Kohinoor Diamond
हि-याचे आकर्षण ब-याच लोकांना असते. मौल्यवान हिर बघणे, ते खरेदी करणे, त्यांच्याबद्दल माहिती मिळवणे हा खुप जणांचा छंद देखील असतो. असे हे डायमंड कोळश्याच्या खाणीत सापडतात. अनमोल असे हे हिरे आपल्यादेखील संग्रही असावेत असं कुणाला नाही वाटणार ? पण हा छंद सगळयांनाच परवडणारा नाही.
हि-याबद्दल बोलायचं झालं तर जगातील सगळयात प्राचीन आणि मौल्यवान अश्या कोहिनुर हि-याला विसरून कसं चालेल ? खरतर याला कोह-ए-नूर असं म्हणतात जो एक पार्शियन शब्द आहे, याचा अर्थ उजेडाचा पहाड असा होतो. जर आपण कोहिनुर हि-याबद्दल आणखीन माहिती घेण्यास ईच्छुक असाल तर तयार व्हा जाणुन घेण्याकरता.
सर्वात मौल्यवान कोहिनुर हिरा – Kohinoor Diamond History in Marathi
कोहिनुर एक विशाल आणि रंगांनी भरलेला हिरा आहे जो 13 व्या शतकात भारतातील आंध्रप्रदेशात गुंटुर जवळ सापडला. याचे वजन 793 कॅरेट ( 158.6 ग्रॅम ) आहे, सगळयात आधी हा ककटिया साम्राज्याची ठेव होता गेल्या 100 वर्षात हा हिरा कित्येक लोकांजवळ गेला आणि शेवटी 1849 मध्ये ब्रिटिशांनी पंजाब अधिग्रहणानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरिया जवळ चालला गेला.
1852 साली राणी व्हिक्टोरिया यांचे पती प्रिंस अल्बर्ट यांनी कोहिनुर ला कापुन 186 ग्रॅम चे बनवले, आज हा तुकडा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुगुटाची शोभा वाढवतो. या हि-याला मिळवण्याकरता देखील इतिहासात अनेक युध्द झाले आहेत.
आज हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुगुटात लागलेला आहे. दरवर्षी टाॅवर आॅफ लंडन इथं बरेच लोक या हि-याला बघतात. भारत, पाकिस्तान, ईराण, आणि अफगाणिस्तान सरकार ने कित्येक वेळा या हि-यावर आपापला हक्क सांगितला आहे आणि परतदेखील मागीतला आहे, परंतु या हि-याच्या अनेक कथा इतिहासात प्रचलित आहेत पण ब्रिटीश सरकार म्हणतं की त्यांनी या हि-याला कायदेशीर हस्तगत केलय.
कोहिनुर हि-याचा इतिहास – Kohinoor Diamond History
कोहिनुर हि-याच्या उत्पत्ती शी संबधीत निश्चित रूपानं कुठलही शोधपत्र अस्तित्वात नाही काही इतिहास संशोधकांच्या नुसार 3000 ठब् चा एक शाही खजाना होता याला 13 व्या शतकात हिंदु ककटिया साम्राज्यात भारतातील आंध्रप्रदेशामध्ये गुंटुर जिल्हयातील कोल्लुर खाणीतुन काढण्यात आले. 14 व्या शतकाच्या सुरूवातीला दिल्लीतल्या तुर्की खिलजी साम्राज्यातील दुसरे शासक अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यांच्या सेनेने दक्षिण भारताला लुटण्यास सुरूवात केली.
1310 मधे खिलजी चे जनरल मालिक काफूर ने वारंगल वर विजय मिळवला आणि यशस्वीरित्या हि-याला प्राप्त केलं. तेव्हा कोहिनुर हिरा खिलजी साम्राज्यात आला मात्र नंतर तुर्की मुगल शासक बाबर ने याला हस्तगत केले त्याने भारतावर 1526 मध्ये आक्रमण करून मुगल साम्राज्याची स्थापना केली होती त्यावेळी कोहिनुर हि-याला बाबर चा हिरा असे नावही देण्यात आले होते.
