Junagarh Fort History in Marathi
जुनागढ किल्ला भारतातल्या राजस्थान राज्यातील बिकानेर शहरात स्थित आहे. या किल्ल्यास चिंतामणी किल्ला तसेच बिकानेर किल्ला म्हणुन ओळखले जाते. 20 व्या शतकाच्या आरंभी याचे नाव बदलुन जुनागढ ठेवण्यात आले.
हा किल्ला राजस्थान मधील प्रमुख किल्ल्यांपैकी एक असुन हा भव्य आकाराचा किल्ला फार उंचीवर बनविल्या गेला नाही. वर्तमान बिकानेर शहर या किल्ल्याच्या सभोवतालीच विकसीत झाले आहे.
जुनागढ किल्ल्याचा इतिहास – Junagarh Fort History in Marathi
या किल्ल्याची निर्मीती बिकानेरचे शासक ‘राजा रायसिंह’ यांनी केली होती. राजा रायसिंह यांनी इ.स. 1571 ते 1611 पर्यंत बिकानेर वर शासन केले होते. किल्ल्याच्या भिंती आणि मुख्य इमारतीचे निर्माण 1589 मधे सुरू होउन 1594 मध्ये पुर्ण झाले होते. जुनागढ किल्ल्याचा शेष भाग लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत जोडला गेला.
ऐतिहासीक पुराव्यांन्वये हा किल्ला अनेकदा शंत्रुव्दारा आक्रमीत होता परंतु कधीही यास जिंकता आले नाही. एकदाच मुघल या किल्ल्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते परंतु त्यांना किल्ल्यावर नियंत्रण मिळवता आले नाही 5.28 कि.मी. परिसरात पसरलेल्या या किल्ल्यात महल मंदिर व रंगमंचासाठी स्टेज व मोठया सैन्यासाठी निवासस्थाने बनविण्यात आली आहेत.
जुनागढ किल्ल्याचे निर्माण येथील जुन्या दुर्गाच्या ठिकाणी करण्यात आले. हा पुरातन किल्ला नवव्या शतकात उभारण्यात आला होता, हा चुडामणी राजपुतांच्या अधिपत्या खाली होता. हा गिरनार पर्वताच्या समीप असलेला एक विशाल दुर्ग आहे.
गिरनार पर्वताच्या काही दगडांवर येथे शासन करणा.या तीन शासकांचे नाव कोरले आहे. प्रथम नाम मौर्य शासक अशोक सम्राट यांचे आहे, दुसरे नाव रूद्रदामन घराणे आणि तिसरे नाव स्कंद गुप्त यांचे आहे.
गिरनार पर्वताच्या काही भागात हडप्पा कालीन अवशेषही मिळाले आहेत त्यामुळे जुनागढ किल्ल्याची पुरातन ईमारत प्राचीन इतीहासाची साक्षीदार आहे.
गिरनार पर्वताच्या दक्षिण भागात बौध्द भिक्षुंनी तयार केलेल्या गुफाही सापडल्या आहेत त्यावरून हा किल्ला पुरातन काळात मोठया नागरी संस्कृतीचे केंद्र असावे असा अंदाज काढला जातो.
हा किल्ला 15 व्या शतकात राजपुतांच्या ताब्यात आला या आधी येथे 1472 मध्ये गुजरातच्या मुहम्मद बेगढा याने हल्ला करून यास आपल्या ताब्यात घेतले व तेथे काही वर्ष राज्य केले त्याने येथे एक मोठी मशीदही बांधली होती.
15 व्या शतकात राजपुतांनी येथे आक्रमण करून मुहम्मद चा पराभव करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला व मशिद पाडुन टाकुन तेथे मोठे मंदिर बांधले, राजपुतांनी किल्ल्याचे बांधकाम चोख करून यास अभेद्य बनविले.
या किल्ल्यावर जेव्हांही आक्रमणे झालीत शत्रुस रिकाम्या हाती परतावे लागले.
किल्ल्यातील भव्यदिव्य बादलमहल एक उत्कृष्ट कलेचा नमुना आहे, खास करून पर्यटक येथील बादल महल बघण्यासाठी येथे येतात. येथील बादल महल मध्ये पोहोचल्यावर आपणांस किल्ल्यांच्या उंचीची जाणीव होते येथील भिंती निळया रंगाच्या व पावसाच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत.
पर्यटक येथे येउन बराचवेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात, हा किल्ला संपुर्णपणे लाल बलुआ दगडांनी बनलेला आहे, आतील काही भागात संगमरवर दगडांचाही वापर केला गेला आहे. येथे बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत जसे गंगा महल, फलमहल, दोन मोठया हवेल्या व येथील बगिचा जे या वाळवंटी बिकानेर मध्ये एक आश्चर्यच समजावे लागेल. येथील अनेक मंदीरांना पाहुन त्या काळातील संस्कृतीचे दर्शन होते.
