Jowar chi Mahiti
ज्वारी हे अस धान्य आहे जे लहान्यान पासून ते मोठ्या व्यक्ति पर्यंत सर्वाना चालते. गहू नंतर ज्वारीचा जास्त वापर केला जातो. बऱ्याच लोकांची ज्वारीची भाकर ही आवडीची आहे. आणि ती पचायला ही सोपी आहे. ज्वारी मध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. ज्वारीचा वापर फक्त पिठाची भाकरी म्हणूनच नाही केला जात तर त्या पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनविले जातात. तसेच ज्वारी विषयची आणखी काही माहिती आपण समोर पहाणारच आहोत.
ज्वारी ची माहिती – Jowar Information in Marathi
ज्वारीचे विविध नाव : | यावनाल, जुर्ण इत्यादि नावे आहेत. |
शास्त्रीय नाव : | Sorghum Vulgare, Jowar |
धाण्याचे प्रकार : | तृणधान्य |
हंगाम : | खरीप व रबी |
ज्वारीचे उत्पादन : | भारतातील महाराष्ट्रात होते. |
ज्वारीमध्ये असणारी पोषक तत्वे : | प्रथिने, कर्बोदके, आवश्यक स्निग्धांश, क्षार, ब वर्ग जीवनसत्वे |
Sorghum Vulgare, Jowar यावनाल, जूर्ण आदी नावांनी ‘ज्वारी’ प्रसिद्ध आहे. कडाक्याची थंडी आणि पहाटे गरम हुरडा, गूळ, चटणी आणि दही ही ज्वारीची ओळख! ज्वारी ही कोवळी असताना ताजी कणसे निखाऱ्यावर भाजून हुरडा बनविला जातो. हा हुरडा अत्यंत पौष्टिक समजला जातो.
आपल्या देशात ज्वारी सर्वत्र पिकते. महाराष्ट्रात अनेक खेड्यांत ज्वारी हे दैनंदिन अन्न आहे. गुजरात, खानदेश, धारवाड या ठिकाणीही ज्वारीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. लाल आणि पांढरी असे ज्वारीचे दोन प्रकार आढळतात. याशिवाय सोलापुरी, गुंदळी, चोपडी, शाळू, खानदेशी अशाही प्रकारची ज्वारी आढळते.
ज्वारीचा वापर – Jowar Uses
प्रामुख्याने पीठ स्वरूपात ज्वारीचा वापर होतो. ज्वारीची भाकरी अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असते. ज्वारीच्या लाह्याही बनविल्या जातात. त्या पचनास सुलभ असतात. ज्वारीच्या पिठापासून पाटवड्या, ताजी उकड बनविता येते. भरपूर कष्ट करणाऱ्या व्यक्तीपासून ते अगदी लहान वयाच्या बाळाच्या आहारापर्यंत ज्वारीचा वापर करता येतो. तसेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतुत ज्वारी वापरली जाते.
ज्वारीची पौष्टिकता – Jowar Benefits
- ज्वारीची कोवळी कणसे निखाऱ्यावर भाजून केलेला जो हुरडा तो शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतो.
- ज्वारीचीभाकरी ही खायला अतीशय चविष्ट आणि पौष्टिक असते.
- ज्वारीपासून बनविलेल्या लाहया ह्या शरीरसाठी आरोग्यदायी ठरते कारण लाह्या हया पचनास हलक्या असतात.
- ज्वारीचा वापर हा पिठाच्या स्वरूपात जास्त प्रमाणात केला जातो.
- ज्वारीच्या पिठापासून भाकरीप्रमाणेच त्याचा वापर वड्या, भजी, उकड अश्या प्रकारे ही केला जातो.
- कष्टकऱ्यांपासून ते लहान बाळापर्यंत अश्या सर्वांच्या आहारात ज्वारीचा वापर हा अतिशय महत्व पूर्ण ठरतो.
- ज्वारी या धान्यात कर्बोदके, प्रथिने, क्षार, आवश्यक स्निग्ध पदार्थ, आणि ब वर्ग जीवनसत्वे यांचा समावेश होतो.
- लाल ज्वारी त्रिदोषनाशक तसेच पांढरी ज्वारी बलप्रद असते.
ज्वारी बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Jowar
1. ज्वारीचा रोजच्या आहारात समावेश करू शकतो का?
उत्तर – हो, ज्वारी ही आपण रोजच्या आहारात घेऊ शकतो कारण ती पचनास हलकी असते.
2. ज्वारीची शास्त्रीय नावे काय आहेत ?
उत्तर – ज्वारीची शास्त्रीय नाव Sorghum Vulgare, Jowar हे आहे .
3. ज्वारी ही कोणत्या हंगामात पेरली जाते ?
उत्तर – ज्वारी ही खरीप व रबी हंगामात पेरली जाते.
4. ज्वारीचे कोणकोणते प्रकार आहेत ?
उत्तर – ज्वारीचे मुख्य लाल आणि पांढरी असे दोन प्रकार आहेत. ज्वारीचे याशिवाय सोलापुरी, गुंदळी, चोपडी, शाळू, खानदेशी अशाही प्रकार आढळते.
5. ज्वारी ही कोणत्या राज्यात जास्त पीक होते ?
उत्तर – महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचे पीक घेतल्या जाते.