आणि जेव्हा जेव्हा कोहिनुर हिरा वेगवेगळया शासनकत्र्याजवळ जाता राहिला तसे तसे त्याचे नावही बदलत गेले. इतिहासात बाबर, त्याचा मुलगा आणि हुमायू तीघांचाही त्यांच्या शासनकाळात कोहिनुर वर अधिकार होता.
संपुर्ण जगात कोहिनुर हिरा सर्वात मौल्यवान आणि प्रसिध्द मानल्या जातो ज्याच्या किमतीचा अजुनही अंदाज लावता आलेला नाही पण या हिरा शापीत असल्याचे देखील मानल्या जाते. या शापापासुन आजपर्यंत कोणीही सुटला नाही. असं म्हणतात की हा हिरा शापीत आहे यामुळे हा ज्याच्याजवळ असतो त्याला तो संपुर्ण बरबाद करून सोडतो. अनेकांनी याला मिळवण्याचा प्रयत्न केला कित्येक राजघराण्यांनी याला प्राप्त करण्याकरता प्रयत्न केले परंतु हा ज्याच्याजवळही गेला तो पुर्णपणे नेस्तनाबुत झाला कित्येक ऐतिहासीक घराण्यांच्या पतनाला हा हिरा कारणीभूत असल्याचे मानले जाते.
बरेच लोक या हि-याला सम्यन्तक मणी देखील म्हणतात याबाबतीत असं बोलल्या जात की सुर्यदेवानं आपल्या निस्सीम भक्त सत्राजिताच्या तपस्येवर प्रसन्न होउन त्याला वरदाना स्वरूपात हा हिरा दिला होता आणि हीच याच्या उत्पत्तीची कहाणी आहे आणि इथुनच याच्या अभिशापाची देखील कहाणी सुरू होते.
पुराणकथेनुसार हा हिरा एकदिवस सत्राजिताकडुन हरवला आणि खोटा आळ भगवान श्रीकृष्णावर आला मात्र श्रीकृष्णानं हा हिरा शोधुन परत सत्राजिताला दिला. सत्राजीतानं श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित होउन हा त्यांना हिरा त्यांना भेट दिला म्हणुन म्हंटल्या जातं की श्रीकृष्णावर लागलेल्या खोटया आरोपापासुन या हि-याची अभिशापाची कहाणी सुरू झाली आणि या हि-यामुळेच यदुवंशाचा विनाशही झाला.
यदुवंशाच्या विनाशानंतर हा हिरा इतिहासात कुठेतरी गडप झाला मध्ययुगीन काळापर्यंत याचा कुठेही नामोल्लेख सापडत नाही पण 1306 मध्ये एक लेख लिहीला गेला ज्यात पहिल्यांदा या हि-याचा उल्लेख केला गेला. या लेखाच्या म्हणण्यानुसार जो ही या हि-याला स्वतःजवळ ठेवेल त्याला त्याच्या पतनाला सामोरे जावे लागेल पण तेव्हांच्या शासनकत्र्यांनी या गोष्टीला हसण्यावारी नेलं पण कोहिनुर हिरा आपला असर दाखवतच राहीला.
कोहिनुर हि-याबाबतीत काही विशेष गोष्टी – Interesting Facts About Kohinoor Diamond
- सध्या कोहिनुर हिरा युनायटेड किंगडम च्या ताब्यात आहे
हो हे सत्य आहे आणि भारतात आणण्याकरता काहीच करू शकत नाही तुम्ही माना अगर न माना तुम्ही हे सत्य नाकारू शकत नाही की सध्या हिरा युनायटेड किंगडम च्या ताब्यात आहे.
- या हि-याला एक शाप आहे
1306 मध्ये लिहीलेल्या हिंदु इतिहासानुसार त्यावेळेसच कोहिनुर हि-याचा शोध घेतला गेला. हिंदु दस्तऐवजानुसार या हि-याला केवळ महिलाच धारण करू शकतात आणि याला पुरूषांनी धारण करण्याची परवानगी नाही. या हि-याला शाप असा होता की जर कुणी पुरूषाने याला धारण केले तर त्याचे राज्य नेस्तनाबुत हाईल, इतिहासाला पाहता यावर विश्वास बसतो.
