Lakshmi Stotra
हिंदू धर्मांतील पवित्र प्राचीन वेद पुराण ग्रंथांमध्ये वर्णिल्याप्रमाणे ३३ करोड देवी देवता असून आपण नियमित त्यांची आराधना करीत असतो. या ३३ करोड देवी देवतांपैकी प्रत्येक देवतांचे महत्व हे वेग वेगळे आहे. त्यामुळे त्यांची आराधना देखील पुराणामध्ये नमूद करण्यात आलेल्या तिथीनुसार केली जाते.
आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्तीची अधिष्ठात्री असणाऱ्या देवी लक्ष्मी यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. तसचं, त्यांची आराधना करण्यासाठी येणाऱ्या पूजा विधी आणि स्तोत्र याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
लक्ष्मी स्तोत्र – Lakshmi Stotra
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।1।।
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।2।।
सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि।
सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।3।।
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।4।।
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।5।।
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।6।।
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।7।।
श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।8।।
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।9।।
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:।।10।।
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा।।11।।
देवी लक्ष्मी ही देवी पार्वती आणि देवी सरस्वती या त्रीदेवीपैकी एक असून तिला विष्णू पत्नी म्हणून संबोधलं जाते. हिंदू धर्मात तिला सौभाग्याची देवी मानलं जाते. सौभाग्याचं देन असलेली माता लक्ष्मी यांच्याबद्दल लिहावं तितक कमीच. देवी लक्ष्मी यांच्या जन्माबद्दल अनेक दंतकथा देखील प्रसिद्ध आहेत.
हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ विष्णू पुराण आणि भागवत पुराणात कथित करण्यात आल्या प्रमाणे अमृत प्राप्त करण्याच्या हेतूने राक्षस आणि देवतांनी जेंव्हा समुद्र मंथन केले होते तेंव्हा त्या मंथनातून अनेक रत्न बाहेर पडले होते. त्या रत्नांबरोबर सागरातून उत्प्पन्न झालेली देवी म्हणजे साक्षात लक्ष्मी होय.
माता लक्ष्मी यांच्या वडिलांचे नाव समुद्रदेव असून त्यांच्या आईचे नाव तिरंगिनी आहे. त्यांचा वास नेहमीच समुद्रात असल्याने भगवान विष्णू यांच्या बरोबर त्या समुद्रात विराजमान झाल्या आहेत. भगवान विष्णू यांच्या अनेक अवतारांचे वर्णन पोथी पुराणात करण्यात आलं आहे. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा भगवान विष्णू यांनी या भूलोकावर जन्म घेतला तेंव्हा तेंव्हा माता लक्ष्मी त्यांची सहचारिण म्हणून या भूलोकावर अवतरल्या आहेत.
त्रेता युगात जेंव्हा भगवान विष्णू यांनी राम अवतार घेऊन या भूलोकावर जन्म घेतला तेव्हा माता लक्ष्मी सीता रूपाने या धरतीवर प्रकट झाल्या. तर द्वापार युगात भगवान विष्णू यांच्या कृष्ण अवतारा सोबत त्यांनी रुक्मिणी अवतार धारण केला. या अवतारा प्रमाणे महालक्ष्मी मातेनी भगवान विष्णू यांच्या बरोबर अनेक रूप धारण केली होती. ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णू यांचा संबंध येतो त्याठिकाणी माता लक्ष्मी यांच्या नावाचे देखील उच्चारण केलं जाते.
महालक्ष्मी मातेच्या उत्पत्ती प्रमाणे त्यांचे मानवी जीवनांत देखील खूप महत्व आहे. वेद पुराणामध्ये वर्णिल्या प्रमाणे आपण त्यांची नित्य नियमाने पूजा अर्चना करत असतो. हिंदू धर्मीय बांधव दीपावली निमित्त माता लक्ष्मी यांची विशेष पूजा करीत असतात. तसचं, त्यांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी स्तोत्र तसचं, श्लोकांचे पठन करीत असतात.
आपल्या महाराष्ट्र राज्यात मार्गशीर्ष महिन्यानिमित्त दर गुरुवारी महिला व्रत करून माता लक्ष्मी यांची पूजा मांडून लक्ष्मी महात्म्य ग्रंथाचे पठन करतात. मित्रांनो, माता लक्ष्मी यांची महिमा फार थोर असून आपण नियमित त्यांची आराधना करायला पाहिजे. जेणेकरून, आपल्यावर त्यांची कृपादृष्टी कायम राहील. माता लक्ष्मी यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या या लेखातून आपणास माता लक्ष्मी यांची आराधना करण्याचे महत्व प्राप्त होईल.