Kiran Bedi chi Mahiti
किरण बेदी असं म्हणतात,
”असंभव असे काहीही नाही, सगळं शक्य आहे, कुठलही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी केवळ प्रयत्नांची आवश्यकता आहे”
कदाचित त्यांच्या या श्रेष्ठ विचारांनी आणि निर्भीड स्वभावाने त्यांना आपल्या देशाची पहिली महिला आयपीएस होण्याचा गौरव प्राप्त करून दिला. पोलीस विभागात ज्या सुमारास पुरुषांचे वर्चस्व होते त्या दरम्यान किरण बेदींनी आयपीएस होऊन समाजात होत असलेल्या बदलाची सगळ्यांना जाणीव करून दिली.
किरण बेदींनी पोलिस अधिकारी म्हणून केवळ कैद्यांची परिस्थिती बदलण्याचा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा मुद्दा उचलला असे नाही तर स्वतःला एक सशक्त राजकारणी आणि उत्तम सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजासमोर ठेवलं.आपल्या निडर आणि निर्भय कार्यामुळे ओळख मिळविलेल्या देशाच्या प्रथम महिला आईपीएस किरण बेदी यांच्याविषयी या लेखातून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
पहिल्या महिला IPS ऑफीसर किरण बेदींचा जीवन परिचय -Kiran Bedi Information in Marathi
एक दृष्टीक्षेप किरण बेदी यांच्या जीवनावर – Kiran Bedi Biography in Marathi
मूळ नाव (Real Name) | किरण पेशावरिया |
जन्म (Birthday) | 9 जून 1949, अमृतसर, पंजाब |
वडील (Father Name) | प्रकाश लाल पेशावरिया (कापड व्यावसायिक) |
आई (Mother name) | प्रेमलता |
पती (Husband) | बृज बेदी (टेनिस खेळाडू) |
शैक्षणिक योग्यता (Education) | इंग्लिश ऑनर्स म्हणून पदवी, राज्यशास्त्रातून एम.ए, दिल्ली विश्वविद्यालातून लॉ, समाजशास्त्रात पीएचडी |
किरण बेदींचा जन्म, कुटुंब आणि प्रारंभिक जीवन – IPS Kiran Bedi History
देशाची प्रथम महिला IPS हा किताब हा गौरव प्राप्त करणाऱ्या किरण बेदींचा जन्म अमृतसर येथे 9 जून 1949 रोजी झाला. प्रकाश लाल पेशावरीया हे त्यांचे वडील कापड व्यावसायिक तर होतेच शिवाय त्या सोबतच टेनिस खेळाडू देखील होते.
आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत किरण यांनी बालपणापासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्यांची आई प्रेमलता या गृहिणी होत्या. किरण यांना तीन बहिणी देखील होत्या. त्यातील रिता आणि अनु या टेनिस खेळाडू आहेत. किरण बेदींच्या आई-वडिलांनी पुरुष प्रधान संस्कृतीत आपल्या मुलींना शिक्षित करतांना अनेक संघर्षांचा सामना केला.
किरण बेदी आपल्या आई वडिलांच्या अपेक्षांवर खरी उतरली, केवळ शिक्षणच नव्हे तर खेळात देखील तिने आपली प्रतिभा सिद्ध केली.
किरण बेदींचे शिक्षण – Kiran Bedi Education
आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी अमृतसर येथील सेक्रेड हार्ट कॉन्वेंट येथून पूर्ण केले. शालेय जीवनात असतांनाच किरण बेदींनी नेशनल कैडेट कॉप्स (NCC) मध्ये प्रवेश घेतला .
1968 साली त्यांनी अमृतसर येथील महिला महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवी मिळवली. पुढे 1970 ला पंजाब विद्यापीठातून राज्यशास्त्रात त्या एम.ए झाल्या. या दरम्यान त्या सगळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरल्या.