- युनायटेड किंगडम मधले शाही परिवार याचा उपयोग करतात
पहिल्यांदा राणी व्हिक्टोरियांनी याचा उपयोग केला त्यांच्या मृत्युनंतर राणी एलेग्जेंड्रा यांच्या मुगुटावर या हि-याला स्थापीत करण्यात आले. राणी एलेग्जेंड्रा महान राजा एडवर्ड अपप च्या पत्नी होत्या. 1902 मध्ये हा हीरा त्यांच्या मुगुटात लावण्यात आला. 1911 मध्ये हा हिरा राणी मैरी यांच्याजवळ गेला.
- वास्तवात कोहिनुर हिरा जवळपास 800 कॅरेट चा होता
कोहिनुर हि-याचे वजन बदलत्या काळानुसार कमी होत गेले खरतर या हि-याचे खुप तुकडे केले गेले राष्ट्रीय संपत्तीत जाण्यापुर्वी इतिहासात याला बरेचदा कापण्यात आले. प्राचीन काळी या हि-याला विश्वातील सगळयात विशाल हिरा म्हणुन ओळख होती.
- काही काळानंतर मोगलांनी ग्वालियर चे राजा विक्रमजीत यांच्याकडुन त्याला लुटले होते.
जोवर बाबर ने या हि-यावर आपला अधिकार मिळवला नव्हता तोपर्यंत भारतात या हि-याला मिळवण्याकरता बरीच युध्दं झालीत 1526 मध्ये बाबर ने पानीपत चे युध्द जिंकले होते आणि कोहिनुर हि-यावरही विजय मिळवला होता 200 वर्षांपर्यंत कोहिनुर हिरा बाबर च्या साम्राज्यात राहिला.
- कोहिनुर हिरा सर्वप्रथम भारताच्या जमीनीवरच आढळुन आला
भारतातील दक्षिणेकडील काही लोकांच्या समुहाने या हि-याचा शोध लावला हे क्षेत्र भारतातील आंध्रप्रदेशराज्यात गोलकोंडा भागात येतं . त्यावेळी तिथे ककटिया साम्राज्याचा शासनकाळ होता.
- कोहिनुर हि-याला बाबर चा हिरा म्हंटले जाऊ लागले.
बाबर च्या नंतर हा हिरा साम्राज्यातील उत्तराधिका-यांकडे आला पण त्यानंतर पर्शियन जनरल नादिरशहा ने औरंगजेबाला पराभुत करून हि-याला हस्तगत केले ते कोहिनुर ला कोह-ए-नूर म्हणत.
- 14 व्या शतकात हि-याचा मालकी हक्क मलिक काफूर खिलजीला मिळाला
हो असे झाले होते. खिलजी साम्राज्याचे गवर्नर जनरल यांनी भारतातील दक्षिण क्षेत्रावर आक्रमण केले आणि यशस्वीपणे काकटिया साम्राज्यातुन कोहिनुर हिरा लुटला.
दलिप सिंहांनी स्वतः कोहिनुर हिरा ब्रिटीश साम्राज्याच्या राणीकडे सोपवला होता. असे म्हंटल्या जाते की त्या काळाचे भारतीय गवर्नर जनरल डलहौजी यांच्या विनंतीला मान देत त्यांनी असे केले होते.
असा हा कोहिनुर हिरा आणि अशी त्याची कहाणी, कथा, रहस्य, दंतकथा, शाप अभिशाप याने भरलेली आहे. अनमोल आणि मौल्यवान असा हा हिरा भारतात सापडुनही आज भारताजवळ नाही हे दुदैवच म्हणावं लागेल.
नक्की वाचा:
लक्ष्य दया : तुमच्या जवळ कोहिनुर हिरा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा कोहिनुर हिरा चा इतिहास – Kohinoor Diamond Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.
नोट: Kohinoor Diamond History – कोहिनुर हिरा या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.