्यांना विष देण्यात आलं. तसचं, काही लोकांचे असे मत आहे की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला.
अश्या प्रकारचे नाना तऱ्हेचे अनेक विचार लोकांनी त्यांच्या मृत्युबद्द्ल केले आहेत. परंतु, आज पर्यंत त्यांच्या निधनाचे रहस्य कोणालाच उलघडले नाही. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्युबद्द्ल विशेष बाब म्हणजे त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले गेले नव्हते.
लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललिता यांनी आपले पुस्तक ‘ललिता के आंसू’ मध्ये शास्त्रींच्या निधनाची खूपच भावनात्मक व्याख्या केली आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या पतींना विष देऊन मारले असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याचबरोबर त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांच्या निधनाचे गूढ जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना यश आले नाही.
आज पर्यंत लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू एक गूढ रहस्य बनून आहे. लाल बहादूर शास्त्री हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांचा मृत्यू सातसमुद्रापार विदेशी भूमीवर झाला आहे. त्यांच्या आठवणीत दिल्ली येथे विजयघाटाची निर्मिती करण्यात आली आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांची नियुक्ती करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री एक निष्ठावंत, सत्यवादी, कार्यकर्ते होते. तसचं महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अहिंसेचे पुजारी होते. त्यांचे असे म्हणने होते की,
“हिंसा किंवा असत्याच्या मार्गाने खरी लोकशाही व स्वराज्य कधीच मिळवता येत नाही.”
याबाबत दाखला देतांना शास्त्री सांगतात की, जीवनांत कठीण परिस्थितीचा सामना करतांना अनेक लोक खोट बोलतात तसच, चुकीच्या मार्गाचा अवलंब करून त्यावर चालू लागतात. परिणामी, शेवटी त्यांना आपण केलेल्या कृतीचा पश्ताप होतो. यामुळे आपण जीवनांत कोणत्याही परिस्थितीचा सामना करीत असतांना नेहमी सत्याचे समर्थन केले पाहिजे.
लाल बहादूर यांच्या मते, सत्याचा मार्ग जरी, कठीण, आणि लांब असला. तरी तोच मार्ग आपल्या जीवनांत आनंद घेऊन येतो. साधेपणा, निःस्वार्थीपणा, सभ्यता, त्याग, औदार्य, दृढनिश्चय अश्या प्रकारचे आदर्शवादी गुण एकाच व्यक्तीच्या अंगी असणे हे व्यावहारिक जीवनाचे सर्वोतम उदाहरण आहे. जे केवळ लाल बहादूर शस्त्री यांच्यात दिसून येत होते.
लाल बहादूर शास्त्री यांना मिळालेले पुरस्कार – Lal Bahadur Shastri Award
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण कामगिरी पार पडून स्वत:ची विशेष ओळख निर्माण करणारे देशप्रेमी, व इमानदार राजनेता लाल बहादूर शास्त्री यांना सन १९६६ साली त्यांच्या मरणोपरांत भारतातील सर्वोच्च पुरस्कारा “भारत रत्न” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अश्या प्रकारे लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता अनेक आंदोलनांमध्ये सहभागी होवून इंग्रज सरकारला पछाडून टाकले होते. त्याकरिता त्यांना अनेकवेळा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता.
त्यांची स्वातंत्र्य लढ्यातील कारकीर्द थोर स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे होती. त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्री यांनी एक राजनेता म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमता आणि तर्कज्ञानाच्या बळावर संकटा प्रसंगी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन देशाचे संरक्षण केले. त्यांनी आपल्या राजनीतिक जीवनांत देशाला हरित क्रांती आणि औद्योगिकीकरणाच्या मार्गावर नेलं.
लाल बहादूर शास्त्री यांच्या सारख्या महान क्रांतीकार व कुशल राजनेत्याने आपल्या देशांत जन्म घेतला हे आपलं भाग्याचं समजाव लागेल. त्यांनी आपल्या देशाकरिता दिलेले बलिदान आपण भारतीय नागरिक कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळेच आज आपण देशांत मुक्त संचार करू शकतो. खरच, लाल बहादूर शास्त्री यांच्या सारखा राजनेता पुन्हा होणे नाही. त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितले होते की,
“देशाप्रती आमचा रस्ता सरळ आणि स्पष्ट आहे. आमच्या देशांतील प्रत्येक व्यक्तीना स्वातंत्र्य आणि समृद्धीसोबतच समाजवादी लोकतंत्राची स्थापना करणे आणि जगातील सर्व देशांसोबत विश्व शांती आणि मित्रतेचे संबंध राखणे.”
श्री लाल बहादूर शास्त्री यांच्याबाबत काही महत्वपूर्ण आणि रहस्यमय माहिती – Lal Bahadur Shastri Facts
- सन २ अक्टोबर १९०४ साली उत्तरप्रदेश राज्यातील मुगलसुराय या ठिकाणी जन्मणारे थोर क्रांतिकारक व राजनेता लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण खूपच संघर्षमय होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणामुळे शास्त्रीजी नदीच्या पाण्यात पोहून शाळेत जात असतं.
- लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या नावासमोर कधीच जातीसूचक आडनाव लावले नाही. त्याऐवजी त्यांनी कशी विद्यापिठातून मिळालेल्या शास्त्री उपाधीलाच आपले उपनाव बनवलं.
- लाल बहादूर शास्त्री महत्मा गांधी यांना आपले आदर्श मानत, त्यामुळे त्यांनी गांधीवादी विचारधारेचा अंगीकार करून एक सच्चा देशभक्त व एक निष्ठावंत, इमानदार राजनेता म्हणून देशाची सेवा केली.
- ब्रिटीशांच्या राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेश राज्याचे संसदीय सचिव म्हणून सेवा दिली.
- लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कारकिर्दीत रेल्वेतील प्रथम श्रेणी व तृतीय श्रेणी यातील अंतर मोठ्या प्रमाणात कमी केले. त्यामुळे रेल्वेतील तृतीय श्रेणी हे लाल बहादूर शास्त्री यांचीच देन मानली जाते.
- लाल बहादूर शास्त्री परिवहन मंत्री असतांना त्यांनी परिवहन विभागात महिलां करिता आरक्षित खुर्चीची सुरुवात केली.
- आपल्या राजनीतिक कार्यकाळात देशाची सेवा करतांना त्यांनी देशांत हरित क्रांती आणि दुग्ध क्रांती यासारख्या उद्योगाला चालना दिली.
- पोलीस विभागात लोकांची गर्दी पांगवण्यासाठी काठीच्या ऐवजी पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करण्यास विशेष प्राधान्य दिले.
- शांत स्वभाव व दृढ निश्चय स्वभावाचे असलेले शास्त्री यांनी जेंव्हा महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित निर्मित “शहीद” चित्रपट बघितल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते.
मित्रांनो, आपल्या भारत देशांत २ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती बरोबरच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती देखील साजरी केली जाते. यानिमित्ताने देशांतील नागरिकांतर्फे त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण केली जाते. तसचं, त्यांनी देशाकरिता दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले जाते.