1988 साली दिल्ली विश्वविद्यालयातून लॉ ची पदवी प्राप्त केली. 1993 मध्ये IIT दिल्ली येथून समाजशास्त्रात PHD करून ड्रग, शोषण आणि डोमेस्टीक व्हायलेंस विषयावर शोधनिबंध लिहिला.
किरण बेदींचा विवाह आणि अपत्य – Kiran Bedi Marriage, Childrens, And Life Story
9 मार्च 1972 रोजी किरण बेदींनी टेनिस प्लेयर बृज बेदींशी विवाह केला. त्यांची प्रथम भेट ही टेनिस कोर्ट वरच झाली होती.
टेनिस सरावा दरम्यान दोघांची भेट झाली त्यानंतर मैत्री आणि म दोघे विवाहबंधनात अडकले. 1975 साली त्यांना सायना हि कन्या झाली. पुढे 2016 ला कर्करोगाने त्यांच्या पतीचे निधन झाले.
टेनिस प्लेयर किरण बेदी – Kiran Bedi as Tennis Player
आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेवत वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षापासून किरण यांनी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. 1964 सालापासून टेनिस प्लेयर म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली.
1966 मध्ये त्यांनी ज्युनियर लॉन टेनिस चैम्पियनशिप जिंकली. 1968 साली ऑल इंडिया इंटरवेर्सिटी टेनिस टायटल किताब पटकावला.
विजयाची मालिका पुढे देखील सुरूच राहीली 1975 ला तिने अखिल भारतीय अंतरराष्ट्रीय महिला लॉन टेनिस चैम्पियनशिप मधे विजय प्राप्त केला. 1976 साली राष्ट्रीय महिला लॉन टेनिस चैम्पियनशिप मध्ये जोरदार यश संपादन केले.
या व्यतिरिक्त किरण बेदींनी 1973 मध्ये श्रीलंके विरुद्ध भारताचे प्रतिनिधित्व करीत लीयोनेल फोंसेका मेमोरियल ट्रॉफी भारताला मिळवून दिली.
सिव्हील सर्व्हिसेस मधील किरण बेदींची कारकीर्द – Kiran Bedi’s Career in Civil Services
- प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या किरण बेदींनी 1972 साली इंडियन पोलीस सर्व्हिसेस (IPS) मध्ये पहिली महिला आईपीएस होऊन इतिहास रचला.
- IPS मध्ये निवड झाल्यानंतर किरण बेदींनी अनेक महिन्यांपर्यंत राजस्थान येथील माउंट आबू येथे प्रशिक्षण घेतले.
- अरुणाचल प्रदेश-गोवा-मिजोरम- संघ शासित प्रदेश (एजीएमयुटी) कैडर मध्ये 80 पुरुषांमध्ये त्या एकमेव महिला होत्या आणि हे क्षण अत्यंत गौरवास्पद होते.
- पुढे 1975 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग नवी दिल्ली येथील चाणक्यपुरी पोलीस स्टेशन ला उप-मंडळ अधिकारी पदावर झाली व त्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या परेड ला त्यांनी पुरुषांचे प्रतिनिधित्व केले.
- पुढे 1979 ला पश्चिम दिल्लीत डीसीपी म्हणून त्यांना पोस्टिंग मिळाली.
- येथे क्राइम कंट्रोलिंग करीता पुरेसे ऑफिसर नसल्याने किरण बेदींनी त्या भागातील व्यक्तींना स्वयंसेवक बनविले आणि पोलीस पेट्रोलिंग करीत स्वयंसेवकांच्या मदतीला मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात केली.
- 1981 साली किरण बेदींनी दिल्लीत ट्राफिक डीसीपी पद सांभाळले.
- या दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनेक उपाय केलेत, अवैध पार्किंग विरुद्ध कायदे केलेत, क्रेन ची सुरुवात करण्याचे श्रेय देखील किरण बेदींनाच जाते.
