मित्रहो आज आम्ही एका यशस्वी व्यावसायिकाच्या जीवन कथेवर प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या कथेस वाचुन तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरून जाईल. तूम्हीही यशाची शिखरे मिळवू शकता त्यासाठी चिकाटी व परिश्रमाची गरज आहे.
कुंवर सचदेव हे एक असेच व्यावसायिक आहेत ज्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करून उदयोग जगतात आपले एक विशेष स्थान बनविले आहे. कुवर सचदेव हे एक लिडींग पावर सोल्युशन कंपनी सू – काम ( su-kam ) sukam solar inverter कंपनीचे संस्थापक आहेत सोबतच ते एक महान शोधकर्ता मार्केटर प्रेरणादायक वक्ता आणि उदयोजक आहेत. सचदेव यांची कहाणी मेक इन इंडियाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.
सु-काम कंपनीचे फाउंडर “कुंवर सचदेव” यांच्या यशाची कहाणी – Kunwer Sachdev Sukam
कुंवर सचदेव यांचा जन्म एका मध्यमवर्गीय परिवारात झाला परंतू त्यांनी यास आपल्या संघर्षात येऊ दिले नाही. वयाच्या 15 व्या वर्षीच ते एक महान उदयोजक बनले होते. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरूवात सायकल वर पेन विकुन केली होती. पूढे त्यांनी एक यशस्वी केबल टिव्ही कम्युनिकेशन व्यवसायात यश मिळविले. एका संशोधकाच्या रूपाने भारतातील उर्जेच्या बचतीचे व उर्जा साठवण्याची गरज ओळखली होती.
1998 मध्ये त्यांनी Sukam पावर सिस्टम ची स्थापना करण्यासाठी केबल टिव्ही व्यवसायास बंद करण्याचे ठरविले. काही वर्षातच अथक परिश्रमाने त्यांनी Sukam पावर कंपनीला भारतातील मोठया कंपनीपैकी एक बनविले. आज सुकाम एक यशस्वी उर्जा संयंत्र बनविणारी कंपनी बनली आहे. आज सुकाम इंडियन मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असुन भारतातील सर्वात विकसीत आणि जलद गतीने वाढणारी कंपनी मानली जाते. सचदेवांनी जगात आशियाई व अफ्रिकी मिळुन एकुण 90 देशात आपला व्यवसाय वाढविला आहे.
दिल्ली युनिवर्सिटी मधून गणितीय सांख्यिकी आणि कायदयाची पदवी त्यांनी मिळविली आहे. त्यांच्या मागे कोणतेही टेक्नीकल सहयोग नसतांना त्यांनी पावर इलेक्ट्रॉनिक मध्ये आपला एक विशेष दर्जा मिळविला आहे. विविध व्यवसाय करतांना ते sukam चे आर आणि डी विभागाचे प्रमुख बनले. इंडियन पावर बॅकअप इंडस्ट्रीत तंत्रज्ञान आणि डिझाईन साठी त्यांनी पेटेंट ही करणारे पहिले भारतीय उदयोगपती आहेत.
जगात प्लास्टिक बॉडी इनव्हर्टर चा शोध सचदेव यांनीच लावला. इंडिया टूडे यांनी त्यांना इनोवेशन ऑफ़ द डिकेड या नावाने त्यांच्या आविष्कारास संबोधले आहे. कुंवर यांनी जागतिक स्तराचे तंत्रज्ञान जसे मोस्फोट, मायक्रो कंट्रोलर बेस्ड आणि Dsp साइन वेब चा आविष्कार करून उर्जा साठवण उदयोगात क्रांती आणली आहे. त्यांनी भारतास होम यू.पी.एस. पण दिले आहे. यामूळे यूपीएस आणि इन्वर्टर दोघांचे गुण आहेत. सुकाम कंपनीच्या आधी 100 पेक्षा जास्त कंपन्यांचा या उदयोगावर राज होता. परंतू कुंवर यांच्या आविष्काराने जगास आश्चर्यचकीत करून सोडले.
