Krishna Nadi chi Mahiti Marathi
कृष्णा नदीची माहिती – Krishna River Information in Marathi
नदीचे नाव | कृष्णा |
उगमस्थान | जोर, महाबळेश्वर, जि. सातारा (महाराष्ट्र). |
राज्यक्षेत्र | दूसरा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रप्रदेश. |
नदीच्या खोऱ्याचा आकार | 258,948 चौरस किलोमीटर. |
उपनद्या | वारणा, कोयना, पंचगंगा, भीमा या प्रमुख उपनद्या. |
कृष्णा नदीवरील प्रकल्प | धोम, ता. वाई, जि. सातारा (महाराष्ट्र), अलमट्टी (कर्नाटक), श्रीशैलम व नागार्जुन सागर (आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांच्या सीमेवर) |
लांबी | 1400 कि.मी. (महाराष्ट्रातील 282कि.मी.) |
कृष्णा ही महाराष्ट्रातील एक मोठी, महत्त्वाची आणि लोकांच्या आदरास पात्र असणारी लोकप्रिय नदी आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील निसर्गरम्य पर्वतराजीत कृष्णा नदी उगम पावली आहे.
कोयना, वारणा आणि पंचगंगा या मोठ्या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत.
महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतून वाहत नदीचा प्रदेश सुपीक आणि समृद्ध करीत कर्नाटक, आंध्र राज्यातून प्रवास करीत पूर्वेकडील बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
कृष्णा नदीचे उगमाजवळचे पात्र अरुंद आहे. पुढे तीर्थक्षेत्र वाईजवळून वाहताना तिचे पात्र रुंद झालेले दिसते. येथे कृष्णा संथ गतीने वाहते.
कोयना ही कृष्णेची उपनदी क-हाड शहराजवळ कृष्णेस मिळून त्यांचा ‘प्रीतिसंगम’ झाला आहे.
‘प्रीतीसंगम’ हे ठिकाण पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे.
पुढे कृष्णेचे पात्र रुंद होत सांगली शहराजवळून ती पुढे वाहते. पुढे तिला वारणा नदी येऊन मिळते.
दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूरजवळून वाहणारी पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कुरुंदवाडजवळ नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) येथे कृष्णेशी एकरूप होते.
वाई, कराड, सांगली ही कृष्णातीरावरची प्रसिद्ध अशी शहरे आहेत. कृष्णातीरावर अनेक गावांच्या ठिकाणी सुंदर घाट बांधलेले आहेत.
कराड, सांगली ही शिक्षण व व्यापार- क्षेत्रात प्रसिद्ध असलेली शहरे कृष्णाकाठीच वसली आहेत.
कृष्णा नदी विषयी वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Krishna River
उत्तर: महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळील डोंगररांगा, जि. सातारा.
उत्तर: ता. कऱ्हाड, जि. सातारा.
उत्तर: नृसिंहवाडी ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
उत्तर: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तीन राज्यातून.
उत्तर: नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.