या किल्ल्यात एक भव्य संग्राहलय ही आहे. येथे राजपुतांचे शस्त्र, चित्रे, कपडे, महत्वाचे दस्ताऐवज, सजावटीचे साहित्य, राजस्थानच्या भव्यदिव्य इतिहासाला दर्शवतात.
हे संग्रहालय पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी 50 हजारांवर पर्यटक येथे भेट देतात.
येथे आपणांस संस्कृत व फारसीत लिहीलेल्या अनेक पांडुलिपीका सुध्दा उपलब्ध आहेत. संग्रहालयात ठेवलेले अनेक दुर्लभ चित्र, दागिने, शस्त्र, पत्रे येथील खास आकर्षण आहेत.
स्थापत्य, पुरातत्व आणि ऐतिहासीक दृष्टीने या किल्ल्याची निर्मीती तुर्की शैलीने बनविण्यात आली आहे दुर्गातील महलांमध्ये तेथील शैलीची झलक पहायला मिळते.
हा दुर्ग चतुर्कोणीय आकारात बांधला आहे ज्याची परिमीती 1078 मिटर आहे या दुर्गात दोन प्रवेशव्दार आहेत त्यांचे नाव करण पोल आणि चांद पोल आहे, दोन्ही दरवाजे पुर्व पश्चिम दिशेस आहेत. या प्रवेशव्दाराची मजबुती अजुनही दिसुन येते हे दरवाजे लाकडी असुन यावर लोखंडी मोठमोठे खिळे बसवण्यात आले आहेत.
जुनागढ किल्ला आणि बिकाने पॅलेस – Junagarh Fort And Palaces Bikaner
अनुप महल एक बहुमजली इमारत आहे. येथे राजपुतांचे मुख्य केंद्र होते याचे बांधकाम अत्यंत सुबक आणि मजबुत होते याच्या निर्माणात इटालियन मार्बलचा वापर केला गेला याच्या सिलिंग व खिडक्या महाग लाकुड व काचांपासुन बनवल्या आहेत. काही ठिकाणी सोन्याचा वापर पत्र्यांचा व फुलांचा आकार बनवुन सुबक कलाकुसरीचे नमुने पहायला मिळतात.
फुल महल हा या किल्ल्यातील सर्वात जुना भाग मानल्या जात होता. हे सुध्दा एक भव्य सदन असून याच्या भिंतीवरही छान आकृत्या व कलाशिल्पे काढली गेली आहेत.
गंगा महल चे निर्माण 20 व्या शतकाच्या प्रारंभी गंगासिंह यांनी करवुन घेतले त्यांनी 1857 ते 1943 येथे शासन केले या किल्ल्यात एक विशाल दरबारही आहे हा दरबार राजस्थानी कलेचा नमुना आहे. हयाच्या भव्यदिव्यतेची कल्पना याला पाहुनच येते.
करण महल हा सामान्य जनतेच्या बसण्याची जागा मानला जाई. याची निर्मीती करणसिंह यांनी 1680 मध्ये केली होती औंरगजेब बादशहा विरूध्द युध्द जिंकण्याच्या आनंदास साजरा करण्यासाठी याची निर्मीती करण्यात आली होती.
जुनागढ किल्ला राजस्थानच्या कला आणि समृध्द संस्कृतिचा प्रमाणित नमुना आहे. येथील खिडक्या व सदने राजस्थानी वास्तुशिल्पाचे दर्शन घडवतात.
येथील विशाल सिंहासन व कक्षांमधील वस्तु कलेचा शानदार नमुना आहेत.
बदल महल आणि अनुप महल याचे बांधकाम पाहुनच राजस्थानी कलेची समृध्दी दिसुन येते येथील प्राचीन चित्रे शेखावती दुन्दलोद यांनी बनविली होती, ज्यांनी बिकानेरच्या विविध राजांचे सुंदर चित्र रेखाटले होते सोबतच श्रीकृष्ण भगवानांचे चित्र ही सुबकतेने रेखाटले गेले आहे.
महाराजा रायसिंह ट्रस्ट:
महाराजा राय सिंह ट्रस्ट ची स्थापना बिकानेर च्या शाही परिवाराने केली आहे. याचा उद्देश हाच की जास्तीत जास्त पर्यटकांना राजस्थानी संस्कृतीचे दर्शन करता यावे.
किल्ल्याच्या आत बनविण्यात आलेल्या संग्रहालयात राजस्थानी राजेमहाराजांची तसेच बिकानेरी राजांच्या काही विशेष वस्तु व साहित्य येथे पर्यटकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत त्यात मनुस्मृती ग्रंथ, ऐतिहासीक चित्रे, दागिने, शाही कपडे, शाही साजाचे साहित्य, दस्ताऐवज, पत्रे, शस्त्रे, पारंपारीक खाजगी वस्तु, देवी देवतांचे चित्र व मुत्र्या येथे ठेवण्यात आल्या आहेत याचा उद्देश असा की येणा.या पर्यटकांना राजस्थानी विशेषतः बिकानेरी संस्कृतिचे दर्शन घडावे.
Read Also:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ जुनागढ किल्ला बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्