King of Swaziland
आपण बरेचदा ऐकलेलं किंवा पाहिलेलं असेल की एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त वेळा लग्न केले. पण अनुभव खूप कमी लोकांना असेल, गंमत बर का!
जुन्या काळात राजे महाराजे एकापेक्षा जास्त राण्यांशी लग्न करायचे. बरेचदा तर असे व्हायचे की एखादे युध्द जिंकल्या नंतर तेथील राजाला हरवून आणि मारून टाकल्यानंतर त्या राज्यातील राण्यांशी लग्न करून घेऊन यायचे. पण युध्द न करता अनेक महिलांशी लग्न करणारे राजे महाराजे खूप कमी असतात. आजच्या लेखात आपण अश्याच एका राजाविषयी पाहणार आहोत, ज्याने एकापेक्षा जास्त लग्न केले आहेत. आणि तो एका संपूर्ण देशाचा राजा आहे. तर चला पाहूया त्या राजाविषयी थोडक्यात माहिती.
१५ वेळा लग्न केले या देशाच्या राजा – The Kingdom of Eswatini (Swaziland) King Mswati III
आफ्रिका खंडातील एक देश आहे ज्या देशाचे नाव आहे स्वाजिलँड. या देशात राजेशाही सत्ता आहे. म्हणजेच संपूर्ण देश हा एका व्यक्तीच्या आदेशावर चालतो. पण २०१८ ला या देशाला स्वतंत्र प्राप्त होऊन ५० वर्ष पूर्ण झाल्याने या देशाचे नाव “द किंगडम ऑफ इस्वातिनी“ ठेवल्या गेलं.
या देशाच्या तृतीय राजाचे नाव मस्वाती आहे, मस्वाती जगातील श्रीमंत राजांपैकी एक राजा आहे. या राजाला जगातील श्रीमंत राजांच्या यादीत नोंदल्या जात. सोबतच या राजाची संपत्ती पहिल्यापेक्षा वेगाने वाढताना दिसते. या राजाची एकूण संपत्ती पाहिली असता ती जवळ जवळ १५ अब्ज रुपये आहे. सोबतच महाराजांच्या थाटा माटात राहणारा हा राजा याच्याकडे स्वतःच्या वेगवेगळ्या लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. मग ती बीएमडब्ल्यू असोत की रोल्स रॉयल. या गाड्यांची संख्या सुध्दा या राजाकडे खूप जास्त आहे.
या राजाने १९८६ मध्ये स्वाजिलँड चा तृतीय राजा म्हणून वयाच्या १८ व्या वर्षीच कारभार सांभाळला होता. त्यावेळचा हा सर्वात कमी वयाचा पहिला राजा होता. आताच्या परिस्थिती मध्ये या राजाचे आतापर्यंत १५ लग्न झालेले आहेत, आणि या वेगवेगळ्या पत्नींपासून त्याला २३ मुलं झालेले आहेत. आता आपल्याला विचार आला असेल की एवढे लग्न कसे काय झालेत तर याचे उत्तर सुध्दा आम्ही आपल्याला देतो. स्वाजिलँड या देशात त्या देशाच्या महाराणी च्या आईच्या लुदजिजिनी गावात वर्षाच्या दोन महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये एक उम्हलांगा सेरेमनी। या नावाचा सण साजरा केल्या जातो, या सणा मध्ये तेथील तरुण मुली राजासमोर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करतात.
नृत्य सादर करताना त्या मुलीच्या अंगावर वस्त्र नसतात. आणि हे नृत्य त्या सर्व गावकाऱ्यांपुढे करतात. यापैकीच राजा दरवर्षी आपली एका मुलीला निवडून तिच्याशी लग्न करतो. आतापर्यंत राजाने १५ लग्न केले आहेत. परंतु राजच्या पहिल्या दोन पत्नीना मुख्य पत्नीचा दर्जा मिळाला आहे.
या राजाने २०१५ ला शिखर परिषदेच्या निमित्ताने आपल्या देशाला भेट दिली होती, तेव्हा तो त्याच्या मुला बाळांना घेऊन आपल्या देशात आला होता, आणि सोबत तो त्याचे नोकर सुध्दा घेऊन आला होता. या राजाच्या संपूर्ण परिवाराला एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ठेवण्यात आले होते. आणि या सर्वांच्या राहण्यासाठी १०० खोल्यांची व्यवस्था केली गेली होती. हा एकमेव असा राजा असणार जो दरवर्षी उत्सवानिमित्त लग्न करत असणार.
आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबत अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!