- यामुळे त्यादरम्यान लोक त्यांना “क्रेन बेदी” देखील म्हणत असत.
Kiran Bedi Story
- 1983 साली किरण बेदींची बदली गोवा येथे ट्राफिक एसपी म्हणून करण्यात आली.
- आपल्या या बदली मागे देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, आर.के. धवन सह काही उच्च अधिकाऱ्यांचा हात असल्याचे म्हंटले होते.
- 1984 ला नवी दिल्लीतील रेल्वे सुरक्षा बल येथे उप-कमांडट म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच वर्षी औद्योगिक विकास विभागात उप-निदेशक पदावर देखील त्यांनी काम पाहिलं.
- 1985 साली किरण बेदींनी नवी दिल्लीतील पोलीस मुख्यालयाचा कार्यभार सुद्धा उत्तम रीतीनं सांभाळला.
- त्यानंतर 1986 साली किरण बेदींनी उत्तरी दिल्लीत डीसीपी म्हणून कार्यभार हाताळला.
- 1988 मध्ये त्यांनी दिल्लीत उप-निदेशक आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) म्हणून पदभार सांभाळला.
- 1990 साली त्या मिजोरम येथे डीप्टी इंस्पेक्टर जनरल (रेंज) पदावर रुजू झाल्या.
- 1993 साली त्या दिल्लीच्या आईजी झाल्या.
- त्यानंतर लागोपाठ त्या अनेक पदांवर कार्यरत होत्या. त्यांची अखेरची पोस्टिंग 2005 साली डायरेक्टर जनरल ऑफ इंडिया ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च एंड डेव्हलपमेंट मध्ये झाली.
- 2007 मध्ये किरण बेदींनी वैय्यक्तिक समस्यांचा हवाला देत पोलीस सेवेचा राजीनामा दिला.
किरण बेदींची राजकारणातील कारकीर्द – Kiran Bedi Political Career
किरण बेदी या एक पोलीस अधिकारी…समाजसेवी तद्वतच एक सशक्त आणि निर्भय राजकारणी देखील आहेत.
2015 मध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री पदाकरिता निवडणूक लढविली होती.
परंतु या निवडणुकीत त्यांना कृष्णा नगर क्षेत्रातून आप पक्षाचे उमेदवार एस.के. बग्गा यांनी 2 हजार 277 मतांनी हरविले.
त्यानंतर २२ मे 2016 ला किरण बेदींची पोन्डिचेरी या केंद्र शासित प्रदेशात लेफ्टनंट गवर्नर (उप-राज्यपाल) पदावर नियुक्ती झाली, याठिकाणी त्या आजही कार्यरत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी – Kiran Bedi as a Social Worker
केवळ एक पोलीस ऑफिसर म्हणून नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील किरण बेदीचं कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांनी सहभाग नोंदविलेले काही सामाजिक कार्य असे आहेत…
अण्णा हजारेंच्या नेतृत्वात 2001 साली झालेल्या “इंडिया अगेंस्ट करप्शन” या आंदोलनात किरण बेदींचा सहभाग होता.
किरण बेदींनी महिला सशक्तीकरण, असाक्षरता सारख्या मुद्यां समवेत व्यसनमुक्ती सारख्या उद्देशा साठी नवज्योती इंडिया फाउंडेशन (NIF) नावाने एक NGO सुरु केली.
1994 साली कैद्यांच्या स्थितीत सुधारणा, पोलिसांची स्थितीत सुधार, कारागृह सुधार, ग्रामीण आणि सामुदायिक विकास कार्या सहीत महिला सशक्तीकरण समवेत इंडिया विजन फाउंडेशन ची स्थापना केली होती.
कुटुंबातील वाद सोडवण्याच्या उद्देशाने किरण बेदी ‘आप की कचहरी’ नावाच्या टीव्ही वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असत.
