James Watt – जेम्स वॅट एक स्काॅटिश खोजकर्ता, मॅकेनिकल इंजिनियर आणि केमिस्ट होते. त्यांनी वॅट स्टिम इंजिनाचा शोध करून उदयोग जगात क्रांती आणली होती. या इंजिनचा वापर इंग्लंड व युरोपात खुप केला जात होता. त्यांच्या या शोधामुळे फार प्रभावशाली बदल झाले होते.
जेम्स वॅट यांचे जीवन चरित्र – James Watt Biography
ग्लासगो युनिवर्सिटी मध्ये उपकरणे बनविण्याच्या पदावर काम करणा-या जेम्स ला सर्व जण एक साधारण वैज्ञानिक मानायचे जेम्स यांना सूचले आणि त्यांनी आपल्या डोक्यात येणा-या विविध युक्त्यांचा वापर करीत शेवटी अशी वस्तू निर्माण केली ज्यामूळे आधुनिक जग आज इथवर पोहचू शकले. त्यांनी वाफेच्या मदतीने इंजिन चालवुन दाखवले जी एक औदयोगिक क्रांती म्हंटली जाई कारण इंजिनांना चालविण्यासाठी फार उर्जा निर्माण करण्यास मनुष्यबळ लागायचे. त्यांनीच हाॅर्सपावर ही संकल्पना मांडली आणि युनिट आॅफ पावर वाॅट यास आपले नाव ही दिले.
जेम्स यांचा जन्म 19 जाने 1736 साली क्लाईड खाडीतील ग्रीनोक्क या बंदरावरील पारिवारीक घरात झाला. त्याच्या पूर्वजांचा जाहाजांचा व्यापार होता. जहाज भाडयावर देणे व तयार करण्याचा उदयोग त्यांचे कुटूंब करायचे. त्यांची आई एक सुशिक्षीत गुहीणी होती. त्यांचे आजोबा एक गणितीय शास्त्राचे शिक्षकही होते. त्यांच्या आईने त्यांना शाळेत न पाठवता घरीच शिकवले. त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण शहरातील ग्रीनोक्क ग्रामर स्कुल येथुन पूर्ण केले. शाळेत त्यांच्या गणीतीय व भूमितीय गुणांमुळेच ते इंजिनिअरिंग कडे वळले त्यांच्या वडिलांनी त्यांना लंडन येथे उपकरणांच्या अभ्यासासाठी पाठवले.
परत आल्यावर ब-याच कंपन्यांकडे अर्ज करून हताश झाल्यावर त्यांनी स्वतःच आपल्या उपकरणांचा शोध घ्यायचे ठरविले. त्यांनी तेथे पितळी वृत्तपाद समांतर मापक स्केल टेलिस्कोपचे काही सूटेभाग बॅरोमिटर बनविणे आणि सूधारण्याचे काम सुरू केले. ग्लास्को युनिवर्सिटी ने त्यांच्या प्रतिभा पाहुन त्यांना युनिवर्सिटीत एक प्रयोगशाळा स्थापीत करून दिली. त्यांनी अनेक असे उपकरण सुधारले जे कधीच ठिक झाले नव्हते त्यांच्याव्दारा तयार केलेल्या उपकरणांची फार मागणी असायची.
1757 मध्ये त्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे दोन प्रोफेसर जोसेफ आणि स्मिथ त्यांच्या मदतीला आले. 1759 मध्ये त्यांनी जाॅन क्रॅंग यांच्या सोबत पार्टनरशीप करून मौल्यवान उपकरणांची सुधारणा करण्यासाठी एक प्रयोगशाळा स्थापन केली. 1764 मध्ये त्यांनी सुंदर तरूणी मार्गारेट मिलर हिच्याशी लग्न केले त्यांच्या पासुन त्यांना पाच अपत्ये झालीत त्यातील तीनच जिवंत राहीली. 1777 मध्ये त्यांच्या पत्नी पाचव्या मूलास जन्म दिल्यानंतर दगावल्या. त्यानंतर जेम्स यांनी एन्न मॅकग्रेअर सोबत विवाह केला त्यांच्यापासुन त्यांना 2 अपल्ये झालीत.
जेम्स वॅट यांच्या सहा वस्तुंचे पेटंट झाले आहेत
- पेटंट 913 A – स्टीम इंजीन ला वेगळे कंडेंसर लावून त्याचा वापर करणे यास 29 एप्रिल 1769 ला मान्यता मिळाली.
- पेटंट 1,244 शब्दांना काॅपी करण्याच्या नवीन विधिस शोधुन काढले. यास 14 फेब्रु 1780 ला मान्यता मिळाली.
- पेटंट 1306 – सुर्य आणि ग्रहांच्या परिभ्रमणाच्या गतीस सांगणा-या यंत्राचा शोध यास 23 फेब्रु 1782 मध्ये मान्यता मिळाली.
- पेटंट 1422 स्टिम इंजन मधील आमुलाग्र बदल घडवुन आणला यास 25 आॅगस्ट 1182 ला मान्यता मिळाली.
- पेटंट 1321 – स्टिम इंजनचे विविध रूपांना प्रस्तुत केले यास 4 जुलै 1782 ला मान्यता मिळाली.
- पेटंट 1485 – भट्टीस निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले यास 14 जुन 1785 ला मान्यता मिळाली.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ जेम्स वॅट बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की हा जेम्स वॅट यांचे जीवन चरित्र – James Watt Biography तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.
नोट : James Watt Biography – जेम्स वॅट यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.