कुंवर आपल्या आविष्कारांनी कधीच संतृष्ट झाले नाहीत. त्याच्या डोक्यात नेहमीच देशाच्या व जगााच्या उपयोगाच्या गोष्टी निर्माण करण्याची एक भूक असते. आज त्याचे सर्वात आधूनिक यूपीएस टचस्क्रीन च्या माध्यमातून सूरू होते त्यात वाय फाय ची सूविधापण दिली आहे. पावर बॅकअप इंडस्ट्री च्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे यामूळेच त्यांना इनव्हर्टर मॅन ऑफ़ इंडिया च्या नावाने ही ओळखल्या जाते.
दी सोलर मॅन ऑफ़ इंडिया – Solar Man of India
टेक्नोवेशन त्या प्रति कुंवर यांचे प्रेम नेहमीच वाढले आहे. त्यांच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मध्ये ग्रीन एनर्जी वाढविणे सुध्दा समावेश आहे त्यांचे स्वप्न आहे की भारतात सर्वत्र ग्रीन उर्जा निर्माण केली जावी. सौर उर्जेचा वापर वाढविण्यावरही कुंवर यांनी जोर दिला आहे. त्यांनी ब्रेनी हे जगातील सर्वात पहिले हायब्रीड सोलर होम यूपीएस बनविले आहे.
त्यांनी अनेक प्रकारच्या सोलर यूनीटचे निर्माण घरांच्या सोईनुसार करण्यास केला आहे. त्यांनी अनेक सोलर उपकरणांची निर्मीतीही केली आहे. युनिक सोलर क्ब् सिस्टिम च्या निर्मितीसाठी त्याचे योगदान अमूल्य आहे. सध्यातरी सुकाम चे लक्ष्य भारताच्या प्रत्येक घरी सौर उर्जा स्त्रोतांना पुरवीणे आहे. त्यांचा एकच मंत्र आहे
“राष्ट्र माझ्यासाठी आणि मी राष्ट्रासाठी”
उत्तम विक्रेता
सुकाम ची स्थापना केल्यानंतर पहिल्याच वर्षी कुंवर यांनी मार्केटिंग आणि जाहिरातींचे महत्व जाणुन त्यांनी टिव्ही, वृत्तपत्र, रेडिओ, वर सुकाम च्या जाहिराती दिल्या. आपल्या वस्तु कशाप्रकारे विकल्या जाव्यात हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते. आजवर त्यांनी युरोप , अफ्रिका, आणि आशियाई 90 देशांमध्ये आपला व्यवसाय वाढविला आहे .
कुंवर एक महान उदयोजक आहेत त्यांचा उदयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या सोबत काम करणा.यांना ते आपल्या परिवाराचा एक भाग समजतात. अभिनेता रवि किशन यांच्या सोबत त्यांनी आपला पहिला रियालिटी शो ‘‘ इंडियाज् ग्रेटेस्ट सेल्समॅन – सेल का बाजीगर बनविला होता, यासारख्या शो चा या आधी कोणीच विचारही केला नव्हता.
सुकाम आज एक आंतरराष्ट्रीय दज्र्याचे ब्रांड बनले आहे. सुकामचे यश आपल्या देशासाठी फार अभिमानाची बाब मानली जाते. आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या यशाची ग्वाही देतात. अफ्रिका खंडात चिनी आणि अमेरिकी कंपन्यांच्या तूलनेत भारतीय सूकाॅम फार दर्जेदार व स्वस्त आहे.
पुरस्कारांचे नामांकन
उदयोगपती म्हणून एका विश्वस्त तंत्रज्ञानाच्या शोधासाठी त्यांना आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकार व्दारा ‘‘ भारत शिरोमणी ‘‘ आणि इन्सर्टड एंड यंग चा वार्षिक सर्वोत्कृष्ट उदयोगपतीचा पुरस्कारचा समावेश आहे. आज कुंवर सचदेव यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकल्यास त्यांच्यातील जिद्द आणि प्रयत्नांची चिकाटी दिसून येते.