किरण बेदींशी संबंधित हे विवाद कायम चर्चेत राहिले – Kiran Bedi Controversy
1982 साली किरण बेदी वेगळ्याच विवादात घेरल्या गेल्या, दिल्ली ट्राफिक पोलीस सेवेत कर्तव्यावर असतांना आपल्या अवैध पार्किंग अभियाना दरम्यान त्यांनी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधीच्या गाडीला दंड ठोठावला व पुढे चौकशी समितीने आदेश बजावल्या नंतर देखील सब इंस्पेक्टर ची बदली करण्यास नकार दिला होता.
1983 मध्ये त्या पुन्हा विवादात अडकल्या…यावेळी त्यांनी गोवा येथील जनतेकरता अनौपचारिक रीतीने “जोरी ब्रिज” चे उद्घाटन केले होते.
आणखीन एका घटनेने त्या विवादात सापडल्या, आपल्या मुलीचा सांभाळ करण्याकरता त्यांनी सुट्टीचा अर्ज दिला आणि आईजीपीं कडून मंजूर देखील करून घेतला परंतु गोवा सरकार ने अधिकृतरित्या त्यांची सुट्टी मंजूर केली नव्हती व गोव्याचे मुख्यमंत्री प्रताप सिंह राणेंनी किरण बेदी या सुट्टी मंजूर नसतांना सुट्टीवर असल्याची घोषणा केली होती.
दिल्लीतील लाल किल्ला येथे भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज चा आदेश दिल्यानंतर देखील किरण बेदींन बरीच टिकाटिप्पणी आणि जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.
किरण बेदींना वकिलांच्या रोषाचा सामना त्यावेळी करावा लागला ज्या सुमारास त्यांनी तीस हजारी न्यायालयात वकीली करणाऱ्या राजेश अग्निहोत्री या वकीलास बेड्या ठोकून न्यायालयात हजर केलं.
1992 साली किरण बेदी पुन्हा चर्चेत आल्या ते आपल्या कन्येमुळे. सुकृती या त्यांच्या मुलीने लेडी हर्डिंग मेडिकल कॉलेज (दिल्ली) येथे प्रवेश मिळवण्यासाठी मिजोरम कोट्यातून अर्ज भरला होता.
त्यामुळे मिजोरम येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले होते व ती मिजोरम रहिवासी नसल्याचा दावा केला होता.
पुढे किरण बेदींना मिजोरम सोडावे लागले.
ज्या सुमारास त्या तिहार कारागृहाच्या आईजी म्हणून तैनात होत्या त्या वेळी कैद्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले
About Kiran Bedi
1993 साली सुप्रीम कोर्टाने अंडर ट्रायल कैद्याच्या वैद्यकीय तपासणीकडे दुर्लक्ष केल्यावरून किरण बेदींना अल्टीमेटम दिला होता.
त्या सुमारास देखील त्यांना लोकांच्या तिखट प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले.
1994 साली त्या पुन्हा विवादात अडकल्या ज्या वेळी त्यांनी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लेटर पब्लिश करून दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले होते.
वास्तविक किरण बेदींना अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी नेशनल प्रेयर ब्रेकफास्ट करीता दोन वेळेला आमंत्रित केले होते परंतु दोन्ही वेळेला दिल्ली सरकारने या आमंत्रणाचा अस्वीकार केला होता.
आपल्या उग्र स्वभावाने ओळखल्या जाणाऱ्या किरण बेदींना त्या वेळी भरपूर आरोपांचा सामना करावा लागला ज्यावेळी त्यांनी कारागृहाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत तिहार कारागृहातील भयंकर आरोपी चार्ल्स शोभराजला टाईपराइटर उपलब्ध करवून दिला.
26 नोव्हेंबर 2011 ला किरण बेदी पुन्हा एकदा विवादात अडकल्या जेंव्हा त्यांच्यावर NGO फंड चा गैरवापर करण्याचा आरोप ठेवण्यात आला आणि दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच ला तक्रार दाखल करण्यात आली.
ही तक्रार दिल्ली येथील वकील देविंदर सिंह चौहान नी केली होती.
किरण बेदींना मिळालेला सन्मान आणि पुरस्कार – Kiran Bedi Awards
- 1968 ला किरण बेदींना एनसीसी कैडेट अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले.
- 1972 साली त्यांना देशाची पहिली महिला IPS ऑफिसर होण्याचा गौरव प्राप्त झाला.
- 1976 ला नेशनल वूमन लॉन टेनिस चैम्पियनशिप जिंकली.
- 1979 मध्ये अकाली-निरंकारी संघर्षा दरम्यान हिंसा रोखण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने किरण बेदींना राष्ट्रपती वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1980 साली वूमन ऑफ द ईयर पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या.
- 1992 ला किरण बेदींना आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार बहाल करण्यात आला.
- 1994 साली त्यांना उत्कृष्ट सरकारी सेवा दिल्याबद्दल रोमन मैगसेसे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
- 1995 ला किरण बेदींना समाज सेवे साठी लॉयंस क्लब द्वारे लॉयंस ऑफ द ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले.
- 2004 मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी युनायटेड नेशन मेडल ने सन्मानित करण्यात आले.
- 2005 ला किरण बेदींना कारागृहातील दंड प्रणालीत सुधारणा यासाठी अखिल भारतीय ईसाई परिषदे तर्फे “मदर टेरेसा मेमोरियल राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.
- 2006 साली त्यांना ‘द वीक’ तर्फे देशातील सर्वाधिक प्रशंसनीय महिला म्हणून सन्मान करण्यात आला.
- 2009 या वर्षी आज तक टीव्ही चैनल द्वारे महिला उत्कृष्टता पुरस्कार बहाल करण्यात आला.
- 2013 साली राय युनिव्हर्सिटी तर्फे ऑनरी डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ पब्लिक सर्व्हिस पुरस्काराने गौरविण्यात आले.
- 2014 या वर्षी त्यांच्या समाजावर पडलेल्या प्रभावाकरता “लो ओरियल पेरिस फेमिना महिला पुरस्कार” देण्यात आला.
किरण बेदींनी लिहिलेली पुस्तकं – Kiran Bedi Books
एक आईपीएस…राजकारणी…समाजसेवक…यांसारख्या स्तरावर किरण बेदींनी स्वतःला सिद्ध केलंच शिवाय याव्यतिरिक्त त्यांच्यात एक लेखक देखील दडलेला आहे.
त्यांनी आय डेयर ( I Dare ), क्रीएटिंग लीडरशिप, इट्स ऑलवेज पॉसिबल, सारखी अनेक पुस्तकं लिहिलीत.
या शिवाय त्या मलेशिया येथे लीडरशिप ट्रेनिंग इन्स्टीटयुट आईक्लिफ (Iclif) मध्ये विजीटर लेक्चरर देखील आहेत.
किरण बेदींवर आधारित बायोपिक – Kiran Bedi Movie
देशाच्या पहिल्या महिला पोलीस ऑफिसर किरण बेदींच्या प्रभावशाली आणि प्रेरणात्मक जीवनाने प्रभावित होऊन एका ऑस्ट्रेलियन फिल्म मेकर ने त्यांच्या जीवनावर आधारित ‘यस मैडम सर‘ नावाची बायोपिक बनविली आहे.
हा चित्रपट जगातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविण्यात आला आहे. त्यांच्या एकंदरीत आयुष्याकडे पाहता त्यांचा एक विचार आपल्याकरता प्रेरणात्मक ठरतो…
“जो लोग समय रहते अपने जीवन का चार्ज नही ले लेते, वे बाद में समय द्वारा लाठी चार्ज किये जाते है.”
नंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ असतानाच आपल्या आयुष्याची जवाबदारी स्वीकारत आवश्यक कार्य पूर्ण करावीत आणि वेळेचे मूल्य ओळखावे.